पिंपरी चिंचवड

माता रमाई स्मारकाकरिता धम्मदिप प्रतिष्ठाण व भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश – राहुल वडमारे
पिंपरी चिंचवड

माता रमाई स्मारकाकरिता धम्मदिप प्रतिष्ठाण व भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश – राहुल वडमारे

पिंपरी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टीच्या पाठीमागील जागेत माता रमाई यांच्या पुतळ्यासह त्यांचे स्मारक उभारण्यात यावे. या धम्मदिप प्रतिष्ठाण व भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या सातत्यपूर्ण मागणीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आता माता रमाई यांचे त्याठिकाणी स्मारक होणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राहुल वडमारे यांनी दिली. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राहुल वडमारे यांनी लोकमराठी न्यूजला सांगितले की, याकरिता सलग चार वर्ष पाठपूरावा केल्यानंतर आता महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी २१ डिसेंबर २०२१ रोजी आमच्या मागणीप्रमाणे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील जागेत महामाता रमाई यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. महामाता रमाई यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. अशी पत्रकार परिषद घेउन जाहीर केले. तब्बल चार वर्षांनंतर आमच्या मागणीला यश आले. महापौर ढोरे य...
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिघीत रक्तदान शिबीर
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिघीत रक्तदान शिबीर

पिंपरी : दिघीतील साई हाॅस्पिटल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे संयोजन संजय धुमाळ व आदित्य धुमाळ यांनी केले होते. या शिबिरास केईएम हाॅस्पिटल रक्तपेढीचे सहकार्य लाभले. गेल्या पंधरापासून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यावेळी माजी आमदार विलास लांडे पाटील, माधव पाटील, वसंत रेंगडे, ज्ञानेश आल्हाट, रविंद्र चव्हाण, डाॅ. महेश भारती, सचिन दुबळे, केशव वाघमारे, प्रशांत काळेल, मंगेश अहवले, अमोल देवकर, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, नगरसेवक विकास डोळस, वसंत इंगळे, मनिषा जढर, प्रतिभा दोरकर, अभिमन्यू दोरकर, कुणाल तापकीर, सागर रहाणे, महेश झपके आदी उपस्थित होते....
CHINCHWAD : गेली १५ वर्षे भोईरनगर बसथांब्यापासून वंचित
पिंपरी चिंचवड

CHINCHWAD : गेली १५ वर्षे भोईरनगर बसथांब्यापासून वंचित

चिंचवड : दळवीनगर आणि भोईरनगर येथील रस्त्यावर कायम वर्दळ असते. भोसरी आणि हिंजवडी येथे आणि कॉलेजला जाण्यासाठी रस्त्यावर कायम गर्दी असते. मात्र, गेली १५ वर्षापासून या ठिकाणी बसथांबा नाही. त्यामुळे प्रवाशांना उन्हापावसात रस्त्यावर जीव मुठीत घेऊन थांबावे लागेल. त्यामुळे या ठिकाणी बसथांबा उभारण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधारचे शहराध्यक्ष माधव धनवे पाटील यांनी केली आहे. याबाबत माधव धनवे पाटील यांनी लोकमराठी न्यूजला माहिती देताना सांगितले की, निगडीच्या दिशेने जाणाऱ्या बसला गेले १५ वर्षे बस स्टॉपच नाही. बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते. जेष्ठ नागरिक आणि विध्यार्थी उन्हातान्हात, पावसात बसची वाट पाहत असतात. त्यात येथील रस्ता ६० फुटांपेक्षा जास्त रुंद असल्याने आणि रस्त्याला दुभाजक नसल्याने वाहने भरधाव असतात. त्यामुळे बसची वाट पाहत रस्त...
निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच सुखी जीवनाचा मुलमंत्र – कुंदा भिसे
पिंपरी चिंचवड

निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच सुखी जीवनाचा मुलमंत्र – कुंदा भिसे

पिंपळे सौदागरमध्ये 'होम फिट इंडिया' जीमच्या उद्घाटनप्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे प्रतिपादन पिंपरी : आजच्या धकाधकीच्या युगात मनुष्याचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच आज सुखी जीवनाचा मुलमंत्र आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पिंपळे सौदागर येथे 'होम फिट इंडिया' या जीमचे उद्घाटन करण्यात आले आहे. असे प्रतिपादन (Unnati Social Foundation) उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे (Kunda Sanjay Bhise) यांनी केले. उन्नतिच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या हस्ते नुकतेच या जीमचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक व यशदा रिएलिटी ग्रुपचे व्हॉईस चेअरमन संजय भिसे, सागर बिरारी, मयूर काळे, अशोक शालगर, मोनाली कुलकर्णी शालगर, रुपाली लोखंडे, चंचल अरबाळे, पंडित नरवाडे, शंकर चव्हाण, गणेश शालगर,...
मुस्लिम समाज दफनभूमीची आरक्षित जागा पिंपरी चिंचवड महापालिकेने ताब्यात घ्यावी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

मुस्लिम समाज दफनभूमीची आरक्षित जागा पिंपरी चिंचवड महापालिकेने ताब्यात घ्यावी

पिंपरी, ता २२ : पिंपरी चिंचवड शहर विकास आराखड्यात मुस्लिम समाजाला काळेवाडी, थेरगाव, वाकड अपवाद सोडता, दफनभूमीसाठी जागा आरक्षित केली गेली आहे. मात्र, आरक्षित क्षेत्र भूमाफियांकडून हडप केले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून हे आरक्षित क्षेत्र ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी केली आहे. इरफान शेख हे लोकमराठी न्यूजशी बोलताना म्हणाले की, आज आपण पाहत आहोत, अनेक भूखंड, मग ते आरक्षित असो अथवा ब्ल्यू लाईन असो, भूमाफियांकडून ते कमी दरामध्ये घेतले जात आहेत. हे भूमाफिया ती जागा जे कामगार वर्ग परराज्यांतून आपली उपजीविका शोधत शहरात आले आहेत, त्यांना विकतात. काही काळात या आरक्षित भूखंडांवर घरे बांधून हे आरक्षण संपविण्याचा डाव केला जातो. अशा परिस्थितीत मुस्लिम समाज दफनभूमीसाठी जे भूखंड आरक्षित करण्यात आले आहे...
इमारत कोसळण्यापूर्वी मनपाचा वाल्हेकरवाडीतील दवाखाना तात्काळ हलवा – नितीन यादव
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

इमारत कोसळण्यापूर्वी मनपाचा वाल्हेकरवाडीतील दवाखाना तात्काळ हलवा – नितीन यादव

पिंपरी : माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नुसार मनपाचा वाल्हेकरवाडी (सेक्टर नंबर 32 निगडी) येथील दवाखाना व व्यायामशाळा असलेली इमारत ही मानवी वस्तीसाठी अत्यंत असुरक्षित व धोकादायक असल्यामुळे तात्काळ पाडण्यात यावी, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे इमारत कोसळण्यापुर्वीच मनपाचा वाल्हेकरवाडी दवाखाना व व्यायामशाळा तात्काळ स्थलांतरित करण्यात यावा. अशी मागणी जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष नितीन यादव यांनी केली आहे. याबाबत यादव यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अडतीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ साली बांधलेल्या सदर इमारतीचे २१ एप्रिल २०१६ ला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. सदर ऑडिट मध्ये इमारतीच्या पिलर, बीम, सिमेंट काँक्रीट, स्लॅब, सज्जे व आरसीसी मधील लोखंडी गज यांचे प्रयोगशाळेत भारतीय मानांकनानुसार तप...
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आकुर्डीत आम आदमी पार्टीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
पिंपरी चिंचवड

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आकुर्डीत आम आदमी पार्टीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

पिंपरी : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने आकुर्डी येथील गुरुदेव नगर भागामध्ये नेत्र तपासणी, शुगर, बीपी तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या शिबिराला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आपचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी बोलताना सांगितले की, आपच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम नेहमी विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन साजरे केले जातात. दिल्लीमध्ये शिक्षण,आरोग्य, लाईट, पाणी या मूलभूत गरजा तेथील जनतेला मोफत दिल्या जातात. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये तसेच काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराने बरबडली आहे. जनता महागाईमुळे त्रस्त आहे, कररुपी मिळालेल्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. पाहिजे तशा सुखसुव...
संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांचा वैभव कॉलनी रहिवाशांतर्फे सत्कार
पिंपरी चिंचवड

संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांचा वैभव कॉलनी रहिवाशांतर्फे सत्कार

काळेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लेखक गिरीश कुबेर (Girish Kuber) यांनी आपल्या पुस्तकात वादग्रस्त लेखन केले. याचा निषेध करत कुबेर यांना संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी काळ फासले. या कामगिरीबद्दल सतिश काळे यांच्यासह श्रीमंगेश चव्हाण यांचा विजयनगरमधील वैभव कॉलनीतील रहिवाशांनी सत्कार केला. त्यावेळी नितीन भोसले, अनिल हातणकर, विशाल हणमंते, विकी हणमंते, योगेश चव्हाण, निलेश चव्हाण, इरफान शेख, अखिल भारतीय मजदुर युनियनचे पुणे जिल्हाध्यक्ष सतिश खोपकर, प्रकाश ताम्हाणकर, वैभव भोसले, अविनाश सोनवणे, एस. एम. दळवी, मोसीन शेख, अर्जुन नेटके, निलेश चाले, प्रविण सोनवणे आदी उपस्थित होते....
काळेवाडी मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

काळेवाडी मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी

काळेवाडी : मागील सात वर्षांपासून लकी बेकरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (एमएम चौक) हा काळेवाडी मुख्य रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी लवकरात लवकर काँक्रीटीकरण करावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर व इरफान शेख यांनी केली आहे. मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या पिंपरी ते वाकड, हिंजवडी, ताथवडे, थेरगाव, रहाटणी, चिंचवडगाव आदी उपनगरांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. मात्र, ड्रेनेज लाईन, स्टॉम वॉटर लाईन (पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहीनी), पदपथ या रस्त्यावर नाही. त्यामुळे असंख्य अडचणींचा सामाना नागरिकांना करावा लागतो. सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी ब प्रभागाच्या झोन अधिकारी सोनम देशमुख यांच्याकडे या मागणीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्ही काळेवाडीचे कायम स्वरुपी रहिवाशी असून नियमित शासकीय, निमशासकीय...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

पिंपरी : शुक्रवारी (दि. १७ डिसेंबर) कर्नाटकमधील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध करण्यासाठी, आज शनिवारी (दि १८ डिसेंबर) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी व समविचारी संघटनांच्‍या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने, माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. याप्रसंगी बोलताना मारुती भापकर म्हणाले की "महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच कर्नाटक मधील जनतेने व सरकारांनी सतत महाराष्ट्राचा तिरस्कार केलेला आहे. या तिरस्काराचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना, कर्नाटक मधील काही समाजकंटकांनी केलेली आहे. कर्नाटक मधील भाजपसरकारचाही या समाजकंटकांच्या कृत्याला पाठिंबा असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठा...