सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत समाजोपयोगी उपक्रम
काळेवाडी, ता. २६ : ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजन करण्यात आले. त्यामधील आधार कार्ड दुरूस्ती, मतदान स्मार्ट करणे, आधार कार्ड स्मार्ट करणे आदी सेवांचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. तसेच ज्येष्ठ नागरिक मोफत वाचनालयाचे उद्घाटन, अन्नदान व १८ मिटर डीपी रस्त्यावर यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी नगरसेवक कैलास बारणे, स्वीकृत सदस्य देविदास पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुखदेव खेडकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष धर्मा पवार, माजी मंडल अध्यक्ष प्रकाश पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वीर, दत्तात्रेय काटे मामा, ज्योतिबा कामगार मित्र मंडळाचे संस्थापक मधुकर पंधेरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव सुरेश विटकर, सामा...










