महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्यातर्फे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे वाटप
ठाणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : शिवजयंती निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे वाटप डोंबिवलीत ठिक-ठिकाणी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, राष्ट्र सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोंबिवली एमआयडीसी येथील शिवाई बालक मंदिर मधील विद्यार्थ्यांना शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप करून छत्रपती शिवारायांची माहिती देण्यात आली. एमआयडीसीतील रिक्षा स्टँड वरील रिक्षाचालकांसह अनेकांना या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
डोंबिवली येथील लोढा हेवन ग्रीन पार्क सोसायटी मधील मुलांनासुद्धा या पुस्तकाचे वाटप करून व समाजातील लहान थोरांपर्यंत शिवाजी महाराजांचे खरे चारित्र पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवरायांचे दैवती...










