वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य – राजेंद्र कोळी
किनवली (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याचे काम विद्यार्थीदशेतच केले तर विज्ञाननिष्ठ पिढी घडवायला जास्त प्रभावी ठरेल होते. असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सांस्कृतिक विभाग समितीचे सदस्य राजू कोळी यांनी व्यक्त केले.
ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्त आयोजित किनवली येथील महाविद्यालयात बोलत होते. २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध वैज्ञानिक सी व्ही रमण यांनी आपले शोध याच दिवशी १९२८ ला जगापुढे मांडलेत. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विविध शाळा कॉलेजेस मध्ये जावून या विज्ञान दिनाच्या निमित्ताने सातत्याने प्रबोधना...