शिवजयंतीचा वाद का?
डॉ. श्रीमंत कोकाटे
आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले, कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा वाद नाही, मग शिवजयंतीचाच वाद का? शिवाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव आज देखील इतका आहे की त्यांच्या कार्याला पदोपदी विरोध करणाऱ्यांना शिवजयंतीचा वाद घालून त्यांच्या कार्याचे महत्व कमी करण्याचा खोडसाळपणा करावा लागतोय. शिवाजीराजांच्या कार्याचा प्रभाव जगभर जाऊ नये, त्यांचे कृषी धोरण, युद्ध धोरण, प्रशासन धोरण, आरमार, महिला विषयक धोरण, स्थापत्यशास्त्र, धार्मिक धोरण, गुप्तचर यंत्रणा, समतावादी तोरण, बुद्धिप्रामाण्यवाद इत्यादी विषयावर चर्चा होऊ नये. जयंतीचा वाद निर्माण करून सनातनी व्यवस्थेने छत्रपती शिवाजीराजे यांची अवहेलना सुरू ठेवलेली आहे. त्यांच्या जागतिक प्रभावाला पायबंद घालण्यासाठी शिवजयंतीचा वाद निर्माण केला जातो.
कोणत्याही व्यक्तीचा जन्म एकदाच होतो. तो तीन-तीन होत नाही. तीन वेळा शिवजयंत...