Tag: pcmc

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे तर महिला अध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांची निवड
पिंपरी चिंचवड, राजकारण

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे तर महिला अध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांची निवड

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांची आज नियुक्ती करण्यात आली. तर युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख (Imran Shaikh) आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट (Kavita Alhat) यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. याशिवाय, शहरातील तीन विधानसभानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांना पदमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मागच्या वर्षी महापालि...
पिंपरी चिंचवड महापालिका रस्ते सफाईच्या टेंडरमध्ये बोगस ‘बँक गॅरंटी’ | फसवणूक करणाऱ्या कंपनीमागे राजकीय वरदहस्त?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड महापालिका रस्ते सफाईच्या टेंडरमध्ये बोगस ‘बँक गॅरंटी’ | फसवणूक करणाऱ्या कंपनीमागे राजकीय वरदहस्त?

https://youtu.be/s5lgHnr2iA0 सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीचा प्रताप भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांच्याकडून पर्दाफाश रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. १३ : पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांसह आता बोगस ‘बँक गॅरंटी’सादर करुन महापालिकेसह संबंधित बँकेचीही मोठी फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती भाजपा नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamathe) यांनी आज पत्रकार परिषदेत चव्हाट्यावर आणली आहे. महापालिका 'अ' आणि 'ब' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते-गटर सफाईच्या निविदेतून तब्बल ५५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप यापूर्वीच नगरसेवक कामठे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत पुराव्यानिशी उघड केला होता. संबंधित सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट ठेकेदार संस्थेने इंदापूर नगरपरिषद आणि तुळजापूर, जि. उस्मानाबाद ...
पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला अनुकूल वातावरण – कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला अनुकूल वातावरण – कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर

नवनियुक्त महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांचा सत्कार लोकमराठी न्यूज नेटवर्क : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकी बाबत कॉंग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे. सध्या अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सभासद नोंदणीचा उपक्रम आम्ही राबवित असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात निवडणुकीचे बुथधारकांची यादी यांच्या कामकाजाची मांडणी करण्याबाबत शहरातील विविध भागातील बुथ धारकांची माहिती घेवून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रशिक्षण सुरू आहे. उमेदवार मागणीसाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस पक्षाचा कारभार पारदर्शक असल्याने पिंपरी चिंचवड शहरात कॉंग्रेसला अनुकूल वातावरण दिसून येत असल्याचा विश्वास पांढरकर यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांचा सत्कार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस...
शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू असताना ४० कोटीचे टॅब कोणासाठी?
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू असताना ४० कोटीचे टॅब कोणासाठी?

नगरसेवक व अधिकाऱ्यांचा महापालिका तिजोरीवर डल्ला मारण्याचा डाव? रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : कोरोना महामारीमुळे सर्वच शाळा बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. त्यावेळी महापालिका शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा टॅब या इलेक्ट्रॉनिक वस्तूची गरज होती. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेने याबाबत कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू आहेत. परंतू, आता नेहमीच्या लुटमार योजनेच्या माध्यमातून २७ हजार टॅब खरेदीचा घाट घातला जात असून त्यासाठी सुमारे ४० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च केला जाणार आहे. नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांचा हा डाव नागरिकांच्या लक्षात आला आहे. या खरेदीला शहरातून विरोध होत असून याबाबत जागृत नागरिक महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात ...
निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच सुखी जीवनाचा मुलमंत्र – कुंदा भिसे
पिंपरी चिंचवड

निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच सुखी जीवनाचा मुलमंत्र – कुंदा भिसे

पिंपळे सौदागरमध्ये 'होम फिट इंडिया' जीमच्या उद्घाटनप्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे प्रतिपादन पिंपरी : आजच्या धकाधकीच्या युगात मनुष्याचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच आज सुखी जीवनाचा मुलमंत्र आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पिंपळे सौदागर येथे 'होम फिट इंडिया' या जीमचे उद्घाटन करण्यात आले आहे. असे प्रतिपादन (Unnati Social Foundation) उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे (Kunda Sanjay Bhise) यांनी केले. उन्नतिच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या हस्ते नुकतेच या जीमचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक व यशदा रिएलिटी ग्रुपचे व्हॉईस चेअरमन संजय भिसे, सागर बिरारी, मयूर काळे, अशोक शालगर, मोनाली कुलकर्णी शालगर, रुपाली लोखंडे, चंचल अरबाळे, पंडित नरवाडे, शंकर चव्हाण, गणेश शालगर,...
कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा १२०० जणांना लाभ
पिंपरी चिंचवड

कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा १२०० जणांना लाभ

पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त रहाटणी येथे आयोजित केलेल्या मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा सुमारे १२०० नागरिकांनी लाभ घेतला. कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मधील नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मधुमेह, थायरॉइड, किडनीचे विकार, लिव्हरचे विकार, हृदय विकार, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांवर प्रभावी ठरणाऱ्या ॲक्युप्रेशर थेरपी उपचार पद्धतीचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक कैलास थोपटे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ता कारभारी, प्रकाश गायकवाड, सखाराम रानवडे, माणिक थोरात, संतोष परसे, रघुनाथ जठार, विजय निकम, नंदू पाटील, विकास थोपटे, प्रदीप चौधरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्य...
पिंपरी चिंचवड पालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या आशीर्वादाने शहरात अवैध वृक्षतोड सुरू आहे का?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड पालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या आशीर्वादाने शहरात अवैध वृक्षतोड सुरू आहे का?

पिंपरी, ता १३ : पिंपरी चिंचवड शहरात दिवसाढवळ्या वूड माफिया ट्रक घेऊन रस्त्यावरील झाडं तोडत असतात आणि पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त हे मुग गिळून केलेल्या तक्रारींवर गप्प आहेत. असा सवाल वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी उपस्थित केला आहे. निगडी येथील यामुनानगरमध्ये फोटोतील व्यक्ती अवैधरित्या वृक्षतोड करताना ऋषिकेश तपशाळकर यांना दिसला. ते बघताच त्यांनी त्याला हटकले आणि वृक्षतोडीची परवानगी मागताच तो तिथून पळून गेला. त्यामुळे पोलीस आणि पालिका आयुक्त अवैध वृक्षतोडीला संरक्षण देत आहेत का? आणि नाही तर इतक्या तक्रारी करून देखील दुर्लक्ष का केले जात आहे? टेम्पोचा नंबर वैध आहे का? आणि ही लाकडं जातात कुठं? कोण आहे माफिया, जो दोन्ही आयुक्तांनावर दबाब टाकत आहे? असे अनेक प्रश्न वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी उपस्थित केले आहेत....
रोझ आयकॉन सोसायटीत कंम्पोस्टिंग प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

रोझ आयकॉन सोसायटीत कंम्पोस्टिंग प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन

पिंपळे सौदागरमधील सर्व सोसायट्यांमध्ये कंपोस्ट प्रकल्प राबविण्याचा कुंदा भिसे यांचा संकल्प पिंपरी चिंचवड : झाडांचा जमिनीवर गळालेला पालापाचोळा, शेणखत आणि चहापत्ती यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या कंपोस्ट खताच्या दुसऱ्या प्लांटचे पिंपळे सौदागरमधील रोझ आयकॉन सोसायटीत आज उद्घाटन करण्यात आले. उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी सदर प्लांटला भेट देऊन या प्लांटविषयी माहिती घेतली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, रोझ आयकॉन सोसायटीचे चेअरमन रवी मुंढे, पंकज देशमुख, गौरव पाटील, संतोष कवडे, प्रसाद पाखरे, मोहित आगरवाल, शशिकांत शर्मा, विकास काटे, दिनेश काटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कंपोस्ट प्रकल्प प्लांटमध्ये झाडांचा पाळापाचोळा, शेणखत, चहापत्ती या नैसर्गिक गोष्टींचेच मिश्रण करून खत तयार केले जाते. याला शासनाचा टेस्टिंग रिपोर्ट देखील मिळाला आहे. हे खत सोसायट्यांच...
युवकांनी सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घ्यावा | मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांचे आवाहन
आरोग्य, पिंपरी चिंचवड

युवकांनी सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घ्यावा | मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांचे आवाहन

चिंचवड : मंथन फाउंडेशन, रिलीफ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स नियंत्रण केंद्र, पुणे, जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संघवी केशरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिंचवड येथे एचआयव्ही एड्स जनजागृती करण्यात आली. मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी व्याख्यान दिले. युवक युवती यांना एचआयव्ही म्हणजे काय? एड्स व एचआयव्ही मधील फरक समजून सांगितला. एचआयव्ही कसा होतो, त्याचा इतिहास यावर माहिती दिली. तसेच एचआयव्ही चाचणी सर्व सरकारी रुग्णालय व काही एचआयव्हीवर काम करणाऱ्या संस्था मोफत तपासणी करतात व त्याचा अहवाल गोपनीय ठेवला जातो. प्रत्येकाने एचआयव्ही तपासणी करून घेतली पाहिजे, ती काळजी गरज आहे, असे त्यांनी सांगितले. एचआयव्हीबाबत युवकांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली पाहिजे. संवेदनशील झाले पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे आणि सुरक्षित राहून, जीवन...
काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन
पिंपरी चिंचवड, नोकरीविषयक

काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन

काळेवाडी : वाढती बेरोजगारी व कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या अनुषंगाने युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्या वतीने काळेवाडीत भव्य नोकरी महोत्सवाचे गुरूवारी (ता. ९) आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा प्रभागातील सुमारे १८०० जणांनी लाभ घेतला. त्यामध्ये १०१ जणांना थेट नोकरी मिळाली आहे. डॉ. माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत सतत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची जनसेवा सुरू आहे. अनेक जण सुशिक्षित असूनही नोकरी लागत नाहीत. ते सतत नोकरीच्या शोधात असतात. नोकरी नसल्यामुळे कुटुंब चिंतेत असते. ही बाब लक्षात घेत तसेच ही समस्या सोडवण्यासाठी डॉ. अक्षय माने यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर हा नोकरी महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात उत्पादन, वाणिज्य व वित्तीय संस्था, बीपीओ, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा प्रशिक्षण, वाहननिर्मित...