पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव | बंदोबस्त न केल्यास संभाजी ब्रिगेड महापालिकेत सोडणार मोकाट कुत्री
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव | बंदोबस्त न केल्यास संभाजी ब्रिगेड महापालिकेत सोडणार मोकाट कुत्री

पिंपरी : शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाने आठ दिवसात या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महापालिका भवनात त्यांना आणून सोडण्यात येतील. असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक दिवसांपासून शहरात विविध भागातील गर्दीच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आणि अश्यातच रस्त्यारस्त्यावर मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. काही ठिकाणी तर लहान मुलं, महिलांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पुढे अचानक ही कुत्री येऊन अपघात होतात. तसे...
क्वारंटाईन सेंटरमध्ये सॅनिटरी पॅड्स, मास्क, फेस शिल्ड व पिपिई किटचे वाटप | मानवता हिताय सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम 
पिंपरी चिंचवड, सामाजिक

क्वारंटाईन सेंटरमध्ये सॅनिटरी पॅड्स, मास्क, फेस शिल्ड व पिपिई किटचे वाटप | मानवता हिताय सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम 

पिंपरी चिंचवड : आकुर्डी येथील डि. वाय. पाटील कोविड क्वारंटाईन सेंटर येथे महिला वर्गाला होणाऱ्या मासिक पाळीची गंभीर परिस्थिती निदर्शनास आल्यावर मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स तसेच सदर ठिकाणी कार्यरत असणारे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना फेस मास्क, फेस शिल्ड व पिपिई किटचे वाटप करण्यात आले. या पुढेही शहराच्या विविध क्वारंटाईन सेंटरमधे सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्याचा संकल्प मानवता हिताय सोशल फाउंडेशनने केला आहे. https://youtu.be/2WI34pPHPl0 त्यावेळी मानवता हितायचे संस्थापक अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, सचिव तानाजी साठी, खजिनदार व सल्लागार तृप्ती धनवटे रामाने, कार्याध्यक्ष ब्रम्हानंद कोरपे, भरारी फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा इंगळे, उर्वशी इंगळे, अश्विनी पवळ, विशाल पवळ तसेच डॉ. तायडे, डॉ. जोशी मॅडम व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. ...
मनसेच्या तक्रारीची एक तासात महापालिकेने घेतली दखल 
पिंपरी चिंचवड

मनसेच्या तक्रारीची एक तासात महापालिकेने घेतली दखल 

कचरा उचलताना कर्मचारी चिंचवड : प्रभाग क्रमांक १७ मधील नवशांती निकेतन सोसायटी, मिरॅकल हाऊसिंग सोसायटी व चैतन्य पार्क सोसायटी परिसरात पडलेला कचरा उचलण्याची तक्रार महाराष्ट्र नवननिर्माण विद्यार्थी सेनेचे चिंचवड विधानसभा (उपविभाग) अध्यक्ष प्रविण माळी यांनी महापालिकेकडे करताच आरोग्य विभागाने एक तासाच्या आत कचरा उचलून नेत परिसराची साफसफाई केली. परिसरात पडलेला कचरा या ठिकाणी पाच-सहा दिवसांपासून कचरा पडल्याने परिसर अस्वच्छता झाला होता. याबाबत नागरिकांनी प्रविण माळी यांच्याकडे तक्रार केली. माळी यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना कळवताच करताच महापालिकेने तातडीने तीन गाड्या पाठवून कचरा उचलून नेला....
पूर्णानगरमध्ये आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून कडधान्य दुकानाचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

पूर्णानगरमध्ये आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून कडधान्य दुकानाचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड : सध्या आपल्या देशावरती कोरोनाचे संकट आहे, त्यामध्ये लागू लॉकडाउनमध्ये खूप लोकांच्या नोकरी, व्यवसाय संकटात आहे. त्यात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला आत्मनिर्भर बना असे आव्हान केले आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत चिंचवडमधील पूर्णानगर येथे एका मोठया आयटी कंपनीत मध्ये कार्यरत असलेले श्रीकृष्ण काशीद यांनी स्वतःचे नवीन दुकान सुरु केले आहे. बार्शीची ज्वारी, गहू हरभरा, मूग, मटकी असे कडधान्य दुकानात असणार आहे. या दुकानाचे उद्घाटन बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक विलासजी यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक एकनाथ पवार, नगरसेविका योगिताताई नागरगोजे, नरेश गुप्ता, श्रीराम कुलकर्णी, शैलेश कुलकर्णी, उमेश कुटे, दिनेश फूलदेवरे, निशांत बोरसे, मंगेश पाटील आणि स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. या कोरोन...
पिंपरी चिंचवडमध्ये सैराटची पुनरावृत्ती | मागासवर्गीय तरूणाचा खून | आरोपींविरोधात ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवडमध्ये सैराटची पुनरावृत्ती | मागासवर्गीय तरूणाचा खून | आरोपींविरोधात ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड: प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सहा जणांवर ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (ता. 7) रात्री घडली. विराज विलास जगताप (वय 18) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा काका जितेश वसंत जगताप (वय 45, रा. जगताप नगर, बुद्ध विहार जवळ, पिंपळे सौदागर) यांनी सोमवारी (दि. 8) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहित जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे (सर्व रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विराज याचे आरोपीच्या नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथ...
आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

पिंपरी : पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयमध्ये भेट दिली असता, त्यांना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांनी दिशाभूल करणारी माहिती देवून राज्यसरकारचा अपमान केलेला आहे. शहरातील कोरोनासाठीच्या उपाययोजनासाठी काढलेल्या निविदामध्ये अतिशय अनागोंदी प्रकार सुरु आहे. आयुक्तांची भुमिका संशयास्पद असल्याचे दिसत असल्याने त्यांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी विद्यार्थी काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या जबाबदार मंत्र्यांना जर दिशाभूल करणारी माहिती मिळत असेल तर सामान्य नागरिकांच्याबाबत ते किती संवेदनशील असतील याबाबत आपण विचार करावा. कोरोना चाचणीसाठी शहरामध्ये ...
उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवारातर्फे पोलिसांना 50,000 आर्सेनिक गोळ्यांचे वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवारातर्फे पोलिसांना 50,000 आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

पिंपरी : कोरोना जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी व आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उद्योजक राहुल शिंदे मित्र परिवार आणि टायगर ग्रुप पिंपरी चिंचवड यांच्या वतीने संपुर्ण पिंपरी चिंचवड परिसरातील तसेच पुण्यातील काही पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीमध्ये आयुष्य मंत्रालयांनी सुचवलेल्या आर्सेनिक होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सध्या सर्वात जास्त पोलीस हे कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत, त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी हे वाटप करण्यात आले. यावेळी राहुल शिंदे, रेखा साळी, मंगेश पाटील, किरण तरंगे, आणि मित्र परिवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले....
शहर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी “कोविड- १९ योध्दा” म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे “पोलीस मित्र” पुढे सरसावले
पिंपरी चिंचवड

शहर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी “कोविड- १९ योध्दा” म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे “पोलीस मित्र” पुढे सरसावले

पिंपरी चिंचवड : सध्या महाराष्ट्रात कोरोना बधितांचा आकडा वाढतच चालला आहे. कोविड १९ या विषाणूची तीव्रता पुणे विभाग आणि मुंबई विभागात वाढलेली आहे. बधितांचा वाढत्या आलेखामुळे प्रशासनास मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यातच ' फ्रंट वॅlरीयर्स ' म्हणून कार्यरत असणाऱ्या राज्यातील ५०० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलिसांना त्याचा धोका निर्माण झाला आहे. अश्या परस्थितीत शासनाच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी आता मनुष्यबळ पूर्ततेसाठी पोलीस मित्रांची तसेच एस पी ओंची मदत घेतलेली आहे. कोविड १९ योध्दा म्हणून ते शहर पोलिसांना सहकार्य करणार आहेत. ३० जून २०२० च्या मुदतीपर्यंत ते पिंपरी आयुक्तालय अख्यारीत शहर पोलिस विभागास वरिष्ठ अधिकारी यांचे सूचनेनुसार सहकार्य करणार आहेत. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्ग...
राष्ट्रवादी काँग्रेस कडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस कडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी : कोरोना या जीवघेण्या संसर्ग रोगामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य जनतेला बसताना आपणास दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये काळेवाडी फाटा जवळ मक्का मसजित ड्रायव्हर कॉलनी या भागात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बरकत शेख युवा मंच वतीने जीवनावशयक वस्तूंचे किट राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, दिपक चखाले, सागर गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी वसीम खान, समशेर शेख, जलील बागवान आदी उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष वाघेरे यांनी नागरिकांना, घराबाहेर पडू नका, स्वता:च्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन केले. तसेच रमजान ईदच्या खरेदी साठी मोठ्या संख्येने बाहेर पडू नये. साध्या पद्धतीने घरीच ईद साजरी करा, असे बरकत शेख यांनी सांगितले....
दीडशे फूट लांबूनच घेतले अंत्यदर्शन; कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या सुरक्षा साधनात केले अंत्यसंस्कार
पिंपरी चिंचवड

दीडशे फूट लांबूनच घेतले अंत्यदर्शन; कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या सुरक्षा साधनात केले अंत्यसंस्कार

पिंपरी : घरातील एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुडीला कवटाळून धाय मोकलून रडताना आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र करोनाच्या या संकटामुळे रक्‍ताची नाती दुरावत असल्याचेही आता पहायला मिळत आहे. पुण्यातील एका करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. मुलगा आणि भाऊ फक्‍त या दोघांनीच दीडशे फूट लांबून अंत्यदर्शन घेतले. मृतदेहावर अंत्यसंस्काराची वाट न पाहता स्मशानभूमीतून काढता पाय घेतला. अखेर वायसीएममधील कर्मचाऱ्यांनी जीवावर होऊन कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नसताना अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना हा साथीचा आजार आहे. या आजाराने मृत्यू झाल्यावर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून नातेवाईकांच्या ताब्यात देतात. महापालिका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत मयत व्यक्‍तीवर अंत्यसंस्कार केले जातात. ...