काळेवाडीतील २२ वर्षीय शिक्षिकेचा डेंग्यूने मृत्यू

काळेवाडीतील २२ वर्षीय शिक्षिकेचा डेंग्यूने मृत्यू 

पिंपरी : डेंग्यू झाल्याने काळेवाडीतील एका २२ वर्षीय तरुण शिक्षिकेचा शुक्रवारी (ता. ४) एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. शिक्षक घराण्यातील ही तरुणी नुकतीच पिंपरीतील पोतदार शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती.

ऋतुजा श्रावण भोसले (वय २२ रा. साईनाथ कॉलनी, काळेवाडी) असे या मृत शिक्षिकेचे नाव आहे. या शिक्षिकेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे बोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, ऋतुजाचे वडील श्रावण भोसले हे देखील काळेवाडीतील एका शिक्षण संस्थेत क्रिडा शिक्षक आहेत.