पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागर ग्रामस्थांतर्फे शेडगे परिवाराचे अभिनंदन
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागर ग्रामस्थांतर्फे शेडगे परिवाराचे अभिनंदन

संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी शेडगे परिवाराच्या "हिरा- राजा" बैल जोडीची निवड वाकड : पंढरपूरला जाणाऱ्या देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी वाकड येथील शेडगे परिवाराच्या "हिरा- राजा" या बैल जोडीची निवड झाली. त्याबद्दल पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे, उद्योजक संदीप विठ्ठल काटे व उद्योजक निलेश विठ्ठल काटे यांच्याकडून ज्ञानेश्वर शेडगे व शेडगे परिवारास श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी हभप ऋषिकेश चोरगे महाराज, तात्या शिणगरे, बाबू शेलार, दीपक भिस्ट, शुभम मोहारे, निलेश काटे युवा मंचाचे पदाधिकारी व पिंपळे सौदागर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ऋषिकेश चोरगे महाराज यांनी आपल्या गोड बोलितून शेडगे परिवाराचे अभिनंदन करत, वारीसाठी शुभेच्छा दिल्या....
नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या थेरगाव कन्या तमन्ना शेख यांचा सन्मान
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या थेरगाव कन्या तमन्ना शेख यांचा सन्मान

पिंपरी : थेरगावच्या तमन्ना शेख हिची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तमन्ना शेख हिने उत्कृष्ट यश मिळवले. त्यामुळे तीची नायब तहसीलदार पदी निवड झाली. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, इकबाल शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तमन्ना हिला सन्मानित करण्यात आले. घरची परिस्थिती बिकट, आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते, वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामगार आहेत. थेरगाव येथील आनंदवन सोसायटीत राहणारे शेख कुटुंबातील तमन्ना हिने कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयॊगाची परीक्षा दिली व तिसऱ्या प्रयत्नामध्ये मुलींमध्ये राज्यात ८ वी, सर्वसाधारण गटात १०६ वी येऊन नायब तहसीलदार पदी निवड झाली. &...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील परिवारतर्फे वृक्षारोपण
पिंपरी चिंचवड, सामाजिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील परिवारतर्फे वृक्षारोपण

पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज आणि डॉ. डी. वाय. परिवार यांच्या पुढाकाराने दुर्गा टेकडी इथे पक्षांसाठी विविध फळ झाडांचे रोपण करण्यात आले. त्याप्रसंगी जगा व जगू द्या चे डॉ संदीप बाहेती, उद्यान प्रमुख श्री. वाईकर, डेंटल कॉलेजचे डॉ. प्रज्ञा बारसे, डॉ. गौरी भोसले, डॉ. उत्कर्षा चौधरी, डॉ. श्रुती तुंगार इत्यादी उपस्थित होते. निसर्ग हाच आपला पालनकर्ता असून त्याचे संरक्षण आणि जोपासना करणे, हे आपले कर्तव्य आहे. असा संदेश डॉ. डी. वाय. पाटील परिवारतर्फे देण्यात आला. निसर्ग आपले निरंतर कोड कौतुक आणि पालन पोषण करत असतो. त्यावर आपण निरंतर प्रेम केले पाहिजे, असे डॉ संदीप बाहेती म्हणाले. आजचे वृक्षारोपण हे अविस्मरणीय असून ही संधी आम्हाला आज मिळाली, याचा आम्हास अत्यानंद होत आहे. असे मनोगत उपस्थित डेंटल कॉलेजच्या डॉक्टरांनी व्यक्त केले....
वृक्षमित्र अरुण पवार यांनी मुला-मुलींना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ
सामाजिक, पिंपरी चिंचवड

वृक्षमित्र अरुण पवार यांनी मुला-मुलींना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ

लेवा भातृ मंडळाच्या वतीने आयोजित उन्हाळी शिबिराचा समारोप चिंचवड : शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने वृक्षमित्र व मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी मुला मुलींना वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. तसेच मुला मुलींसमवेत भंडारा डोंगराच्या पायथ्याशी लावण्यात आलेल्या वृक्षांना पाणी घालून प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जपावे, असे आवाहन वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले. मुला-मुलींनी कुटुंबात जेवढ्या व्यक्ती असतील, तेवढी झाडे लावण्याचे यावेळी आश्वासन दिले. निमित्त होते पिंपळे सौदागर येथील लेवा भातृ मंडळाच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल ज्ञान मंदिर, निगडी येथे आयोजित उन्हाळी शिबिराच्या समारोपाचे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पवार उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक सारिका पाटील व मनीषा...
थरमॅक्स कंपनीत कामगारांना २१००० रूपयांची वेतनवाढ; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
पिंपरी चिंचवड

थरमॅक्स कंपनीत कामगारांना २१००० रूपयांची वेतनवाढ; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

चिंचवड : थरमॅक्स लिमिटेड (Thermax Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि थरमॅक्स कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १ मे २०२२ ते ३० एप्रिल २०२५ असा तीन वर्षांसाठी हा करार असणार त्यामधे १४,१०० रूपयांची डायरेक्ट वाढ, अधिक १८०० रूपये इन्सेंटिव्ह असे १५,९०० रूपयांची वेतन वाढ करण्यात आली आहे. या कराराचा लाभ चिंचवड फॅक्टरी मधील सर्व कायम कामगारांना होणार असून त्यामुळे कामगारांचे किमान वेतन वाढ १२,५२४ व कमाल वेतन वाढ २१,०८५ एवढी झाली आहे. सेवाजेष्ठता पारितोषिक व सन्मानचिन्ह : ५ वर्षासाठी २०००१० वर्षासाठी ४०००१५ वर्षासाठी ६०००२० वर्षासाठी ८०००२५ वर्षासाठी १५००० शैक्षणिक कर्ज : कामगारांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी ५ लाख रूपये शैक्षणिक कर्ज देण्यात येईल. सणावाराची उचल : पूर्वीच्या १४००० मध्ये ६००० रूपयांची वाढ करून २०,००० करण्यात आले.शॉर्ट लिव्ह : मह...
राष्ट्रवादी अर्बन सेलच्या महिला शहराध्यक्षा पदी मनिषा गटकळ यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड, राजकारण

राष्ट्रवादी अर्बन सेलच्या महिला शहराध्यक्षा पदी मनिषा गटकळ यांची नियुक्ती

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या (जिल्हा) वतीने पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज (ता. ३ जून) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी जाहिर करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते मनिषा किसन गटकळ यांची अर्बन सेलच्या महिला शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आजपर्यंत गटकळ यांनी वार्ड अध्यक्षा, प्रभागाध्यक्षा, शहर उपाध्यक्षा, तसेच भोसरी विधानसभेच्या दोन टर्म महिलाध्यक्षा, अश्या अनेक महत्त्वाच्या पदांवर आपली कारकीर्द यशस्वीपणे गाजवली आहे. शहर पातळीवर राष्ट्रवादीचे एक एकनिष्ठ आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते...
पिंपळे सौदागरमध्ये इको फ्रेंडली लॉण्ड्री आणि ड्राय क्लिनिंग सेवेचे कुंदाताई भिसे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये इको फ्रेंडली लॉण्ड्री आणि ड्राय क्लिनिंग सेवेचे कुंदाताई भिसे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपळे सौदागर : प्रत्येकजण नियमितपणे स्वच्छ कपड्यांना प्राधान्य देत असतो. शहरी भागांमध्ये लॉण्ड्री (Laundry) ही नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची सेवा आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळत असतो. त्यामुळे अधिकाधिक उद्योजक कपडे धुण्याच्या लॉण्ड्री (Laundry) या व्यवसायाकडे वळत आहेत. त्यात नियमितपणे गुणवत्ता दिल्यास ग्राहक समाधानी राहतो. सफाई व्यवसायात याच सेवेला अधिक महत्व असते. त्यामुळेच ग्राहक स्वतःहून अशा लॉण्ड्री (Laundry) चालकांना नेहमीच प्राधान्य देत आला आहे, असे मत उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केले. पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसायटीत ''यु क्लीन'' या अत्याधुनिक लॉण्ड्री (Laundry) आणि ड्राय क्लिनिंग (Dry Cleaning) सेवेचे उद्घाटन कुंदाताई भिसे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, लॉण्ड्रीचालक शुभम ...
पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत एमएससीडीए पॅनलला मताधिक्य देणार
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत एमएससीडीए पॅनलला मताधिक्य देणार

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांचा निर्धार पिंपरी, ता. 23 : पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्र राज्य औषध परिषदेच्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनच्या (MSCDA) पॅनलला मताधिक्य देणार आहे. असा ठाम विश्वास केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर येथे व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदच्या निवडणुकीचा अंतीम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी आमदार अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष जग्गनाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड तर्फे सभा आयोजित केली होती. त्यावेळी विवेक तापकीर बोलत होते. या सभेला माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे, विजय पांडुरंग पाटील, एमएससीडीए पश्चिम क्षेत्राचे अध...
आधार कार्ड नोंदणी कॅम्पला रहाटणीकरांचा उदंड प्रतिसाद
पिंपरी चिंचवड, सामाजिक

आधार कार्ड नोंदणी कॅम्पला रहाटणीकरांचा उदंड प्रतिसाद

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देविदास तांबे यांनी केले होते आयोजन रहाटणी, ता. २० मे : चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा सांगवी काळवाडी मंडल अध्यक्ष देविदास अप्पा तांबे यांनी रहाटणीकरांसाठी नवीन आधार कार्ड व आधार कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती दोन तीन दिवशीय कॅम्पचे नुकतेच आयोजन केले होते. या कॅम्पला राहटणींकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. विविध सरकारी व निमसरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी व बँकेच्या कामकाजात सध्या आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र पूर्वीप्रमाणे आता आधार कार्ड काढण्याची तात्पुरती केंद्रे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत. तसेच आता शाळा, कॉलेज सुरु होत असल्याने आधार कार्ड आवश्यक आहे. दैनंदिन कामकाजातून नागरिकांना वेळ मिळत नाही तसेच कामगार व नोकरदार वर्गाला वेळ काढून महाईसेवा केंद्र अथवा पोस्टात जाने शक्य होत नाही, त्यामुळे नागरिकां...
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महिला काँग्रेसचे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महिला काँग्रेसचे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू

पिंपरी, ता. १९ मे : मागील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड शहराला २४ तास पाणीपुरवठा करू असे जाहीर आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्याऐवजी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मागील अडीच वर्षांपासून दिवसाआड व अनियमित कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. याला लोकप्रतिनिधी आणि भाजपचे पदाधिकारी जबाबदार आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करू असे प्रशासनाने अनेकदा आश्वासन देऊन देखील अद्यापही पाणीपुरवठा पूर्णवेळ व सुरळीतपणे सुरू झालेला नाही याचा जाब विचारण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळपासून मनपाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित महिला प्रशासनास जाब विचारीत आहेत की, पवना धरण १०० टक्के भरून देखील पाणीपुरवठा सुरळीत का केला जात नाही. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्र...