मुळेवाडीत भरदिवसा शेतकऱ्याच्या घरात चोरी | अडीच लाखांचा ऐवज लंपास
कर्जत : बंद घराचा कडीकोयंडा व कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे अडीच लाख रूपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरूवारी (ता. १० सप्टेंबर) दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान मुळेवाडीत घडली.
याबाबत योगेश रामराव मुळे (वय ३१, रा. मुळेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश मुळे हे शेतकरी असून घटनेच्या दिवशी ते आई व पत्नीसह आपल्या शेतात कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा कुलूप लावून बंद केले होता. मात्र, ते सायंकाळी घरी आल्यानंतर घराचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला त्यांना दिसला. घरात प्रवेश केला असता, बेडरूममध्ये कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच दागिने व ३१ हजार रूपये रोख रक्कमही गायब झाली ह...










