पुणे, दि ७ (लोकमराठी) – जुन्नर परिसरात दशक्रिया विधीसाठी घरातील लोक बाहेर गेल्याचा फायदा घेवुन घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करत ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
आकाश प्रकाश विभुते (वय ३२ वर्षे, सुपली, पो. पळशी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, सध्या रा. फुलसुंदर अपार्टमेंट, आनंदवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे या सरईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्हात वाढत्या घरफोडयाचे प्रमाण लक्षात घेवुन पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना घरफोड्यांबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना घरफोडया उघडकिस आणणेबाबत योग्य मार्गदर्शन तसेच तपास कौशल्य सांगून कारवाईचे आदेश दिले. त्या अनुशंगाने जुन्नर तालुक्यात दशक्रियाविधीच्या वेळी घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधुन दिवसा घरफोडी झाल्याच्या दोन मोठ्या घटना जुन्नर तालुक्यात घडल्या होत्या. गुन्हांची गांभीर्याने दखल जुन्नर विभागात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे काम करणारे पथकाने गोपणीय माहितीचे आधारे संशयीतांना नारायणगाव परीसरातून ताब्यात घेवुन सदर संशयीत आरोपीकडुन जुन्नर तालुक्यातील गोळेगाव व निरगुडे गावचे मुळ रा. हद्दीतून दिवसा घरफोडी चोरी करून चोरी करून चोरलेले एकुण ८ तोळे ७ ग्रम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हात वापरलेली मोटार सायकल असा एकूण ५ लाख ४६ हजार ४८१ /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत जुन्नर पोलीस स्टेशन १) गु. र. नं. १३० / २०२३, भा.दं.वि. कलम ४५४, ३८०२) गु. र. नं. १३३ / २०२३, भा.दं.वि. कलम ३८० प्रमाणे असे दोन दिवसा घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणले आहेत.
गुन्हात ताब्यात घेतलेला संशयीत आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन सदर आरोपी याचेवर यापुर्वी सोलापुर जिल्हात सांगोला पोलीस स्टेशन गु. रं. नं. २६२ / २०२२, भा.दं.वि. ४५४, ३८०, ३४ व करंकब पोलीस स्टेशन गु. रं. नं. ४६ / २०२२, भा.दं.वि. ३८०, ४६१, ३४ प्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.
ही कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर विभागाचे उपविभागिय पोलीस अधिकारी मंदार जवळे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोहवा दिपक साबळे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, राजू मोमीण, चंद्रकांत जाधव, पोना संदिप वारे, पोकॉ अक्षय नवले, चापोकॉ दगडु विरकर यांनी केली आहे.