एस.एम. जोशी कॉलेजमध्ये प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन
हडपसर, दि. ५ (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील प्लेसमेंट सेल, माजी विद्यार्थी समिती व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात SBI, Airtel, Kotak Mahindra, ICICI, HDFC & Altruist इतर कंपन्या आल्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांना जॉबची ऑफर दिली. तसेच ज्या विद्यार्थ्यांची जॉबसाठी निवड होईल त्या विद्यार्थ्यांना 18 ते 20 हजार रुपयांपर्यंत पगार देण्याची ऑफर दिली आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, महाविद्यालयातून डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला एका हातात डिग्री सर्टिफिकेट मिळावे व दुसऱ्या हातात जॉबचे अपॉइंटमेंट लेटर मिळावे. अशा हेतूने महाविद्यालयात प्लेसमेंट प्रोग्र...










