आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे, दि.२१ (लोकमराठी) - आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
राजा कल्याण सुंदराम (रा. पावेदसराई मासई नगर, तांबरम चेन्नई), रविंद्रम गोपीनाथम (रा. नॉर्थ पोलिस क्वॉर्टर, वेल्लूर), यादवराज शक्तीवेल (रा. गांधी स्ट्रीट मुदीचूर तांबरम, चेन्नई) आणि आर सुधाकरण (रा. वेंडलूरू, कांचीपुरम चेन्नई) असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; मागील चार महिन्यात शिरूर शहरातून स्विफ्ट आणि डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले होते. अचानक सुरू झालेल्या या कार चोरीच्या सत्रात, फक्त स्विफ्ट व डिझायर कार चोरी जात असल्याचे निदर्शनास आले. पुणे ग्रामीणचे पोलीस अध...