माता रमाई स्मारकाकरिता धम्मदिप प्रतिष्ठाण व भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश – राहुल वडमारे
पिंपरी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टीच्या पाठीमागील जागेत माता रमाई यांच्या पुतळ्यासह त्यांचे स्मारक उभारण्यात यावे. या धम्मदिप प्रतिष्ठाण व भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या सातत्यपूर्ण मागणीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आता माता रमाई यांचे त्याठिकाणी स्मारक होणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राहुल वडमारे यांनी दिली.
संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राहुल वडमारे यांनी लोकमराठी न्यूजला सांगितले की, याकरिता सलग चार वर्ष पाठपूरावा केल्यानंतर आता महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी २१ डिसेंबर २०२१ रोजी आमच्या मागणीप्रमाणे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील जागेत महामाता रमाई यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. महामाता रमाई यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. अशी पत्रकार परिषद घेउन जाहीर केले. तब्बल चार वर्षांनंतर आमच्या मागणीला यश आले. महापौर ढोरे य...










