पिंपरी चिंचवड

काळेवाडीत महिला आरोग्याबाबत जनजागृती | सुजाता नखाते यांच्यातर्फे आयोजित हळदी-कुंकू समारंभात डॉ. खैरनार यांनी केले मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत महिला आरोग्याबाबत जनजागृती | सुजाता नखाते यांच्यातर्फे आयोजित हळदी-कुंकू समारंभात डॉ. खैरनार यांनी केले मार्गदर्शन

काळेवाडी : महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी हरेश आबा नखाते मित्र परिवार व मुक्त सखी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. दिपाली खैरनार व डॉ. दीपिका खैरनार यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जाणीव फाउंडेशनच्या सदस्या सुजाता नखाते यांच्या तर्फे हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महिलांनी हळदी-कुंकू व जनजागृती कार्यक्रमचा लाभ घेतला. यावेळी मीनाक्षी वराड, चंद्रिका साळुंके, गायत्री विटकर, दिपाली नढे, वंदना वायभट, वैशाली राऊत, अनिता पांचाळ, अलका खोमणे, सुमन कोकणे, तस्लिम शेख, संगीता पवार, उज्वला गव्हाणे, सविता जाधव, प्रतिभा ताम्हणकर, पुनम नढे, माधुरी जगदाळे, कोमल वायभट, कांचन गायकवाड, अनिता विटकर, कविता मंजाल, सौ भरणे, सौ जंगम यांच्यासह मातृछाया कॉलनी महिला मंडळ, समता कॉलनी मि...
माने शाळेत करोना प्रतिबंधक लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

माने शाळेत करोना प्रतिबंधक लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

काळेवाडी : विद्यादीप शिक्षण संस्थेच्या माने शाळेत १५ वर्षावरील करोना प्रतिबंधक लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५ वर्षावरील मुला-मुलींचा या लसीकरण मोहिमेत स्वखुशीने सहभाग नोंदवला जात आहे. जास्तीत जास्त मुलांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय गंगाराम माने यांनी मुलांना व पालकांना केले आहे. मागील दोन वर्षांपासून करोना महामारीचे जगभरात थैमान सुरू आहे. त्यामध्ये लाको नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, शास्त्रज्ञांनी दिवसरात्र परिश्रम घेत करोना प्रतिबंधक लस तयार करण्यात यश मिळविले. त्यामुळे मानव जातीच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे अस्त्र निर्माण झाले आहे. त्याही पुढे जाऊन आता १५ वर्षांवरील मुलांसाठीही लस तयार झाली आहे. आता या लसीचे लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते व विद्यादीप शि...
सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय माने यांच्या प्रयत्नातून ११०० मतदान कार्ड वाटप
पिंपरी चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय माने यांच्या प्रयत्नातून ११०० मतदान कार्ड वाटप

काळेवाडी : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीयाला मतदान करण्याचा सर्वोच्च अधिकार दिला आहे. मात्र, हा अधिकार तेव्हाच बजावू शकतो. जेव्हा प्रत्येक १८ वर्षांवरील तरूण-तरूणींची निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली असेल. सरकारी अनास्थेमुळे अनेक भारतीय आपल्या या सर्वोच्च अधिकारापासून वंचित आहेत. कारण, त्यांची मतदार नोंदणीच झालेली नाही. अशा नोंदणी न झालेल्या व नवमतदारांच्या नोंदणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व विद्यादीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय गंगाराम माने यांनी प्रयत्न करून सुमारे ११०० जणांना मतदान कार्ड वाटप केले आहे. डॉ. माने यांच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून नुकतेच त्यांनी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित केले होते. त्याचा काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मधील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला, तर बेरोजगारांसाटी राबविलेल्या रोजगार मेळाव्यात १८०० तरूण-तरूणींची सहभाग घेतला. त्या...
आकुर्डीत ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून साजरा केला प्रजासत्ताक दिन
पिंपरी चिंचवड

आकुर्डीत ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून साजरा केला प्रजासत्ताक दिन

आकुर्डी : प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरात कोरोनाच्या केसेस वाढत असताना रक्तदान करण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे रक्ताच्या उपलब्धतेवर त्याचा परिणाम काम होत आहे म्हणून आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे आपचे शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले. या शिबिरामध्ये तब्बल. ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांसोबतच युवकांचा सहभाग ही उल्लेखनीय होता....
जाधववाडी-मोशी रस्त्यावरील धोकादायक चेंबर दुरूस्त करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

जाधववाडी-मोशी रस्त्यावरील धोकादायक चेंबर दुरूस्त करण्याची मागणी

बाळासाहेब मुळे : लोकमराठी वृत्तसेवा पिंपरी : जाधववाडी-मोशी हा हाय स्ट्रीट नावाने प्रसिद्ध असलेला रोड. परंतु, त्याच रोडवरच्या फुटपाथवरील असणाऱ्या ड्रेनेजचे काम अर्धवट ठेवलेले आहे. ही बाब अत्यंत धोक्याचे असून फुटपाथवरून येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी अपघाताला आमंत्रण देणारी बाब आहे. हा रोड अत्यंत महत्त्वाचा असून या रोडच्या बाजूने शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स आणि गार्डन आहेत. त्यामुळे हा रोड अत्यंत रहदारीचा असल्यामुळे त्या रोडवरती उघडे पडलेले चेंबर्सचे काम करुन घ्यावे. अशी मागणी सामान्य जनतेतून व येणाऱ्या-जाणाऱ्या पादचार्‍यांना कडून हमेशा होत आहे. याची सूचना महापालिकेला आणि लोकप्रतिनिधींनाही वारंवार देऊन त्याच्याकडे जाणून बुजून कानाडोळा केला जात आहे. लोकप्रतिनिधी किंवा पालिका कुठला तरी मोठा अपघात होण्याची वाट पाहते, की काय? अशीच काहीशी शंका जनतेमध्ये निर्माण होत आहे....
सुनिल तात्या पालकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार श्रीरंग बारणे व आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी चिंचवड

सुनिल तात्या पालकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार श्रीरंग बारणे व आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे व कोकणाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. काळेवाडीतील विजयनगरमध्ये गुरूवारी झालेल्या या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. त्यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, कामगार नेते अनिलभाऊ मोरे, शहराध्यक्ष सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, शहर संघटीका उर्मिला काळभोर, युवा अधिकारी विश्वजीत बारणे, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष दस्तगीर मणियार, विधानसभा प्रमुख अनिता तुतारे, सह संघटिका शारदा वाघमोडे, उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे, उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते, माजी शहर संघटीका सुशीला पवार व सुनिता चव्हाण, विभागप्रमुख प्रशांत तरवटे व गोरख पाटील, विभाग समन्वयक राजेंद्र पालांडे,...
काळेवाडीत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडीतील रॉयल फाउंडेशन व काँग्रेसचे युवा कार्यकर्ते रवि नांगरे यांच्या वतीने सर्व वयोगटासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून त्यातील अनेकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर काहींची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. असे नांगरे यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितले. या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, विश्वजित जगताप, माऊली मलशेट्टी, विजय ओव्हाळ, रॉयल फाउंडेशनचे सल्लागार प्रकाश नांगरे, रॉयल फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रकाश पठारे, कार्याध्यक्ष अजय काटे, ...
राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षेत प्रथम येणाऱ्या गौतमी निकम हिला स्व. माजी सरपंच गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे लॅपटॉप भेट
पिंपरी चिंचवड

राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षेत प्रथम येणाऱ्या गौतमी निकम हिला स्व. माजी सरपंच गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे लॅपटॉप भेट

पिंपरी : राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षेमध्ये गौतमी निकम ही विद्यार्थिनी भारतामध्ये प्रथम आली. त्यामुळे गौतमी हिला स्व. माजी सरपंच गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लॅपटॉप भेट देण्यात आला. त्याप्रसंगी प्रभाग क्रमांक २७ च्या नगरसेवका व महापालिका महिला बालकल्याण सभापती सविता खुळे, चिंचवडचे प्रभारी संतोष कलाटे, नवीन लायगुडे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते, स्वीकृत सदस्य गोपाल माळेकर, स्वराज पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील कुंजीर, ट्रस्टचे अध्यक्ष देविदास आप्पा तांबे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा यांच्या वतीने २०१९ मध्ये ही परिक्षा घेण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरा...
आम आदमी पार्टी तर्फे आकुर्डी मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
पिंपरी चिंचवड

आम आदमी पार्टी तर्फे आकुर्डी मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

पिंपरी : आप पिंपरी चिंचवड च्या कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या उपस्थिती मध्ये आज पक्ष कार्यालय मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.साई हॉस्पिटल चे संचालक डॉ. प्रशांत देशमुख यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. आप कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा, कामगाररत्न प्रकाश परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सूत्रसंचालन राज चाकणे यांनी केले. या प्रसंगी महालक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी दत्ता बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, ओम फिनिक्स क्लासेस संचालक प्रा. पांडुरंग फुंदे, बसपा चे पदाधिकारी महेश गायकवाड, युवा कार्यकर्ते विवेक नामदेव भोरे, प्राध्यापक पांडुरंग फुंदे यांनी आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. त्याच बरोबर खालील नवीन कार्यकर्त्यांच्या पदनियुक्त्या करण्यात आल्या.मंगेश अनंत आंबेकर - भोसरी विधानसभा उपाध्यक्षश्री. मोतीराम अगरवाल...
विकसित समाजात अजूनही उपेक्षितांचे वेगळे जग शहरात आहे – प्रा. दिपक जाधव
पिंपरी चिंचवड

विकसित समाजात अजूनही उपेक्षितांचे वेगळे जग शहरात आहे – प्रा. दिपक जाधव

चिंचवड : समाजाची एक विकसित स्थिती आसपास आपण पहात असतो, मात्र अजूनही उपेक्षितांचे वेगळे जग शहरात आहे. अशी व्यथा प्रा. दिपक जाधव यांनी व्यक्त केले. बिजलीनगर येथील नचिकेत बालग्राममध्ये देव-दर्शन कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. दिपक जाधव यांनी आपला ३५ वा वाढदिवस गरीब आणि उपेक्षित मुलांना खाऊ वाटप करून साजरा केला. त्यावेळी ते बोलत होते. त्या प्रसंगी प्रा. वैशाली जाधव, संस्थेचे संचालक डॉ. भालचंद्र ब्रम्हेच्या, सिद्धार्थ ब्रम्हेच्या, नयना मावळे, शयनाज शेख, दिलीप पेटकर, यल्लमा कोलगवी आदी उपस्थित होते. प्रा. दिपक जाधव म्हणाले की, "मी आणि माझी पत्नी दरवर्षी आमच्या घरातील वाढदिवस गोरगरीब वस्तीतील लोकांना काही जीवनावश्यक वस्तु, भोजन, अल्पोपाहार देऊन साजरा करत असतो. उपेक्षित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये वाढदिवस साजरा करून मी इथे फक्त कर्तव्य करत आहे." त्या ठिकाणी प्रा. वैशाली गा...