पिंपळे सौदागरमधील विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचा १०० दिव्यांग मुलांनी घेतला लाभ
उन्नती सोशल फाउंडेशन, सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीर गुरूवारी (ता. २१) आयोजित करण्यात आले. या शिबिराचा सुमारे १०० दिव्यांगांनी लाभ घेतला. सदर शिबीर दिवंगत डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन व दिपप्रज्वलन उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा हस्ते करण्यात आले. त्यावेळी उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, प्रबोधनकार शारदा मुंढे, रमेश वाणी, सखाराम ढाकणे, आर. के. पाटील, सप्तर्षी फाउंडेशनचे मनोजकुमार बोरसे, प्रकल्प व्यवस्थापक विशाल पवार, क्लेम विभाग प्रमुख रुशाली बोरसे, नंदकिशोर आहेर आदी उपस्थित होते.
दिवंगत...










