महाराष्ट्र

प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा
महाराष्ट्र

प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा

‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : वर्ष १६५९, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, याच दिवशी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेला राक्षसीवृत्तीच्या अफझलखानाला छत्रपती शिवरायांनी संपवला. हा दिवस ‘शिवप्रतापदिन’ साजरा केला जातो. जगातील सर्वांत महान १० युद्धाच्या घटनांपैकी एक मानली जाणारी ही घटना, विदेशांतील लष्कराला शिकवण्यात येते; मात्र दुर्दैवाने जेथे हा महापराक्रम झाला, तेथे या घटनेविषयी साधी माहिती देणारे एकही स्मारक नाही. यासाठी आज ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या ठिकाणी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्ह...
कामगारांना ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश
महाराष्ट्र, मोठी बातमी

कामगारांना ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

मुंबई दि ८ :विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीर स्वास्थाला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये त्यासाठी कामगारांकडून ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करू नये,असे निर्देश सहकार व पणन मंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात सहकार व पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार वाहू न देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे,महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार,सहायक निबंधक अहमदनगर शरीफ शेख ,सहायक निबंधक सोलापूर श्री.माने, एपीएमसी चे संचालक अशोक वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई उपसभापती धनंजय वाडकर, सचिव संदीप देशमुख, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, चंद्रकांत पाटील,माथाडी कामगार युनियनचे खजिनदार गुंगा पाटील,कि...
होय, आहे आपली दहशत – आमदार रोहित पवार
महाराष्ट्र, राजकारण

होय, आहे आपली दहशत – आमदार रोहित पवार

प्रतिनिधी|कर्जत : होय, आहे आपली दहशत पण ती विकासाच्या राजकारणाची, महिला, माता- भगिनींच्या संरक्षणाची. विकासाच्या राजकारणावर बोलायचे असेल तर आपली केव्हाही तयारी आहे. आरोप - प्रत्यारोप करताना भविष्यात तुम्ही आणखी पातळी खाली घालवली तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवतील. त्यामुळे नैतिकता राखून बोला अन्यथा पुढील दहा वर्षात जनता काय करू शकते ते पहा. आपण विधानसभेत जे शब्द दिले तो पाळण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यासाठी थोडा अवधी लागणार आहे. मात्र तरी आपण काही ठिकाणी तो शब्द पाळला नाहीतर माझे कान पकडण्याचा अधिकार देखील जनतेला आहे असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले. दि.७ रोजी ते कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी अर्ज दाखल सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, राजेंद्र गुंड, नितीन धांडे, नानासाहेब निकत, बारामती...
कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी एकूण ८९ उमेदवारी अर्ज दाखल
महाराष्ट्र, राजकारण

कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी एकूण ८९ उमेदवारी अर्ज दाखल

कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या १३ जागेसाठी एकूण ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली. १७ जागेसाठी एकूण १०० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र सुप्रीम कोर्टाच्या नामप्र आरक्षणाच्या स्थगितीमुळे आणि राज्य निवडणुक आयोगाच्या नुतन मार्गदर्शक सुचनेनुसार चार प्रभागात ११ उमेदवारी अर्ज वगळण्यात आले. यावेळी भाजपा २७ , राष्ट्रवादी २३, काँग्रेस ९, शिवसेना ३, रासप २, वंचित बहुजन आघाडी ३ आणि अपक्ष २२ असे १३ जागेसाठी एकूण ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. कर्जत नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची मोठी झुंबड पाहायला मिळाली. अखेर प्रशासनास पोलीस दलाची मदत घ्यावी लागली. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपले उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करीत दाखल ...
धक्कादायक : नाशिक पंचवटीत पुजारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्यावर पिस्तूल रोखली
मोठी बातमी, महाराष्ट्र

धक्कादायक : नाशिक पंचवटीत पुजारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्यावर पिस्तूल रोखली

त्रंबकेश्वरमध्ये विविध पूजेवरुन पुन्हा पुरोहितांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी नाशिक : नाशिकच्या पंचवटी (Panchavati) येथे पुराणकाळातलं मंदिर आहे. तिथे कुंभमेळा (Kumbhmela) भरवतो. दररोज हजारो पर्यटक पंचवटीला भेट देतात. पण लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या याच पंचवटीत एक विचित्र घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पंचवटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहित किंवा पुजाऱ्यांचं वास्तव असतं. भाविक त्यांना वंदन करुन त्यांचे आशीर्वाद घेतात. त्यांच्या सुचनेनुसार विविध पुजा-आस्था करतात. पण पंचवटी इथे घडलेल्या घटनेमुळे भाविकांचं मन दुखावलं आहे. कारण पंचवटीत पुजारींच्या (Pujari) दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी (Dispute) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या गदारोळादरम्यान एका पुजाऱ्याने थेट पिस्तूल (Pistule) बाहेर काढल्याचीदेखील माहिती समोर आली...
दोन वर्षात काय विकासकामे केली ते समोरासमोर एकदा सांगाच | राम शिंदेचे आ रोहित पवार यांना खुले आव्हान
महाराष्ट्र

दोन वर्षात काय विकासकामे केली ते समोरासमोर एकदा सांगाच | राम शिंदेचे आ रोहित पवार यांना खुले आव्हान

सोमवारी भाजपाचे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल कर्जत (प्रतिनिधी) : दोन वर्षात काय विकासाचे काम केले आहे ते एकदा आमने सामने झालेच पाहिजे असे म्हणत राम शिंदे यांनी आ रोहित पवार यांना खुले आव्हान दिले. ते कर्जत येथे भाजपाच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी बोलत होते. यावेळी खा.डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, युवा नेते सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, जामखेडचे अजय काशीद, रवी सुरवसे आदी उपस्थित होते. सोमवारी दुपारी भाजपाने मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी पुढे बोलताना माजीमंत्री राम शिंदे म्हणाले की, आपण विधानसभेत सांगितल्याप्रमाणे कर्जत शहराचे सर्व प्रलंबित प्रश्न प्रामाणिकपणे सोडविले. मंत्रीपदाचा पदभार घेतल्यावर सर्वप्रथम कर्जतचा पाणी प्रश्न तात्काळ सोडविला. यासह ...
गिरीश कुबेर यांना का ‘काळं फासलं’? असं काय लिहिलंय त्यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी?
महाराष्ट्र, मोठी बातमी

गिरीश कुबेर यांना का ‘काळं फासलं’? असं काय लिहिलंय त्यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी?

नाशिक : पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : 'द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र' या पुस्तकातल्या मजकुरावरून याधीच वाद होता. नाशिकमधील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तो पुन्हा पुढे आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी या पुस्तकात, संभाजींवर गंभीर आणि आक्षेपार्ह लिखाण गिरीश कुबेर यांनी केलं असा आरोप करत, संभाजी ब्रिगेडने त्यांच्या तोंडाला आज नाशिकमध्ये काळं फासलं. याआधीच गिरीश कुबरे यांच्या या लिखाणाविषयी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड या कुबेर यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. या पुस्तकात वादग्रस्त मजकूर छापून गिरीश कुबेर यांना नेमकं साध्य तरी काय करायचं आहे? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तसेच अनेक संघटनांनी कुबेर यांच्या पुस्तकावर तातडीने बंदी घालण्याची मागणी यापूर्वीच केली होती. आज अखेर संभाजी ब्रिगेडने गिरीश कुबेर यांच्या त...
KARJAT : आमदारांनी भाजपातील आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवावी – राम शिंदेचे रोहित पवार यांना खुले आव्हान
महाराष्ट्र

KARJAT : आमदारांनी भाजपातील आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवावी – राम शिंदेचे रोहित पवार यांना खुले आव्हान

भाजपाकडून १७ जागेसाठी ६३ इच्छुकांच्या मुलाखती संपन्न कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीसाठी आपल्या सत्तेच्या काळात १५१ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून विविध विकासकामाच्या माध्यमातून कर्जत शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकलो, याचे आपणांस समाधान आहे. आगामी निवडणुकीत याच विकासकामाच्या जोरावर मतदार आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा भाजपाची सत्ता कायम राखण्यात सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी पक्षाचे निवडणूक निरीक्षक बाळासाहेब महाडीक, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, शहराध्यक्ष वैभव शहा, अनिल गदादे, पप्पू धोदाड, गणेश पालवे, सुमित दळवी आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, मागील निवडणुकीत कर्जतकराच्या मतदानरुपी सहकार्यामुळे भाजपाची एक हाती सत्ता असताना कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून आपण...
कर्जत तालुक्यात नवीन जिल्हा परिषद गटाची निर्मिती होणार : पप्पू शेठ धोदाड यांच्या मागणीला यश
महाराष्ट्र

कर्जत तालुक्यात नवीन जिल्हा परिषद गटाची निर्मिती होणार : पप्पू शेठ धोदाड यांच्या मागणीला यश

कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2021-22 साठी कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक नवीन गट आणि पंचायत समितीच्या दोन गणाची वाढ करण्यात यावी अशी मागणी कुंभेफळ ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच पप्पू शेठ धोदाड यांनी काही दिवसांपुर्वी केली होती. त्यानुसार तालुक्यातील वाढीव मतदार संख्या लक्षात घेऊन होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकी साठी प्रशासनाने नवीन जिल्हा परिषद गट स्थापन करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या असून नवीन जिल्हा परिषदेच्या एका गटाची तर पंचायत समितीच्या दोन गटाची निर्मिती होणार असल्याचे समोर येत आहे. कर्जत ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्याने तालुक्यातील जिल्हापरिषदेचा एक गट कमी झाला होता. वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन जिल्हा परिषदेच्या चार गटा ऐवजी पाच गट व्हावेत या धोदाड यांच्या मागणीनुसार कर्जत तालुक्यात कोरेगाव जिल्हा परिषदेच्या नवीन गटाची निर्मिती...
अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बाळासाहेब साळुंके यांची निवड
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी बाळासाहेब साळुंके यांची निवड

कर्जत : अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दि.२६ रोजी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या बोर्ड मिटींगमध्ये ही निवड करण्यात आली. या निवडीनंतर साळुंके यांच्या समर्थकांनी कर्जत व तालुक्यातील गावांमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत साळुंके कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. काही महिन्यांपुर्वी पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तथा पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाक्षी साळुंके यांना केवळ एका मताने पराभव झाला होता. मात्र हा पराभव केवळ तालुक्याच्याच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही जिव्हारी लागला होता. कारण मतदानाच्या अगोदर झालेल्या नाट्यमय खेळीची आणि त्यातच जवळ राहून कुरघोड्या केलेल्या तालुक्यातील अनेक नेत्यांच्या छुप्या डावाची चर्चाही लपून राह...