Tag: pcmc

महापालिकेतर्फे नवी सांगवीत प्लास्टिक मुक्त अभियान|१५ हजार रूपयांची केली दंडात्मक कारवाई
पिंपरी चिंचवड

महापालिकेतर्फे नवी सांगवीत प्लास्टिक मुक्त अभियान|१५ हजार रूपयांची केली दंडात्मक कारवाई

नवी सांगवी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत नो टू सिंगल युज ऑफ प्लास्टिक अभियान प्रभाग क्रमांक ३१, नवी सांगवी मध्ये घेण्यात आले. साई चौक येथील मंडई परिसरामध्ये व्यवसायिकांना व नागरिकांना अवैध प्लास्टिकचा वापर न करणेबाबत आवाहन करण्यात आले. त्यावेळी बरेच नागरिक प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करत असल्याचे दिसून आले. तसेच “नको दंड नको ना शिक्षा, प्लास्टिक मुक्त पिंपरी-चिंचवड शहर हीच अपेक्षा” या बोधवाक्य चा पाढा वाचत आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी आरोग्य निरीक्षक यांनी प्रभागातील सर्व भाजी विक्रेते, मटन मासोळी व्यावसायिक यांच्याकडून अवैध प्लास्टिकचा वापर न करणे बाबत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व व्यावसायिकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला. ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक आढाव, आरोग्य निरीक्...
महेश प्रोफेशनल फोरमच्या पुढाकाराने आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गोसेवेचा कार्यक्रम संपन्न
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महेश प्रोफेशनल फोरमच्या पुढाकाराने आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गोसेवेचा कार्यक्रम संपन्न

पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरमच्या जॉय ऑफ लाईफ या कार्यक्रमा अंतर्गत, महानगरपालिका व निसर्गराजा मैत्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गो-खाद्य रूपाने गोसेवा हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड महनगरपालिकेचे वरिष्ठ अभियंता प्रवीण लडकत यांनी महपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची यथोचित माहिती दिली आणि पाणी वाचवण्याचे आवाहन केले. स्लाईड शो सहित प्रत्यक्ष शुध्दीकरण केंद्र बघितल्यावर उपस्थितांचा महापालिकेबद्दलचा आदर द्विगुणित झाला. उपिस्थितांनी उत्स्फूर्तपणे पाणी वाचवण्याची शपथ घेतली. जल शुध्दीकरण केंद्राची सफर मनीषा हींगणे यांनी घडवली. "हे काम माझ्या एकट्याचे नसून पूर्ण माझ्या पूर्ण टीमचे कार्य आहे, आम्हास आलेल्या यशास टीमचे मोलाचे सहकार्य आहे." असे मनोगत प्रवीण लडकत यांनी व्यक्त केले. "जलशुध्दीकरण केंद्राच्या कार्याने आम्ही भारावून गेलो." अस...
दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचे समर्पण
पिंपरी चिंचवड

दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचे समर्पण

पिंपरी : पिंपरी चौकात गेल्या वर्षी मानवता हिताय व कामगार बांधकाम सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला 1 वर्ष पुर्ण झाले असून, बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ सर्व वृक्षे त्यांना समर्पित करण्यात आली. तसेच फलकाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी श्रीमती आशा जयंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्षा माधवी जयंत शिंदे, उपाध्यक्ष सतीश भांडेकर, कार्याध्यक्ष दिपक म्हेत्रे, मानवता हितायचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल कोळी यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ऍड. सुशील मंचरकर, नेते व सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख, प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, नितुल पवार, गणेश आहेर, चंद्रकांत बोचकुरे, राहुल विटकर, अजय (बाबा) कांबळे, अजय धोत्रे, अतुल धोत्रे आदी उपस्थित होते. ...
पिंपरीत मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

पिंपरीत मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त दिवंगत माजी नगरसेवक लक्ष्मणराव (तात्या) गायकवाड व राजेंद्र वंजारे यांच्या स्मरणार्थ नगरसेविका गिता सुशील मंचरकर यांच्या सौजन्याने मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. मानवता हिताय सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी यांच्या उपस्थितीमधे हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी संपूर्ण गायकवाड व वंजारे कुटुंबीय तसेच आरपीआय वाहतुक आघाडीचे अध्यक्ष अजीज शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे, धुराजी शिंदे, नितुल पवार, गणेश आहेर, विशाल वाली, चंद्रकांत बोचकुरे, सतिश भांडेकर, दिपक म्हेत्रे, बळीराम काकडे, मनोज गजभार, अजय शेरखाने, अजय धोत्रे, अतुल धोत्रे, ऍड. अतुल धोत्रे उपस्थित होते....
महापौर माई ढोरे यांची मोशी कचरा डेपोला सदिच्छा भेट
पिंपरी चिंचवड

महापौर माई ढोरे यांची मोशी कचरा डेपोला सदिच्छा भेट

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड : शहराच्या महापौर माई ढोरे यांनी शुक्रवारी (ता. १३ ऑगस्ट) मोशी कचरा डेपोला अचानक सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महापौरांनी कचरा डेपोची व्यवस्थित पाहणी केली. कचरा डेपोमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती घेतली. महापौर कचरा डेपोमध्ये येणार, यामुळे डेपो प्रशासनाने जय्यत अशी तयारी केली होती. यावेळी कचरा डेपोचे प्रशासकीय अधिकारी कुलकर्णी यांनी महापौरांचे स्वागत केले. त्याचबरोबर कचरा डेपोच्या सुरक्षिततेकरिता नेमण्यात आलेल्या सुतीस्का सिक्युरिटी गार्ड यांच्याकडून महापौरांना मानवंदना देण्यात आली....
काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
पिंपरी चिंचवड, सामाजिक

काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

पिंपरी : काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा या भावनेतून काळेवाडी भागातील सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांच्या मदतीने जमा झालेल्या जीवनावश्यक वस्तू हभप समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ पिंपरी चिंचवड या संस्थेचे संस्थापक सुभाष पवार, मनोहर भोसले रमेश साळुंके, सचिन साळुंके, अविनाश उत्तेकर, रवींद्र चव्हाण, नंदु जाधव, निलेश मोरे यांच्याकडे या वस्तू सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख दस्तगीर मणियार, शिवसेना उपशहर प्रमुख हरेश आबा नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, एकनाथ मंजाळ, गणेश आहेर, सुनील विटकर, नेताजी नखाते, संतोष कुंभार, राजेंद्र भरणे, नरसिंग माने शाखा प्रमुख, सावता महापुरे शाखा प्रमुख, जितू वीटकर, अनिल पालांडे, सोमनाथ नळकांडे,...
नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश
पिंपरी चिंचवड

नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांसाठी १५ हजार रूपयांचा धनादेश

काळेवाडी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका निता पाडाळे यांच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना १५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे संस्थापक सुभाष पवार यांच्याकडे पाडाळे यांनी १५ हजार रूपयांचा धनादेश सुपूर्त केला. दरम्यान, पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूची मदत या आधीच तातडीने पाठवण्यात आली होती. त्यावेळी नगरसेविका निता पाडाळे, विलास पाडाळे, गितेश दळवी, मनोहर भोसले, राजु पवार, संतोष चिकणे, अशोक पवार यांच्यासह महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....
PCMC : काँक्रिटीकरणामुळे तापकीर नगरमधील रस्त्यांचे पालटले रूप
पिंपरी चिंचवड

PCMC : काँक्रिटीकरणामुळे तापकीर नगरमधील रस्त्यांचे पालटले रूप

नगरसेविका सुनिता तापकीर व राजदादा तापकीर यांच्या दूरदृष्टीतील टिकाऊ व खड्डेमुक्त रस्त्यांची प्रचिती काळेवाडी : प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीर नगर, ज्योतिबा नगर भागात विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉकची काम पुर्ण झाली आहेत. प्रशस्त व मजबूत झालेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यात नगरसेविका सुनिता तापकीर व भाजप युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांनी विशेष परिश्रम घेतले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मध्ये याआधी रस्त्यांचे डांबरीकरण केले जात होते. परंतू, काही कालावधीनंतर व खोदाईच्या कामामुळे रस्ते खराब होत. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. महापालिकेला सेवा-सुविधा पुरविण्यासाठी विविध कर देऊन चांगले रस्ते मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. हीच बाब लक्षात घेऊन टिकाऊ व ...
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर
पुणे

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर

खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार सुनील शेळके यांच्या सामुहीक प्रयत्नांना यश पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या ५४ कि. मी. लांबीच्या रस्त्यासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील न्हावरा ते चौफुला रस्त्यासाठीही २२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आधी पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे खासदार झाल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी रस्ते विकासाच्या प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार तळेगाव - चाकण - शिक्रापूर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. कोल्हे व आमदार सुनील ...
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आकुर्डीत ध्वजारोहण
पिंपरी चिंचवड

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आकुर्डीत ध्वजारोहण

आकुर्डी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने आकुर्डीगाव महापालिका दवाखाना येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शरण बहादूर यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गणेश दराडे, सतीश नायर, बाळासाहेब घस्ते, क्रांतिकुमार कडुलकर, वीरभद्र स्वामी (माकप), अमिन शेख, विनोद चव्हाण, शिवराम ठोंबरे,नागेश दोडमनी,किसन शेवते,अविनाश लाटकर(DYFI)अपर्णा दराडे, सुषमा इंगोले,यल्लमा कोलगी,रंजिता लाटकर, शेहनाज शेख,शैलजा कडुलकर,मंगल डोळस,मनीषा सपकाळे,कविता मंधोदरे,पूजा दोडमनी(महिला संघटना) आदी कार्यकर्ते उपस्थित होते....