पिंपरी चिंचवड

पोलीस मित्र संघटनेतर्फे वाकड पोलीस ठाण्यात दिनदर्शिकेचे वाटप
पिंपरी चिंचवड

पोलीस मित्र संघटनेतर्फे वाकड पोलीस ठाण्यात दिनदर्शिकेचे वाटप

वाकड : पोलीस मित्र संघटनेकडून वाकड पोलीस ठाण्यात दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. संघटनेतर्फे शहरातील सर्व पोलीस ठाणे व चौक्यांमध्ये दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले आहे. असे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष शहाजी भोसले यांनी सांगितले. त्यावेळी पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे व पोलीस निरीक्षक संतोष पाटील, कार्याध्यक्ष शहाजी भोसले, संपर्क प्रमुख दत्ता दाखले, सचिव संजय ताटे, सचिव पंकज गवळी, शहर प्रसिद्धी प्रमुख ओंकार दाते, युवा अध्यक्ष सुजित खुळे, चिंचवड संपर्क प्रमुख सुरज कोळी, चिंचवड विधानसभा संपर्क प्रमुख शुभम ससे, वाकड संपर्क प्रमुख अरविंद वाघ, रावेत संपर्क प्रमुख बिरजू जाधव, निगडी प्राधिकरण संपर्क प्रमुख अभिषेक कुलकर्णी, निगडी प्रसिद्धी प्रमुख दीपाली अरसुळ, चिंचवड प्रसिद्धी प्रमुख पूजा भंडारे, सांगवी संपर्क प्रमुख अजित दुबे, भोसरी संपर्क प्रमुख ऋषभ चव्हाण, काळेवाडी संपर्क प्रमुख शशांक सिरो...
रयतेचा आधारवड हरपला – संजोग वाघेरे पाटील
पिंपरी चिंचवड

रयतेचा आधारवड हरपला – संजोग वाघेरे पाटील

पिंपरी : “अन्याय, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा या बद्दल चीड असणारे कष्टकरी कामगार, शेतकरी या सारख्या सामान्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र झगडणारे स्वर्गीय प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणजे एक धगधगते अग्निकुंड होते. शाहू फुले, आंबेडकरांच्या विचारांचे पाईक असणारे स्व. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा रयत शिक्षण संस्थेच्या विस्तार आणि विकासात मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने रयतेचा आधारवड हरपला” असे प्रतिपादन संजोग वाघेरे पाटील यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे स्व. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य व माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी स्व. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहताना महात्मा फु...
काळेवाडी-थेरगाव-वाकड दफनभूमी मागणीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
पिंपरी चिंचवड

काळेवाडी-थेरगाव-वाकड दफनभूमी मागणीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

नगर विकास विभागाला दिले कार्यवाहीचे आदेश; सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख यांनी दिले होते निवेदन रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : काळेवाडी, थेरगाव व वाकड परिसरात मुस्लिम समाज दफनभूमीची मागणी सातत्याने होत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवले होते. या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव यांना पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. काळेवाडी, थेरगाव, वाकड परिसरात मुस्लिम समाज दफनभूमी नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाला चिंचवड किंवा नेहरूनगर येथे दफन विधीसाठी जावे लागते. मात्र, कोरोना महामारी काळात दफनविधीसाठी या समाजाची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे समाजात प्रशासनविरोधात नाराजीचा सूर आहे. या तीन गावांस...
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत रक्तदान शिबिर व गरजू महिलांना धान्य वाटप
पिंपरी चिंचवड

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीत रक्तदान शिबिर व गरजू महिलांना धान्य वाटप

पिंपरी : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर व गरजू महिलांना धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शगुन चौक पिंपरी कँम्प येथे मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश आहेर यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख वैभव थोरात, महिला संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख सचिन भोसले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, वैशाली मराठे, सरिता साने, वैशाली कुलथे, शैला पाचपुते, शिल्पा आनपण, भाग्यश्री म्हस्के, अल्पसंख्याक शहरप्रमुख हाजी दस्तगिर मनियार, चिंचवड विधानसभाप्रमूख आनंत कोऱ्हाळे, उपशहरप्रमुख हरिष नखाते, गुलाबराव गरुड, उपशहरप्रम...
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखा नामफलकाचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखा नामफलकाचे उद्घाटन

पिपरी : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखा नामफलकाचा उद्घाटन समारंभ रविवारी (ता. २३) काळेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डि-मार्ट जवळ संपन्न झाला. यावेळी शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली, तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे नियोजन उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते व शिवसेना काळेवाडी राहटणीच्या वतीने करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी चिंचवड युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, ज्येष्ठ शिवसैनिक बाबासाहेब भोंडवे, दिलीप भोंडवे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष दस्तगीर मणियार, अधिकराव भोसले, ओंकार मुळे, प्रहारचे संजय गायखे, विकास काजवे, मातोश्री ...
पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची गुटखा विक्रेत्यावर कारवाई | दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची गुटखा विक्रेत्यावर कारवाई | दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : गुटखा बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारावर पिंपरी चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून सुमारे दोन लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला. ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरगाव परिसरात शनिवारी (ता. २२ जानेवारी) करण्यात आली. अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली. महेंद्र पनाराम भाटी (वय २६, रा. सर्व्हे नंबर १८/८ शिव कॉलनी, गणेश नगर, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात विविध कलमान्वये वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त डॉ. डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार सामाजिक सुरक्षा पथक गोपनिय माहिती काढत होते. त्यावेळी २२ जानेवारी २०२२ ...
माधव धनवे पाटील यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड, सामाजिक

माधव धनवे पाटील यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : शरीरातील डोळे हा अवयव सुदृढ आणि निरोगी रहावा यासाठी माधव धनवे पाटील यांनी प्रभाग १७ मधील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका शमीम पठाण यांच्या हस्ते झाले. या शिबिरासाठी १६० जणांनी नाव नोंदणी केली होती. त्यात ८० जणांचे नेत्र तपासणी करण्यात आली. यासाठी हडपसर येथील प्रसिद्ध एच.वी. देसाई आय हॉस्पिटलने सहकार्य केले. या शिबिरास दळवीनगर य, भोईरनगर, उद्योगनगर, इंदिरानगर, बिजलीनगर आणि प्रेमलोक पार्क भागातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत याचा लाभ घेतला. यावेळी माधव पाटील म्हणाले की, समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्याच्या सुखसुविधा पोहोचल्या पाहिजेत. यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. यापुढे दंत चिकित्सा शिबिर, कॅन्सर तपासणी, रक्त तपासणी तसेच इतर आरोग्य विषयक शिबिरे घेण्याचा मानस माधव पाटील यांनी व्यक्त केला. त्यावेळी ज्ञानेश्व...
डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने निलंबित करावे – मनोज कांबळे
पिंपरी चिंचवड

डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने निलंबित करावे – मनोज कांबळे

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या भुमिका साकारणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे लोकांच्या घराघरात व मनामनात पोहोचले. मात्र, डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांची भुमिका केलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून डॉ. कोल्हे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याच अनुशंगाने राष्ट्रवादीने त्यांना निलंबित करावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे यांनी केली असून आघाडी सरकारच्या तिकीटावरती मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. असेही म्हटले आहे. याबाबत मनोज कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मध्यंतरीच्या काळामध्ये डॉ. अमोल कोल्हेमध्ये अज्ञातवासात गेले आणि थेट नथुराम गोडसे बनत आहे. याचा मागचा मतितार्थ आमच्यासारख्या मतदारांना समजत नाही गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेक...
लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टने दिले घुबडाला जीवनदान
पिंपरी चिंचवड

लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टने दिले घुबडाला जीवनदान

पिंपरी : धानोरे येथे अडकलेल्या गव्हाणी घुबडाला लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टच्या सदस्यांनी पकडून सुखरूपपणे आज निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. त्यामुळे या घुबडाला जीवनदान मिळाले. धानोरे येथील नवनाथ गायकवाड यांनी लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड कन्जर्व्हेशन ट्रस्टशी संपर्क साधून घुबड अडकले असल्याची माहिती दिली. त्यानंतर ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष विक्रम भोसले व सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, हे घुबड गेले चार ते पाच दिवस गायकवाड यांच्या घरातच असल्याचे त्यांना कळले. या घुबडाला सुरक्षितपणे पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. दरम्यान, काही नागरिकांनी गायकवाड कुटूंबियांना अंधश्रद्धेपोटी घुबडाविषयी गैरसमज पसरून भीती दाखवण्याच्या प्रयत्न केला. मात्र, गायकवाड कुटूंबीयांनी त्याला बळी न पडता त्या पक्ष्याचे संरक्षण केले. त्याबद्दल अध्यक्ष विक्र...
औंध रावेत बीआरटी रस्त्यावर होणाऱ्या शंभर कोटींची उधळपट्टी थांबवा – राहुल कलाटे
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

औंध रावेत बीआरटी रस्त्यावर होणाऱ्या शंभर कोटींची उधळपट्टी थांबवा – राहुल कलाटे

https://youtu.be/imvbi7YfxlA ४० कोटींचे काम थेट पद्धतीने दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा पिंपरी : औंध रावेत बीआरटी मार्ग रस्ता सुस्थितीत असतानाही येथे नागरिकांच्या करातील शंभर कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पत्रकारांसमवेत या मार्गाचा पाहणी दौरा केला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कलाटे बोलत होते. कलाटे यावेळी म्हणाले की, हा रस्ता बनविताना पुढील पंचवीस वर्षे चे नियोजन केले होते त्यावेळी दोनशे कोटी खर्च केला होता आता सुशभिकरणाच्या नावाखाली शंभर कोटी रुपयांची रक्कम अनाठायी खर्च करण्याचे नियोजन आयुक्त राजेश पाटील का करीत आहेत. यामधे सांगवी फाटा ते कावेरीनगर रस्ता, डांगे चौक ते ताथवडे रस्ता आणि औंध ते रावेत या रस्त्यांचे डांबरीकरण आणि...