PCMC : काँक्रिटीकरणामुळे तापकीर नगरमधील रस्त्यांचे पालटले रूप
नगरसेविका सुनिता तापकीर व राजदादा तापकीर यांच्या दूरदृष्टीतील टिकाऊ व खड्डेमुक्त रस्त्यांची प्रचिती
काळेवाडी : प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीर नगर, ज्योतिबा नगर भागात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉकची काम पुर्ण झाली आहेत. प्रशस्त व मजबूत झालेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यात नगरसेविका सुनिता तापकीर व भाजप युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांनी विशेष परिश्रम घेतले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मध्ये याआधी रस्त्यांचे डांबरीकरण केले जात होते. परंतू, काही कालावधीनंतर व खोदाईच्या कामामुळे रस्ते खराब होत. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. महापालिकेला सेवा-सुविधा पुरविण्यासाठी विविध कर देऊन चांगले रस्ते मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. हीच बाब लक्षात घेऊन टिकाऊ व ...