मोठी बातमी

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य – राजेंद्र कोळी
महाराष्ट्र, मोठी बातमी

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य – राजेंद्र कोळी

किनवली (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याचे काम विद्यार्थीदशेतच केले तर विज्ञाननिष्ठ पिढी घडवायला जास्त प्रभावी ठरेल होते. असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सांस्कृतिक विभाग समितीचे सदस्य राजू कोळी यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्त आयोजित किनवली येथील महाविद्यालयात बोलत होते. २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध वैज्ञानिक सी व्ही रमण यांनी आपले शोध याच दिवशी १९२८ ला जगापुढे मांडलेत. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विविध शाळा कॉलेजेस मध्ये जावून या विज्ञान दिनाच्या निमित्ताने सातत्याने प्रबोधना...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्यातर्फे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे वाटप
मोठी बातमी, महाराष्ट्र

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्यातर्फे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे वाटप

ठाणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : शिवजयंती निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे वाटप डोंबिवलीत ठिक-ठिकाणी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, राष्ट्र सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंबिवली एमआयडीसी येथील शिवाई बालक मंदिर मधील विद्यार्थ्यांना शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप करून छत्रपती शिवारायांची माहिती देण्यात आली. एमआयडीसीतील रिक्षा स्टँड वरील रिक्षाचालकांसह अनेकांना या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. डोंबिवली येथील लोढा हेवन ग्रीन पार्क सोसायटी मधील मुलांनासुद्धा या पुस्तकाचे वाटप करून व समाजातील लहान थोरांपर्यंत शिवाजी महाराजांचे खरे चारित्र पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवरायांचे दैवती...
छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : अतुलनीय वैश्विक योध्या, कुशल प्रशासक, हिंदू पद्पातशाहीचे निर्माते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. ते केवळ मराठ्यांचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रशासनाचा, गनिमी काव्याचा, युद्धतंत्राचा आज जगभर अभ्यास केला जातो. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व रयत विद्यार्थी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. “छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण” या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश बोलत होते. त्यावेळी पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ...
इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारून कुंदाताईंनी निर्माण केला आदर्श – महापौर माई ढोरे
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारून कुंदाताईंनी निर्माण केला आदर्श – महापौर माई ढोरे

पिंपळे सौदागरमधील उन्नती कार्यालय येथे चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडमधील मोफत चार्जिंग देणारा एकमेव पायलट प्रोजेक्ट पिंपरी : इंधनावरील वाहनांची संख्या वाढल्यामुळे पर्यावरण संवर्धनाला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे निर्माण होणा-या प्रदुषणामुळे नागरिकांच्या जीवनावर दुरगामी परिणाम होत आहे. प्रदुषणाला आळा बसून पर्यावरण संवर्धन होण्यासाठी आपल्याला विधायक पाऊल उचलायला हवे. झाडे लावण्याबरोबरच कुंदाताई भिसे यांनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन सुरू करून इलेक्ट्रीक वाहणे वापरणा-यांना प्रोत्साहन दिले आहे. इलेक्ट्रीक वाहनांना न नफा न तोटा या तत्वावर मोफत चार्जिंगची सुविधा निर्माण करून कुंदाताईंनी पिंपरी-चिंचवडमध्ये आदर्श निर्माण केला आहे, अशी भावना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केली. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसरातील इलेक्ट्रीक वा...
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक, साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे निधन
महाराष्ट्र, मोठी बातमी

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक, साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे निधन

बुलढाणा : येथील भारत विद्यालयाचे ग्रंथपाल, साहित्यिक आणि अनेक साहित्यिकांना घडविणारे नरेंद्र लांजेवार यांनी रविवारी सकाळी लद्धड हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना ऑक्सिजन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मागे त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली. परंतु नंतर ती खालावली. रविवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने राज्यभरातील साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेचे सक्रिय कार्यकर्ते होते, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे ते संपादक मंडळ सदस्य होते, वार्तापत्रात त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले आहे....
संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला | बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन
महाराष्ट्र, मोठी बातमी

संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला | बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे निधन

पुणे, ता १२ : देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या बजाज समूहाची धुरा तब्बल ४० वर्षे यशस्वीरित्या वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती व बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज (वय ८३) यांचे आज पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राहुल बजाज यांच्या निधनामुळे एक संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला आहे. नॉन कोविड न्यूमोनियामुळे त्रस्त असलेल्या राहुल बजाज (Rahul Bajaj) यांच्यावर मागील १५ दिवसांपासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. न्यूमोनियामुळे त्यांचे फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले. त्यानंतर हृदयक्रियेवर परिणाम झाल. वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. त्यामुळं त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बजाज समूहाने निवेदन प्रसिद्धीस देऊन त्यांच्या निधनाची माहिती दिली...
अपघातानंतर “वायसीएम”मध्ये घात |कोणाचाही ‘आधार’ अंथरुणाला खिळून राहू नये
मोठी बातमी, विशेष लेख

अपघातानंतर “वायसीएम”मध्ये घात |कोणाचाही ‘आधार’ अंथरुणाला खिळून राहू नये

रोहित आठवले युवकाचा अपघात होतो.. शस्त्रक्रिया करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले गेल्याने पोटच्या गोळ्याला पुन्हा उभे करण्यासाठी आईची धडपड सुरू होते. परंतु, आपल्या जखमी मुलाला ओरबडण्यास "वायसीएम"ची श्वापदसज्ज असल्याचे पाहून ती माऊली पुरती हादरून जाते. डॉक्टरांनी सांगितलेली सामुग्री ठराविक कंपनी (ठेकेदार) कडून खरेदी केली नसल्याने तुमच्या मुलाची शस्त्रक्रिया अयशस्वी होईल अशी भीती दाखवून वस्तूरुपी (इंप्लांट) खंडणी उकळली जाते. मात्र, जुनी प्रकरण उकरून गुन्हे दाखल करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या पोलिसांना या घटनेची महिन्यानंतर साधी कल्पना सुद्धा नाही. शहरात गेल्या महिन्याभरात हा सगळा घटनाक्रम घडला आहे. परंतु, आपल्या मुलाबाळांना निवडणुकीचे तिकीट मिळावे म्हणून धडपडणाऱ्या स्थानिक धेंडांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास वेळ झालेला नाही. तर दुसरीकडे दर शुक्रवारी पुण्यात जाऊन दादांच्या पाया पडणाऱ्...
वीज बिलात तोडपाणी करत महावितरण अधिकाऱ्यांचा लाखोंचा भ्रष्टाचार | माहिती अधिकार कार्यकर्त्यांने उघड केला धक्कादायक प्रकार
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

वीज बिलात तोडपाणी करत महावितरण अधिकाऱ्यांचा लाखोंचा भ्रष्टाचार | माहिती अधिकार कार्यकर्त्यांने उघड केला धक्कादायक प्रकार

https://youtu.be/V88Zbup-cjE रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : लॉकडाऊन काळात अंदाजे मीटर रिडींगद्वारे आलेले अव्वाच्या सव्वा बिल नंतर तोडपाणी करून लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाला आहे. पिंपरीतील माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश रोचिरमानी यांनी हा धक्कादायक प्रकार उघड केला आहे. मात्र, या प्रकाराची तक्रार रोचिरमानी यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊनही महावितरणकडून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी आहे की, रोचिरमानी यांना महिन्याला अडीच ते तीन हजार रुपये येणारे वीज बिल, मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० दरम्यान ३४ हजार रुपये आले. या बिलाबाबत रोचिरमानी यांनी महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयात भरपुर चकरा मारल्या. मात्र, बिल बरोबर असल्याचे सांगत बिलात कमी होणार नाही. असे रो...
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

पिंपरी : शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी खासदार गजानन धरमसी बाबर (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता. २) दुपारी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. गेली तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक झाली. सायंकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पिंपरी चिंचववड शहरात शोककळा पसरली. बाबर यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११ वाजता निगडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे बंधू मधुकर बाबर यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री, उद्योजक धीरज आणि सुरज ही दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक मधुकर बाबर, प्रकाश बाबर हे त्यांचे धाकटे बंधू तर, माजी नगरसेविका शारदा बाबर या भावजयी होत. पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेच्या स्थापनेपासून संघटना रुजविण्यापर्यंत बाबर यांचे मोठे योगदान...
सालगड्याच्या पोराला नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने काय काय केले?
मोठी बातमी, राजकारण

सालगड्याच्या पोराला नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने काय काय केले?

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क अहमदनगर : कर्जत नगरपंचायतीसाठी (Karjat Nagar Panchayat) दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) असा थेट सामना रंगला होता. कर्जत नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता होती. ही सत्ता राखण्यासाठी शिंदेंनी सर्व शक्ती पणाला लावली. मात्र, रोहित पवार यांनी भाजपचा गड भेदण्यासाठी जोरदार रणनिती आणल्याने कर्जत नगरपंचायत भाजपच्या हातून निसटली. भाजपला अवघ्या दोनच जागा जिंकता आल्या, तर राष्ट्रवादीने १२ जागांवर विजय प्राप्त करत एकहाती सत्ता मिळली. हा पराभव भाजपच्या खुपच जिव्हारी लागला असून जिल्हा परिषद कोरेगाव गटाचे पप्पू धोदाड यांनी एक भावनिक पोस्ट प्रसारीत केली आहे. पप्पू धोदाड यांनी म्हटले आहे की, कुठ तरी एका वृतपत्रात&n...