महाराष्ट्र

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैनिकाला अटक | अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांचे धरणे आंदोलन
महाराष्ट्र, मोठी बातमी

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैनिकाला अटक | अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांचे धरणे आंदोलन

अहमदनगर : पत्नीला आत्महत्येसह प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैन्यदलातील सैनिकाला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांनी कर्जत येथील हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (ता. २) धरणे आंदोलन केले. प्रदिप अनिल शिंदे (रा. पाटेगाव) असे अटक केलेल्या सैनिकांचे नाव आहे. तर स्नेहा प्रदिप शिंदे असे मृत विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबरला स्नेहा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना प्रदिप यांना समजताच ते कर्तव्यावर असलेल्या ठिकाणांहून कमांडींग ऑफिसरच्या सूचनेनुसार थेट कर्जत पोलिस ठाण्यात हजर झाले. तेथून ते पोलिसांसह पत्नीच्या अंत्यविधीसाठी गावी गेले. मात्र, स्नेहा यांच्या आईने प्रदिप यांच्यासह सासरची मंडळी व इतर नातेवाईकांविरोधात फिर्याद दिल्याने कर्जत पोलिसांनी प्रदिप यांना अटक केली. फिर्यादीत म्हटले आहे की, हुड्यांतील ...
घातक शस्त्र व अंबर दिव्यासह डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने आरोपी केला जेरबंद
महाराष्ट्र

घातक शस्त्र व अंबर दिव्यासह डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने आरोपी केला जेरबंद

अहमदनगर : दोन तलवारी आणि अंबर दिव्यासह वाहन जप्त करून एकास मोठ्या शिताफीने कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव आणि पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ३१ रोजी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे रात्रगस्त करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वर येथील दत्तू मुरलीधर सकट रा. सपकाळवस्ती याने आपल्या घरात व वाहनात विनापरवाना बेकायदा दोन घातक लोखंडी तलवारी लपवून ठेवल्या आहेत. अशी माहिती मिळताच बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.जाधव यांनी तात्काळ त्यांचे कडील पोलीस पथक बोलावून टाकळी गावात वस्तीवर जाऊन सकट याच्या राहत्या घराची आणि दारा समोर उभी असलेल्या पांढऱ्या रंगाची टाटा सफारी(एम. एच.१६आर ४८३३)याची झडती घेतली असता त्यात दोन लोखंडी तलवारी आणि एक नारंगी रंगाचा अंबर दिवा ...
मिरजगावातील १३ रूग्णांसह कर्जत तालुक्यात सापडले २५ कोरोना रूग्ण | बेशिस्त नागरिकांमुळे वाढतेय संख्या
महाराष्ट्र

मिरजगावातील १३ रूग्णांसह कर्जत तालुक्यात सापडले २५ कोरोना रूग्ण | बेशिस्त नागरिकांमुळे वाढतेय संख्या

अहमदनगर : कोरोना नियंत्रणासाठी शासनाने घालून दिलेले नियम नागरिकांकडून पाळले जात नाहित. त्यामुळे कर्जत तालुक्यात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस भर पडत आहे. आज (ता. २३ ऑक्टोबर) एकुण २५ कोरोना (कोविड-19) रूग्ण सापडले. आजमितीस तालुक्यातील कोरोना रूग्ण संख्या १७०८ झाली असून त्यापैकी १४७० रूग्ण बरे झाले आहेत. तर २१५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. मिरजगावात वाढतेय संख्या मिरजगाव हे तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठे असलेले गाव असल्याने दररोज मोठी वर्दळ याठिकाणी असते. मात्र, सोशल डिस्टसिंग, मार्क, हाताची स्वच्छता आदी सुरक्षेच्या बाबींकडे नागरिक, व्यावसायिक, सरकारी तसेच खासगी कार्यालयातील व बँकेतील कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मिरजगावात कोरोना रूग्णांची ...
#COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले नवीन १९ कोरोना बाधित रूग्ण
महाराष्ट्र

#COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले नवीन १९ कोरोना बाधित रूग्ण

अहमदनगर : कर्जत तालुक्यात आज (ता. २१ ऑक्टोबर) एकुण १९ कोरोना (कोविड-19) बाधित रूग्ण सापडले. आजमितीस १६७२ कोरोना रूग्ण संख्या झाली असून त्यापैकी १४५४ रूग्ण बरे झाले आहेत. तर १९५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. गावानुसार आज सापडलेले रूग्ण : 1.ताजु-01 2.चापडगाव-01 3.मिरजगाव- 09 4.बाभूळगाव खालसा-02 5.कोकणगाव-01 6.थेटेवाडी-01 7.करपडी-01 8.कर्जत-03...
मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात | आमदार रोहित पवार यांचा भाजपच्या पडळकरांवर पलटवार
राजकारण, महाराष्ट्र

मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात | आमदार रोहित पवार यांचा भाजपच्या पडळकरांवर पलटवार

लोकमराठी न्यूज नेटवर्क अहमदनगर : आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघातील खराब रस्त्यांवरून टिका करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आमदार रोहित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात, अस मी विचारणार नाही. पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा. असा पलटवार रोहित पवार यांनी पडळकरांवर केला आहे. आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, माझ्या मतदार संघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण य...
COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले नवीन ३५ कोरोना बाधित रूग्ण
महाराष्ट्र

COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले नवीन ३५ कोरोना बाधित रूग्ण

अहमदनगर : कर्जत तालुक्यात आज (ता. ३ ऑक्टोबर) एकुण ३५ कोरोना (कोविड-19) बाधित रूग्ण सापडले. आजमितीस १४०१ कोरोना रूग्ण संख्या झाली असून त्यापैकी ११३४ रूग्ण बरे झाले आहेत. तर २४४ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. गावानुसार आज सापडलेले रूग्ण : 1.बहिरोबावाडी-02 2.भांबोरा-02 3.देशमुखवाडी- 01 4.राशीन- 03 5. परीटवाडी- 02 6.मिरजगाव- 03 7.रेहेकुरी-01 8.कर्जत-13 9.कोपर्डी-01 10.चिंचोली रमजान-02 11.रातंजन-02 12.डीकसळ-01 13.धांडेवाडी-02...
#COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले १३ कोरोना बाधित रूग्ण
महाराष्ट्र

#COVID-19 Update : कर्जत तालुक्यात सापडले १३ कोरोना बाधित रूग्ण

अहमदनगर : कर्जत तालुक्यात आज (ता. १ ऑक्टोबर) एकुण १३ कोरोना (कोविड-19) बाधित रूग्ण सापडले आहेत. अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. गावानुसार आज सापडलेले रूग्ण : 1.कर्जत-02 2.चिलवडी-03 3.चिंचोली काळदात - 02 4.चापडगाव - 01 5. दुरगाव- 01 6.वालवड- 01 7.बारडगाव सुद्रीक-01 8.निमगाव डाकू-02
मोठी बातमी, ताज्या घडामोडी, महाराष्ट्र

#COVID-19: कर्जतमध्ये १३ आरोपीसह ४२ जण कोरोना बाधित

अहमदनगर : कर्जत तालुक्यात बुधवारी ४२ रूग्ण कोरोना (covid-19) सापडले आहेत. त्यामध्ये सबजेलमधील १३ आरोपींचा समावेश आहे. रविवारी (ता. २७) कर्जत पोलिस ठाण्यातील सात पोलिस तर राशीन पोलिस ठाण्यातील एक पोलिस कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्याअनुषंगाने सबजेलमधील १९ आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा आरोपी कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, कर्जत तालुक्यात एकुण १३३३ कोरोना रूग्णांपैकी १०६२ रूग्ण बरे झाले असून २४८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजतागायत २३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रूग्णांचा गावानुसार तपशील खालीलप्रमाणे : 1.कर्जत-04 2.दुरगाव-03 3.कुळधरण - 01 4.चापडगाव - 02 5. खांडवी- 01 6.नेटकेवाडी - 01 7.निमगाव गांगरडा-02 8.अळसूनदे-04 9.मिरजगाव-02 11.चिंचोली काळदात-02 12.राशीन-01 13.बहिरोबावाडी-02 14.रुईगव्हान-01 15.सितपु...
हमी भावाने उडीद खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरुवात – पणन मंत्री बाळासाहेब पाटील
महाराष्ट्र

हमी भावाने उडीद खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरुवात – पणन मंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला दि.१ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात होणार आहे अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाने उडीदसाठी हमी भाव प्रती क्विंटल ६ हजार रुपये जाहीर केला आहे. चालू हंगामात उडीद आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी दि. १५ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या ता...
मुळेवाडीत भरदिवसा शेतकऱ्याच्या घरात चोरी | अडीच लाखांचा ऐवज लंपास
महाराष्ट्र

मुळेवाडीत भरदिवसा शेतकऱ्याच्या घरात चोरी | अडीच लाखांचा ऐवज लंपास

कर्जत : बंद घराचा कडीकोयंडा व कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे अडीच लाख रूपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरूवारी (ता. १० सप्टेंबर) दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान मुळेवाडीत घडली. याबाबत योगेश रामराव मुळे (वय ३१, रा. मुळेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश मुळे हे शेतकरी असून घटनेच्या दिवशी ते आई व पत्नीसह आपल्या शेतात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा कुलूप लावून बंद केले होता. मात्र, ते सायंकाळी घरी आल्यानंतर घराचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला त्यांना दिसला. घरात प्रवेश केला असता, बेडरूममध्ये कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच दागिने व ३१ हजार रूपये रोख रक्कमही गायब झाली ह...