संभाजी ब्रिगेडच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा
पिंपरी चिंचवड : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा संघटक संतोष बनगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल विचार मांडताना पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे म्हणाले की, पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकर्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असं ठनकावत मनामनात क्रांतीची ठिणगी पेटवणारे थोर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी तेरा लोकनाट्य, तीन नाटके, चौदा कथासंग्रह, पस्तीस कादंबर्यां, एक शाहिरी ग्रंथ, पंधरा पोवाडे, एक प्रवास वर्णन, सात चित्रपट कथा, माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन असे विविध साहित्य लिहिणारे लेखक अण्णाभाऊ साठे यांनी रशियाच्या चौकाचौकात छत्रपती शिवरायांची किर्ती पो...