भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार
पुलाचा खर्च ७१ लाखावरून थेट ७.५ कोटीपर्यंत वाढलेल्या खर्चाची चौकशी करून दोषींवर कारवाईची अपना वतनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी (लोकमराठी) : पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील शीतलबाग पादचारी पुलाचा खर्च ७१ लाखांवरून थेट ७.५ कोटीच्या वर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्राप्त माहिती अधिकारातील कागदपत्रानुसार हा प्रकार निदर्शनास आला असून त्यामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे व दाबामुळे तसेच प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, शीतलबाग पादचारी पुलाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत भाजपचे शहराध्यक्ष व...