पिंपरी : शेअर ट्रेडिंग व्यवसायाच्या वादातून थेट मॅनेजरचे अपहरण करुन 35 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच अपहरण कर्त्यांना गुन्हे शाखा युनिट 2, निगडी पोलीस, खंडणी दरोडा विरोधी पथकाने चार तासात अटक केले आहे. अपहरण कर्त्यांकडून दोन अलिशान कार, एक बजाज पल्सर व सात मोबाईल फोन असा एकुण 61 लाखाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला असून अपहरण केलेल्या मॅनेजरची सुखरुप सुटका केली.
मुख्य सुत्रधार हरिचंद्र बारकु राजीवाडे (वय- 40, रा.बापदेवनगर, किवळे, देहुरोड), शशांक जगन्नाथ कदम (वय- 39 वर्ष रा. किसन कृपा बिल्डिंग, हॉटेल घरोंदा जवळ, पिंपरी) यांच्या सोबत तुळशीराम पोकळे (वय-34 वर्ष रा. नढे नगर, हिरा पॅलेस बिल्डिंग, काळेवाडी) याला ताब्यात घेऊन इतर सहभागी आरोपी अमर कदम, विकी गरुड, उमेश मोरे यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर आशुतोष अशोक कदम (वय- 28 वर्ष रा.जी विंग, फ्लॅट नं.14 शिवतीर्थ नगर, श्रीनगर, रहाटणी), राहुल बसव...