पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचे आयोजन
पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या वतीने आणि उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीर गुरूवारी (ता. २१) आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबीर कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात येते.
या शिबिरात मागील २० लाभार्थी आणि नवीन ५० लाभार्थी, असे एकूण ७० लाभार्थ्यांची तपासणी होणार असून हि संख्या उत्तरोत्तर वाढविण्यात येणार आहे. कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांनी दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेऊन विशेष मुलांसाठी होमिओपॅथी उपचार पद्धत विकसित केली आहे. त्यांनी आजवर लाखो मुलांना निस्वार्थपणे मोफत उपचार दिले आहेत.
सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी हि संस्था गेली अनेक वर्षे दिव्यांग मुलांच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने काम करीत आहे. आजपर्यंत “सप्तर्षी समग्र दिव्यांग सेवा केंद्रातून हजारो...