Tag: pcmc

पिंपरीत मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

पिंपरीत मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त दिवंगत माजी नगरसेवक लक्ष्मणराव (तात्या) गायकवाड व राजेंद्र वंजारे यांच्या स्मरणार्थ नगरसेविका गिता सुशील मंचरकर यांच्या सौजन्याने मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. मानवता हिताय सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी यांच्या उपस्थितीमधे हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी संपूर्ण गायकवाड व वंजारे कुटुंबीय तसेच आरपीआय वाहतुक आघाडीचे अध्यक्ष अजीज शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे, धुराजी शिंदे, नितुल पवार, गणेश आहेर, विशाल वाली, चंद्रकांत बोचकुरे, सतिश भांडेकर, दिपक म्हेत्रे, बळीराम काकडे, मनोज गजभार, अजय शेरखाने, अजय धोत्रे, अतुल धोत्रे, ऍड. अतुल धोत्रे उपस्थित होते....
महापौर माई ढोरे यांची मोशी कचरा डेपोला सदिच्छा भेट
पिंपरी चिंचवड

महापौर माई ढोरे यांची मोशी कचरा डेपोला सदिच्छा भेट

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड : शहराच्या महापौर माई ढोरे यांनी शुक्रवारी (ता. १३ ऑगस्ट) मोशी कचरा डेपोला अचानक सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महापौरांनी कचरा डेपोची व्यवस्थित पाहणी केली. कचरा डेपोमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती घेतली. महापौर कचरा डेपोमध्ये येणार, यामुळे डेपो प्रशासनाने जय्यत अशी तयारी केली होती. यावेळी कचरा डेपोचे प्रशासकीय अधिकारी कुलकर्णी यांनी महापौरांचे स्वागत केले. त्याचबरोबर कचरा डेपोच्या सुरक्षिततेकरिता नेमण्यात आलेल्या सुतीस्का सिक्युरिटी गार्ड यांच्याकडून महापौरांना मानवंदना देण्यात आली....
काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
पिंपरी चिंचवड, सामाजिक

काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पिंपरी : काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा या भावनेतून काळेवाडी भागातील सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांच्या मदतीने जमा झालेल्या जीवनावश्यक वस्तू हभप समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ पिंपरी चिंचवड या संस्थेचे संस्थापक सुभाष पवार, मनोहर भोसले रमेश साळुंके, सचिन साळुंके, अविनाश उत्तेकर, रवींद्र चव्हाण, नंदु जाधव, निलेश मोरे यांच्याकडे या वस्तू सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख दस्तगीर मणियार, शिवसेना उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, गणेश आहेर, सुनील विटकर, नेताजी नखाते, संतोष कुंभार, राजेंद्र भरणे, नरसिंग माने शाखा प्रमुख, सावता महापुरे शाखा प्रमुख, जितू वीटकर, अनिल पालांडे, सोमनाथ नळकांडे,...
नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश
पिंपरी चिंचवड

नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश

काळेवाडी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना १५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे संस्थापक सुभाष पवार यांच्याकडे पाडाळे यांनी १५ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्त केला. दरम्यान, पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूची मदत या आधीच तातडीने पाठवण्यात आली होती. त्यावेळी नगरसेविका निता पाडाळे, विलास पाडाळे, गितेश दळवी, मनोहर भोसले, राजु पवार, संतोष चिकणे, अशोक पवार यांच्यासह महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....
PCMC : काँक्रिटीकरणामुळे तापकीर नगरमधील रस्त्यांचे पालटले रूप
पिंपरी चिंचवड

PCMC : काँक्रिटीकरणामुळे तापकीर नगरमधील रस्त्यांचे पालटले रूप

नगरसेविका सुनिता तापकीर व राजदादा तापकीर यांच्या दूरदृष्टीतील टिकाऊ व खड्डेमुक्त रस्त्यांची प्रचिती काळेवाडी : प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीर नगर, ज्योतिबा नगर भागात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉकची काम पुर्ण झाली आहेत. प्रशस्त व मजबूत झालेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यात नगरसेविका सुनिता तापकीर व भाजप युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांनी विशेष परिश्रम घेतले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मध्ये याआधी रस्त्यांचे डांबरीकरण केले जात होते. परंतू, काही कालावधीनंतर व खोदाईच्या कामामुळे रस्ते खराब होत. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. महापालिकेला सेवा-सुविधा पुरविण्यासाठी विविध कर देऊन चांगले रस्ते मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. हीच बाब लक्षात घेऊन टिकाऊ व ...
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर
पुणे

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर

खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार सुनील शेळके यांच्या सामुहीक प्रयत्नांना यश पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या ५४ कि. मी. लांबीच्या रस्त्यासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील न्हावरा ते चौफुला रस्त्यासाठीही २२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आधी पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे खासदार झाल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी रस्ते विकासाच्या प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार तळेगाव - चाकण - शिक्रापूर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. कोल्हे व आमदार सुनील ...
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आकुर्डीत ध्वजारोहण
पिंपरी चिंचवड

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आकुर्डीत ध्वजारोहण

आकुर्डी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने आकुर्डीगाव महापालिका दवाखाना येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शरण बहादूर यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गणेश दराडे, सतीश नायर, बाळासाहेब घस्ते, क्रांतिकुमार कडुलकर, वीरभद्र स्वामी (माकप), अमिन शेख, विनोद चव्हाण, शिवराम ठोंबरे,नागेश दोडमनी,किसन शेवते,अविनाश लाटकर(DYFI)अपर्णा दराडे, सुषमा इंगोले,यल्लमा कोलगी,रंजिता लाटकर, शेहनाज शेख,शैलजा कडुलकर,मंगल डोळस,मनीषा सपकाळे,कविता मंधोदरे,पूजा दोडमनी(महिला संघटना) आदी कार्यकर्ते उपस्थित होते....
दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
पिंपरी चिंचवड

दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी

मनीषा वाल्मिकी अत्याचार प्रकरणी योगी आदित्यनाथ राजीनामा द्या - सिद्दीकभाई शेख पिंपरी चिंचवड : उत्तर प्रदेश मधील हाथरस याठिकाणी मनीषा वाल्मिकी नावाच्या १९ वर्षीय तरूणीवर मारहाण करून १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक २९ सप्टेंबर रोजी रोजी तिचा मृत्यू झालेला आहे.मृत्यूनंतर तिचा अंतिम संस्कार तिच्या परिवाराच्या परवानगीशिवाय घाईगडबडीत रात्रीच्या वेळी करण्यात आला. हि घटना ताजी असतानाच लैंगिक अत्याचाराच्या ३ घटना घडल्या .यामुळे उत्तरप्रदेश मधील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने दि. २ ऑकटोबर २०२० रोजी ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डांगेचौक थेरगाव या ठिकाणी सकाळी " निदर्शने आंदोलन " करण्यात आले. यावेळी बोलताना अपना वतन...
पिंपरी चिंचवड : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कोरोना रुग्ण व मृत्यू संख्येत वाढ – मारूती भापकर
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कोरोना रुग्ण व मृत्यू संख्येत वाढ – मारूती भापकर

कोरोनाबाबत गांभीर्याने विचार व तज्ञांशी चर्चा करून योग्य उपाययोजना कराव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली मागणी पिंपरी : शहरात कोरोना रुग्णसंख्या ६० हजारांवर गेली असून कोरोना बळींची संख्या एक हजारांहून अधिक झाली आहे. दिवसाला २० ते २५ रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी अत्यंत वेगाने वाढतच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासनाचा गलथाण व भोंगळ कारभार आणि योग्य समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे कोरोना बाबत गांभीर्याने विचार व तज्ञांशी चर्चा करून योग्य उपाययोजना कराव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोर...
पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव | बंदोबस्त न केल्यास संभाजी ब्रिगेड महापालिकेत सोडणार मोकाट कुत्री
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव | बंदोबस्त न केल्यास संभाजी ब्रिगेड महापालिकेत सोडणार मोकाट कुत्री

पिंपरी : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाने आठ दिवसात या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महापालिका भवनात त्यांना आणून सोडण्यात येतील. असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक दिवसांपासून शहरात विविध भागातील गर्दीच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आणि अश्यातच रस्त्यारस्त्यावर मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. काही ठिकाणी तर लहान मुलं, महिलांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पुढे अचानक ही कुत्री येऊन अपघात होतात. तसे...