Tag: pcmc

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न म्हणयाला आवडेल | केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांचे प्रतिपादन
पुणे, मनोरंजन

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न म्हणयाला आवडेल | केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांचे प्रतिपादन

पिंपरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे कविसंमेलन घेतले आहे. ते अण्णा भाऊ स्वत: कवी होते. शाहिर होते, ज्यांच्या साहित्यातील लेखनाची दखल तात्कालिन काळात घेतली गेली नाही, जे आजच्याही काळात वास्तवतेचा अनुभव देते. त्यामुळे अण्णा भाऊंना भारतरत्न म्हणायला आवडेल. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक होते तर वंचितांच्या असंतोषाचे जनक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे होते असे प्रतिपादन केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती प्रित्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड, मातंग साहित्य परिषद व निवारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'अखिल भारतीय मराठी कविसंमेलनाचे' ऑनलाईन माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. "कवि...
PCMC : काळेवाडीतील वैभव कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करा
पिंपरी चिंचवड

PCMC : काळेवाडीतील वैभव कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करा

काळेवाडी : विजय नगरमधील वैभव कॉलनी रस्ता खराब झाला असून साधारण मागील सात-आठ वर्षांत या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. अशी मागणी नागरिक करत आहेत. विजयनगर मधील सर्वात प्रथम वसलेली ही कॉलनी असून बऱ्याच वर्षापुर्वी कॉलनी रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर महापालिकेने येथील रस्त्याकडे दुर्लक्ष केले. या कॉलनीतच जैन मंदिर असल्याने अनेक वयोवृद्ध नागरिक येथे उपासनेसाठी येत असतात. मात्र, रस्ता खराब झाल्याने अनेक नागरिक पाय मुरगळून पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रिटीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. असे सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी सांगितले. रहिवासी म्हणतात… "रस्ता खड्डेमय झाला असून पावसाळ्यात पाणी साचून चिखल होतो. डांबरीकरण चा...
माझ्या खुशीला शोधा! तरूणीची आर्त हाक | शोधुन देणारास बक्षीस
वायरल, पिंपरी चिंचवड

माझ्या खुशीला शोधा! तरूणीची आर्त हाक | शोधुन देणारास बक्षीस

https://youtu.be/sMhZsWa3KLg पिंपरी : "खुशी माझ्या कुटूंबातील सदस्य असून ती गायब झाल्यापासून मला खुप त्रास होताय, कृपया खुशीला शोधून द्या." अशी भाऊक साद घालत तरूणीचे अश्रू अनावर झाले. या तरूणीला खुशीचा ऐवढा लळा लागला आहे की, तीला शोधण्यासाठी ही तरूणी वणवण भटकत आहे. सविस्तर माहिती अशी की, प्रज्ञा पुजारी या तरूणीची खुशी नावाची भारतीय (गावठी) कुत्री तीन दिवसांपासून निगडी परिसरातून हरवली आहे. याबाबत प्रज्ञा यांनी रावेत पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. या कुत्रीला शोधुन देणारास ३००० रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सदर कुत्री (खुशी) दिसल्यास 7972300958 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रज्ञा यांनी केले आहे....
डासांचा त्रास वाढल्याने काळेवाडीत औषध फवारणीची मागणी
पिंपरी चिंचवड

डासांचा त्रास वाढल्याने काळेवाडीत औषध फवारणीची मागणी

काळेवाडी : विजयनगर, पवनानगर व आदर्शनगर परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच मलेरिया व डेंग्यू सारखे आजार पसरण्याची भीती भेडसावत आहे. त्यामुळे तातडीने औषध फवारणी करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विजय नगर भागातील वैभव कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, मोरया कॉलनी, क्रांती चौक, ओमकार कॉलनी, शांती कॉलनी, सहारा कॉलनी, समर्थ कॉलनी, किनारा कॉलनी पवना नगर, आदर्श नगर आदी परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे व मलेरिया, तसेच डेंग्यू आजाराचीही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे औषध फवारणीची आवश्यकता गरजेची झाली आहे. दरम्यान, या भागाचे कायमस्वरूपी रहिवासी नियमीत शासकीय व नीम शासकीय कर भरतात, तसेच मतदानाचा हक्क देखील बजावतात. मात्र, महापालिकेच्या वती...
हिंमत असेल तर गेल्या तीस वर्षातील कामांची चौकशी करा | नगरसेवक संदीप वाघेरे यांचे खुले आव्हान
सामाजिक, पिंपरी चिंचवड

हिंमत असेल तर गेल्या तीस वर्षातील कामांची चौकशी करा | नगरसेवक संदीप वाघेरे यांचे खुले आव्हान

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपला बदनाम करण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहरातील नेत्यांकडून केले जात आहे. एसीबीकडून चौकशी सुरू आहे, मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक नेते राजकारण करीत आहेत. आमचे त्यांना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर गेल्या तीस वर्षातील सर्व कामांची चौकशी करावी? असे खुले आव्हान भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेत केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी टीका केली आहे. या टीकेचा समाचार भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी घेतला आहे. नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले,“ महापालिकेतील लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून पक्षीय राजकारण करणे चुकीचे आहे ”.एसीबीने केलेली कारवाई आणि त्याबाबत सुरू असलेल्या तपासातून सत्य बाहेर येईल,मात्र खालच्या पातळीवर राजकारण करणे चुकीचे आहे. म...
शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान
शैक्षणिक, पिंपरी चिंचवड

शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल न्यु सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक अरूण चाबुकस्वार यांचाही सन्मान करण्यात आला. महापौर उषा (माई) ढोरे, उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेविका सुनीता तापकीर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन चाबुकस्वार यांना सन्मानित करण्यात आले. ...
रावेतमध्ये स्वातंत्र्यदिन अनोख्या पध्दतीने साजरा
पिंपरी चिंचवड

रावेतमध्ये स्वातंत्र्यदिन अनोख्या पध्दतीने साजरा

रावेत : 'मिशन - ये नया रावेत है' टीमचे सदस्य आणि रावेत मधील स्थानिक पर्यावरण प्रेमी यांनी एकत्रित येऊन मानवी साखळीचे प्रदर्शन केले. मिशन ये नया रावेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका 'ब' प्रभाग यांनी पर्यावरण युक्त सुविचार तसेच बॅनर तयार केले. अनेक सदस्यांनी तसेच त्यांच्या मुलांनी पर्यावरण विषयक घोषवाक्ये लिहून परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरण आणि स्वच्छतेविषयक जनजागृती निर्माण केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भास्कर गोखले, मनसे युवानेते प्रविण माळी, 'ब' प्रभाग प्रमुख सोनम देशमुख, आरोग्य अधिकारी शिंदे सर, गेंगजे सर, सुरज सर शिंगाडे सर, तुपे तसेच स्वछता कर्मचारी वर्ग आणि बेलाजिओ, हिलटॉपचे शिंदे सर व जेष्ठ नागरिक, सिरीन स्केप, मिटटाऊनमधील रहिवासी उपस्थित होते....
महापालिकेतर्फे नवी सांगवीत प्लास्टिक मुक्त अभियान|१५ हजार रूपयांची केली दंडात्मक कारवाई
पिंपरी चिंचवड

महापालिकेतर्फे नवी सांगवीत प्लास्टिक मुक्त अभियान|१५ हजार रूपयांची केली दंडात्मक कारवाई

नवी सांगवी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत नो टू सिंगल युज ऑफ प्लास्टिक अभियान प्रभाग क्रमांक ३१, नवी सांगवी मध्ये घेण्यात आले. साई चौक येथील मंडई परिसरामध्ये व्यवसायिकांना व नागरिकांना अवैध प्लास्टिकचा वापर न करणेबाबत आवाहन करण्यात आले. त्यावेळी बरेच नागरिक प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करत असल्याचे दिसून आले. तसेच “नको दंड नको ना शिक्षा, प्लास्टिक मुक्त पिंपरी-चिंचवड शहर हीच अपेक्षा” या बोधवाक्य चा पाढा वाचत आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी आरोग्य निरीक्षक यांनी प्रभागातील सर्व भाजी विक्रेते, मटन मासोळी व्यावसायिक यांच्याकडून अवैध प्लास्टिकचा वापर न करणे बाबत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व व्यावसायिकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला. ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक आढाव, आरोग्य निरीक्...
महेश प्रोफेशनल फोरमच्या पुढाकाराने आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गोसेवेचा कार्यक्रम संपन्न
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महेश प्रोफेशनल फोरमच्या पुढाकाराने आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गोसेवेचा कार्यक्रम संपन्न

पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरमच्या जॉय ऑफ लाईफ या कार्यक्रमा अंतर्गत, महानगरपालिका व निसर्गराजा मैत्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गो-खाद्य रूपाने गोसेवा हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड महनगरपालिकेचे वरिष्ठ अभियंता प्रवीण लडकत यांनी महपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची यथोचित माहिती दिली आणि पाणी वाचवण्याचे आवाहन केले. स्लाईड शो सहित प्रत्यक्ष शुध्दीकरण केंद्र बघितल्यावर उपस्थितांचा महापालिकेबद्दलचा आदर द्विगुणित झाला. उपिस्थितांनी उत्स्फूर्तपणे पाणी वाचवण्याची शपथ घेतली. जल शुध्दीकरण केंद्राची सफर मनीषा हींगणे यांनी घडवली. "हे काम माझ्या एकट्याचे नसून पूर्ण माझ्या पूर्ण टीमचे कार्य आहे, आम्हास आलेल्या यशास टीमचे मोलाचे सहकार्य आहे." असे मनोगत प्रवीण लडकत यांनी व्यक्त केले. "जलशुध्दीकरण केंद्राच्या कार्याने आम्ही भारावून गेलो." अस...
दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचे समर्पण
पिंपरी चिंचवड

दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचे समर्पण

पिंपरी : पिंपरी चौकात गेल्या वर्षी मानवता हिताय व कामगार बांधकाम सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला 1 वर्ष पुर्ण झाले असून, बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ सर्व वृक्षे त्यांना समर्पित करण्यात आली. तसेच फलकाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी श्रीमती आशा जयंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्षा माधवी जयंत शिंदे, उपाध्यक्ष सतीश भांडेकर, कार्याध्यक्ष दिपक म्हेत्रे, मानवता हितायचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल कोळी यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ऍड. सुशील मंचरकर, नेते व सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख, प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, नितुल पवार, गणेश आहेर, चंद्रकांत बोचकुरे, राहुल विटकर, अजय (बाबा) कांबळे, अजय धोत्रे, अतुल धोत्रे आदी उपस्थित होते. ...