Crime News : दुचाकी चोरून वेगवेगळ्या जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी केला पर्दाफाश ; ६१ दुचाकी हस्तगत
पिंपरी, ता. १६ : चिखली, पिंपरी, निगडी अशा शहरातील दुचाकी वाहनांची चोरी करुन खानदेश व मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे हि टोळी मौजमजा करण्यासाठी वाहन चोरुन त्या वाहनांची बनावट कागदपत्र तयार करुन ती वाहने विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत याबाबत माहिती दिली.
पोलीसांनी या टोळीकडुन एकुण ६१ दुचाकी वाहने असा एकुण १९ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोविंद मुलचंद सोलंकी (वय - २५, सध्या रा. अंजिठा नगर, पत्र्याचे शेड चिंचवड, मुळगाव-छाप्रा पोस्ट छोटाटिगरीया, ता. जि. देवास, मध्यप्रदेश), संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय- २८, रा. गोकुळ हौसिंग सोसायटी, यादव यांचे घर, मोरेवस्ती, चिखली), सद्दाम अब्दुल शेख (वय- २६, रा. ताम्हाणे वस्ती, विठ्ठल ...










