मोठी बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधातील राष्ट्रध्वज अवमानाची तक्रार निराधार | कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधातील राष्ट्रध्वज अवमानाची तक्रार निराधार | कायदा काय सांगतो?

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या विरोधात अ‍ॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे अ‍ॅड. पाटील यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे. मात्र, अ‍ॅड पाटील यांचा हा आरोप निराधार असल्याचे लोकमराठी न्यूजच्या पडताळणीत पुढे आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या...
अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या आंदोलनाची सरकार दरबारी अद्यापि दखल नाही | दिवस आठवा
महाराष्ट्र, मोठी बातमी

अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या आंदोलनाची सरकार दरबारी अद्यापि दखल नाही | दिवस आठवा

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना स्वतःच्या आश्‍वासनाचा विसर? | कोरोना योद्ध्यांची 'गरज सरो वैद्य मरो' अशी दूरावस्था का? आंदोलन अधिक तीव्र करणार!...आंदोलकाचा इशारा! मुंबई (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : जेजे हॉस्पिटलमधील महाराष्ट्रातील अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस. परंतु शासन दरबारी आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा दिलेल्या कोरोना योद्ध्यांकडे सरकार दुर्लक्षित करत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना स्वतः त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, असे दिसते. महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी वारंवार निवेदन देऊनही, सेवा नियमित करण्याचा न्याय शासन देत नाही, हे दिसल्यानंतरच आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेले आहेत. जे जे रुग्णालयात गेल्या सात दिवसांपा...
पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची गुटखा विक्रेत्यावर कारवाई | दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची गुटखा विक्रेत्यावर कारवाई | दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : गुटखा बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारावर पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून सुमारे दोन लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला. ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरगाव परिसरात शनिवारी (ता. २२ जानेवारी) करण्यात आली. अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली. महेंद्र पनाराम भाटी (वय २६, रा. सर्व्हे नंबर १८/८ शिव कॉलनी, गणेश नगर, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात विविध कलमान्वये वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त डॉ. डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार सामाजिक सुरक्षा पथक गोपनिय माहिती काढत होते. त्यावेळी २२ जानेवारी २०२२ ...
सुभाषबाबूंचे गांधी-नेहरू-पटेलांशी मतभेद नेमके कुठं होते?
मोठी बातमी, विशेष लेख

सुभाषबाबूंचे गांधी-नेहरू-पटेलांशी मतभेद नेमके कुठं होते?

डॉ. विश्वंभर चौधरी १. पहिल्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर सुभाषबाबूंनी स्वतःच्याच कार्यकारिणीवर टीका केली. 'काॅग्रेसची कार्यकारिणी इंग्रजधार्जिणी आहे' अशी टीका खुद्द काॅग्रेस अध्यक्षच करू लागल्यानं मोठी विचित्र स्थिती निर्माण झाली. कार्यकारिणीवर विश्वास नसेल तर सुभाषबाबूंनी आपल्या मनाप्रमाणे स्वतंत्र कार्यकारिणी निवडावी अशी रास्त सूचना गांधीजींनी केली. याचा अर्थ सुभाषबाबूंनी 'असहकार' असा घेतला. वस्तुतः तो स्वयंनिर्णयाचा अधिकार होता. २. जो शब्द नेहरू विरोधकांना अजिबात आवडत नाही, 'समाजवाद' त्याच शब्दांनी सुभाषबाबू -नेहरू जोडले गेले होते. काॅग्रेसमध्ये बराच काळ सुभाषबाबू-नेहरू एक गट आणि मोतीलाल नेहरू, सरदार पटेल- गांधी असा दुसरा गट होता. आता इथं हिंदुत्ववाद्यांना एकतर पटेलाना नाकारावं लागतं नाही तर बाबूंना! पण हा इतिहासच त्यांना माहित नसल्यानं ते दोघांनाही तितक्याच राजकीय आत्मियतेनं कवटाळतात...
सोशल मीडियाची वाटचाल अँटी सोशलतेकडे | डूग्गु सापडला मात्र शोधपत्रिका जीवावर बेतली असती
मोठी बातमी, विशेष लेख

सोशल मीडियाची वाटचाल अँटी सोशलतेकडे | डूग्गु सापडला मात्र शोधपत्रिका जीवावर बेतली असती

रोहित आठवले घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावरून अपहरण झालेला मुलगा पूनावळे येथे बांधकाम साईट वर सोडून देण्यात आला. पिंपरी चिंचवडकरांनी अंडरवर्ल्डचा अपहरणाशी संबंध ते अनेक प्रकरणात कोर्टात कुटुंबाने साक्षी फिरवण्याच्या घटना पाहिल्या आहेत. डूग्गुला पूनावळेमध्ये कोणी सोडले. या प्रकरणात जवळच्या कोणाचा सहभाग आहे का हे पोलिसांच्या तपासातून पुढे येईल. पण तो पर्यंत सोशल मीडियावर झालेला अतातायीपणा कसा घडला आणि आरोपी कुठे कुठे फिरला ते वाचूयात... डूग्गुच्या जीवावर बेतणारे आणि पोलिसांना तपासात व्यत्यय येईल असे अँटी सोशल काम सोशल मीडियाद्वारे अनेकांनी मागील काही दिवसात केले आहे. पत्रकारांना बातमीची कायमच जीवघेणी स्पर्धा असतानाही एकानेही ब्रेकिंग अथवा तपास कसा सुरू आहे, तपास का थंडावला, तपासात कुठे कोण चुकले या बातम्या केल्या नाहीत. याला दोन तीन अपवादही ठरले....
कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा | आ. रोहित पवार यांनी दिला राम शिंदेना पराभवाचा झटका
मोठी बातमी, महाराष्ट्र, राजकारण

कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा | आ. रोहित पवार यांनी दिला राम शिंदेना पराभवाचा झटका

कर्जत, ता. १९ (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने १५ जागेवर एकहाती विजय मिळवत भाजपाचा दारुण पराभव केला. माजीमंत्री राम शिंदे यांना अवघे दोनच जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा आ. रोहित पवार यांनी राम शिंदेना पराभवाचा झटका देत कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्तातंर घडविले. कर्जतकरानी राम शिंदे यांनी प्रचारादरम्यान आ. रोहित पवार यांच्यावर दहशतीच्या राजकारणाचा केलेला आरोप खोडून काढला. सर्वच विजयी उमेदवारांनी ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांचे आशीर्वाद घेत जल्लोष केला. मात्र, राष्ट्रवादीच्या मनीषा सोनमाळी यांचा प्रभाग क्रमांक चारमधील पराभव राष्ट्रवादीस जिव्हारी लागला. कर्जत नगरपंचायतीच्या एकूण १७ जागेसाठी ८१.८७% मतदान संपन्न झाले होते. या सर्व जागेची मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजता कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात दोन फेरीत ...
औंध रावेत बीआरटी रस्त्यावर होणाऱ्या शंभर कोटींची उधळपट्टी थांबवा – राहुल कलाटे
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

औंध रावेत बीआरटी रस्त्यावर होणाऱ्या शंभर कोटींची उधळपट्टी थांबवा – राहुल कलाटे

https://youtu.be/imvbi7YfxlA ४० कोटींचे काम थेट पद्धतीने दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा पिंपरी : औंध रावेत बीआरटी मार्ग रस्ता सुस्थितीत असतानाही येथे नागरिकांच्या करातील शंभर कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पत्रकारांसमवेत या मार्गाचा पाहणी दौरा केला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कलाटे बोलत होते. कलाटे यावेळी म्हणाले की, हा रस्ता बनविताना पुढील पंचवीस वर्षे चे नियोजन केले होते त्यावेळी दोनशे कोटी खर्च केला होता आता सुशभिकरणाच्या नावाखाली शंभर कोटी रुपयांची रक्कम अनाठायी खर्च करण्याचे नियोजन आयुक्त राजेश पाटील का करीत आहेत. यामधे सांगवी फाटा ते कावेरीनगर रस्ता, डांगे चौक ते ताथवडे रस्ता आणि औंध ते रावेत या रस्त्यांचे डांबरीकरण आणि...
पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू – महापौर माई ढोरे
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू – महापौर माई ढोरे

पिंपरी : “पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू,” अशा शब्दात महापौर उषा माई ढोरे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाच्या व्यक्तीबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपच्या वतीने आज पिंपरीत नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले भाष्य हे निंदनीय आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं शोभत नाही. त्यांना मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची किंमत कळत नसेल तर ते काँग्रेसचे अध्यक्ष करण्याच्या लायकीचे नाहीत. काँग्रेस पक्ष अशा नालायक लोकांना अध्यक्ष कर...
पिंपरी चिंचवड महापालिका रस्ते सफाईच्या टेंडरमध्ये बोगस ‘बँक गॅरंटी’ | फसवणूक करणाऱ्या कंपनीमागे राजकीय वरदहस्त?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड महापालिका रस्ते सफाईच्या टेंडरमध्ये बोगस ‘बँक गॅरंटी’ | फसवणूक करणाऱ्या कंपनीमागे राजकीय वरदहस्त?

https://youtu.be/s5lgHnr2iA0 सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीचा प्रताप भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांच्याकडून पर्दाफाश रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. १३ : पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांसह आता बोगस ‘बँक गॅरंटी’सादर करुन महापालिकेसह संबंधित बँकेचीही मोठी फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती भाजपा नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamathe) यांनी आज पत्रकार परिषदेत चव्हाट्यावर आणली आहे. महापालिका 'अ' आणि 'ब' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते-गटर सफाईच्या निविदेतून तब्बल ५५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप यापूर्वीच नगरसेवक कामठे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत पुराव्यानिशी उघड केला होता. संबंधित सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट ठेकेदार संस्थेने इंदापूर नगरपरिषद आणि तुळजापूर, जि. उस्मानाबाद ...
काळेवाडीत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण | विवेक तापकीर यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

काळेवाडीत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण | विवेक तापकीर यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

काळेवाडी : तापकीर नगरमधील साई मल्हार कॉलनीत महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी. अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष व काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत तापकीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साई मल्हार कॅालनीमधील डांबरीकरण अनेक वर्षापासून प्रलंबित होते. मात्र, आता महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले डांबरीकरण फक्त सुशोभिकरणासाठी केले आहे, असे दिसून येत आहे. सदर डांबरीकरण आयुक्तांनी स्वतः जातीने उपस्थित राहत पाहणी करून याचा दर्जा पाहून पुढील कार्यवाही करावी. तसेच अनेक ठिकाणी पॅचेस आहेत, माल कमी पडला म्हणून मोठी डांबरखडी न हातरता, लहान खडीचे डांबरीकरण...