सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध
अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेऊन पदमुक्त करा - अजित गव्हाणे
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी, दि. ०७ : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्र्यांची सातत्याने बेताल आणि बेजाबदार वक्तव्ये सुरू असून तमाम महिलांचा अवमान या मंत्र्यांकडून केला जात आहे. आमच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासारख्या संसदरत्नाबद्दल अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलेली वक्तव्ये ही अत्यंत अश्लाघ्य, निंदनिय आणि निषेधार्ह आहेत. सत्तार यांनी केवळ माफी मागून चालणार नसून त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत मत प्रदर्शित करताना अत्यंत खालच्या स्तराची भाषा वा...










