Tag: Pune

बार्टी तर्फे बेघर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी 
पुणे, सामाजिक

बार्टी तर्फे बेघर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

पुणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. पिंपरीतील जिजामाता रूग्णालयासोबत आयोजन केलेल्या या शिबिरात सावली बेघर नागरिक निवारा येथे ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी जिजाऊ रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साबळे, डॉ. गणेश तागडे व डॉ. स्नेहा जगदाळे, फार्मासिस्ट दूधमल जाधव, लॅब टेक्निशियन प्रीती सनगर व त्यांचे सहकारी स्टाफ तसेच आशा वर्कर, हाॅस्पीटल कर्मचारी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे (Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute) यांचे समतादूत संगीता शहाडे, प्रशांत कुलकर्णी यांनी अथक प्रयत्न करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या शिबिराचा ५५ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला...
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त रहाटणीत स्वच्छता मोहीम
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त रहाटणीत स्वच्छता मोहीम

रहाटणी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडीयम स्कूल येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्तसंयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) व लाल बहादूर शास्त्री (Lalbahadur Shastri) यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व आरोग्य निरिक्षक प्रणय चव्हाण, भुषण पाटील यांनी केले. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिम्मित स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन विद्यार्थ्यांना घरी किंवा घराचे परिसरात बंदी असलेले प्लास्टिक गोळा करून ते शाळेत जमा करण्याबावत आवाहन करण्यात आले . तसेच शाळा परिसराची स्वच्छता करून शाळा ते शिवार चौक ते शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी स्वच्छता मोहिमेचे बॅनर व झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ पिंपरी चिंचवड सुंदर प...
एन.एस.एस. सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू – प्राचार्य डॉ. पंडित शेळके 
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

एन.एस.एस. सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू – प्राचार्य डॉ. पंडित शेळके

पिंपरी : महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग हा सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, चार भिंतीच्या आतील शिक्षण महाविद्यालयात मिळते, तर चार भिंतीच्या बाहेरील समाजशिक्षण राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवक म्हणून कार्य करताना मिळते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे होते. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचार व कार्याचे दाखले देत सामाजिक बांधिलकी व सामाजिक सामिलकीचे धडे राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळतात असा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप नन्नावरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉ. भारती यादव यांनी करून दिला. कार्यक्रमास उपप्राचार्य प्राध्...
ज्येष्ठ मंडळींनी आरोग्य संपन्न करून शतायुषी व्हावे – अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ
पिंपरी चिंचवड

ज्येष्ठ मंडळींनी आरोग्य संपन्न करून शतायुषी व्हावे – अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ

पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२२ : ज्येष्ठ मंडळींनी आपल्या जीवनाची वाटचाल आनंदाने, आरोग्य संपन्नतेने करून शतायुषी व्हावे. असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पोलिस उपआयुक्त मंचक इप्पर, समाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, समाज विकास अधिकारी सुहास बहादरपूरे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव दराडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचे समतादूत प्रशांत कुलकर्णी व संगिता शहाडे तसेच शहरातील विविध भागातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी समाज कल्याण व बार्टीच्या योजनांची माहिती द...
आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी डॉ. देविदास शेलार यांची निवड 
पिंपरी चिंचवड

आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी डॉ. देविदास शेलार यांची निवड

पिंपरी, दि. ०१ ऑक्टोबर २०२२ : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषद ही समाजातील दुर्बल, अन्याय झालेल्या समाजाच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी संस्था आहे. त्याच्या पुणे जिल्हा ( पुणे व पिंपरी चिंचवड शहर ) अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. देविदास हरिश्चंद्र शेलार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना डॉ. देविदास शेलार म्हणाले, "कि आमचा मुख्य उद्देश समाजाला गुन्हेगारी व गुन्हेगारांपासून मुक्त करणे, नागरिकांना कायदेशीर हक्क आणि योग्य न्याय देणे , जनतेच्या मनातून पोलिसांबद्दलची भीती दूर करणे, गरीब आणि असहाय लोकांना मदत करणे, महिलांवरील अत्याचार थांबवन्यासाठी कार्य करणे, पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध, भ्रष्टाचाराला आळा घालणे, लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे, सरकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत (आम आदमीपर्यंत) पोहचवणे, समाजात प्रचलित अ...
पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव

पिंपळे सौदागर, ता. 30 : येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दवाखाना रूग्ण संख्या विचारात घेता अपुरा पडत आहे. तोकड्या जागेमुळे कर्मचाऱ्यांसह रूग्णांचेही मोठे हाल होतात. त्यामुळे लवकरात लवकर या दवाखान्याचा विस्तार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे. याबाबत जाधव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव भागातील जवळजवळ एक ते दिड लाख लोकसंख्या असलेल्या भागातुन लोक उपचार घेण्यासाठी या दवाखान्यात येतात. दररोज किमान १०० ते १५० रुग्ण ओपीडीची सेवा घेतात. संपुर्ण भागात राष्ट्रीय रूग्ण सेवकांचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच बालक लसीकरण मोहीमही यशस्वीपणे राबविण्यात येते. क्षयरोग तपासणी, निदान व उपचार त्याच ठिकाणी केले जातात. परिणामी रुग्ण संख्या रोजच वाढत असते. सर्व रुग्णांची आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, ह्याच...
“सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा” – ज्येष्ठ लेखक संजय आवटे
पुणे, शैक्षणिक

“सर्वधर्मसमभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडावा” – ज्येष्ठ लेखक संजय आवटे

हडपसर (प्रतिनिधी ) : भारत हा सर्वधर्म समभाव जोपासनारा देश आहे. प्रत्येक रयत सेवकाने व विद्यार्थ्यांनी कर्मवीरांनी दिलेल्या मूल्यांचे जतन करण्याचा हा काळ आहे. रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस घडत आहे. हा माणूस जात-धर्म पंथाच्या पलीकडे जाणारा असावा. सर्व धर्म समभाव जोपासणारा माणूस रयतेमधून घडायला पाहिजे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर व कर्मवीर यांनी दाखवलेली वाट हीच प्रकाशाची वाट आहे. महापुरुषांना जाती धर्मात न बांधता आपण सर्व माणूस होण्याचा प्रयत्न करूया. जातीचा अंत झाला, तरच भारत देश महान होईल. भव्य दिव्य स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईला थोर महापुरुषांचे विचार समजावून सांगितले तरच संस्कारित पिढी निर्माण होईल. ही पिढी भारत देशाला बलवान करेल. आपण सर्वजन कर्मवीरांचा समतेचा व मानवतेचा विचार समाजात रुजवूया. असे विचार प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखक संपादक मा. संजय आवटे यांनी एस. एम. जोशी कॉलेजमध्य...
ॲड. संजय माने यांच्या मातोश्रींचे निधन
पिंपरी चिंचवड

ॲड. संजय माने यांच्या मातोश्रींचे निधन

पिंपरी, ता. २७ सप्टेंबर २०२२ : ज्येष्ठ पत्रकार ॲड. संजय माने यांच्या श्रीमती मातोश्री इंदुबाई गणपत माने (वय ७२ वर्षे ) यांचे सोमवारी (ता. २६) रात्री निधन झाले. त्यांच्या मागे ॲड. सुनील माने आणि ॲड. संजय माने, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीमती इंदुबाई माने यांच्या पार्थिवावर पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभुमी येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंतीनिमित्त ज्येष्ठ लेखक व संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

हडपसर, ता. २६ (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर व रयत शिक्षण संस्थेचे साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 वा जयंती सोहळा मंगळवार दि. 27 सप्टेंबर 2022 सकाळी 10:30 वाजता संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक, दैनिक लोकमतचे संपादक मा. संजय आवटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे, विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, उपविभागीय अधिकारी एस .टी. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. अशी माहिती एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी दिली....
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन नाविण्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रथम महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करुन 'ईवेस्ट कचऱ्याची समस्या' या विषयावर अत्यंत प्रभावी पथनाट्य तयार केले. त्यानंतर हडपसर येथील साधना संकुलातील शाळा व माळवाडी गावात जावून पथनाट्य सादर केले. या पथनाट्यास विद्यार्थी व नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पथनाट्याचे संवाद व दिग्दर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक विराज नवले याने केले. या पथनाट्यात १६ विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या १२० स्वयंसेवकांनी महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता केली. अशा प्रकारचा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची प्रेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी द...