डॉ. अमरसिंह निकम यांना डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार
माईसन, जर्मनी : डॉ. अँड्रियास एच. जंग यांच्या हस्ते डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार स्विकारला डॉ. डॉ. अमरसिंह निकम.
पिंपरी : पिंपरीगाव येथील डॉ. अमरसिंह निकम यांना आय. एच. झेड. टी. या संस्थेच्या वतीने डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६८ व्या जन्मदिनानिमित्त जर्मनीतील त्यांच्या मूळ जन्मस्थळी माईसन येथे नुकताच हा सोहळा पार पडला.
त्यावेळी सुधा अमरसिंह निकम आणि युरोप मधील बहुसंख्य होमिओपॅथिक तज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. मनिष निकम, डॉ. मनस्वी म. निकम आणि डॉ. सतीश म्हस्के यांनी होमिओपॅथीच्या शोधनिबंधावर आपले व्याख्यान दिले.
डॉ. अमरसिंह निकम हे गेली चाळीस वर्ष होमिओपॅथीद्वारे रुग्ण सेवा देत आहेत. होमिओपॅथीमध्ये संशोधन करून होमिओपॅथीमधील पहिले खाजगी १०० बेडचे हॉस्पिटल, आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल या नावाने चा...