पिंपरी चिंचवड

माझ्या खुशीला शोधा! तरूणीची आर्त हाक | शोधुन देणारास बक्षीस
वायरल, पिंपरी चिंचवड

माझ्या खुशीला शोधा! तरूणीची आर्त हाक | शोधुन देणारास बक्षीस

https://youtu.be/sMhZsWa3KLg पिंपरी : "खुशी माझ्या कुटूंबातील सदस्य असून ती गायब झाल्यापासून मला खुप त्रास होताय, कृपया खुशीला शोधून द्या." अशी भाऊक साद घालत तरूणीचे अश्रू अनावर झाले. या तरूणीला खुशीचा ऐवढा लळा लागला आहे की, तीला शोधण्यासाठी ही तरूणी वणवण भटकत आहे. सविस्तर माहिती अशी की, प्रज्ञा पुजारी या तरूणीची खुशी नावाची भारतीय (गावठी) कुत्री तीन दिवसांपासून निगडी परिसरातून हरवली आहे. याबाबत प्रज्ञा यांनी रावेत पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे. या कुत्रीला शोधुन देणारास ३००० रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सदर कुत्री (खुशी) दिसल्यास 7972300958 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रज्ञा यांनी केले आहे....
दोन खुनाच्या गुन्ह्यातील नातेवाईकाच्या मदतीने सुनेनेच काढला सासुचा काटा | मृतदेहाची लावली विल्हेवाट
पिंपरी चिंचवड

दोन खुनाच्या गुन्ह्यातील नातेवाईकाच्या मदतीने सुनेनेच काढला सासुचा काटा | मृतदेहाची लावली विल्हेवाट

रहस्यमय खुनाचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनीट - २ ने केला उलगडा पिंपरी : सासुचा खुन करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या सुनेला तिच्या नातेवाईकाला गुन्हे शाखा युनीट - २ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या नातेवाईकावर दोन खुन केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पॅरलवर बाहेर आहे. कोणताही ठोस पुरावा हाती नसताना गुन्हे शाखा युनीट - २ च्या पथकाने या खुनाचा उलगडा केला आहे. पथकाच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुक करुन पथकाला ४० हजाराचे बक्षिस जाहीर केले आहे. इम्तियाज उर्फ चिंट्या मुस्ताक शेख (वय - २५, रा. फाजीमा मस्जिद जवळ, ओटास्किम, निगडी) असे खुन केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. तर आरोपी सुन ही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. सोजराबाई दासा जोगदंड ( वय- ७०, रा. उर्दु शाळेजवळ, लक्ष्मी नगर, येरवडा, पुणे ) असे खुन झालेल्या सासुचे नाव आहे...
डासांचा त्रास वाढल्याने काळेवाडीत औषध फवारणीची मागणी
पिंपरी चिंचवड

डासांचा त्रास वाढल्याने काळेवाडीत औषध फवारणीची मागणी

काळेवाडी : विजयनगर, पवनानगर व आदर्शनगर परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच मलेरिया व डेंग्यू सारखे आजार पसरण्याची भीती भेडसावत आहे. त्यामुळे तातडीने औषध फवारणी करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विजय नगर भागातील वैभव कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी, मोरया कॉलनी, क्रांती चौक, ओमकार कॉलनी, शांती कॉलनी, सहारा कॉलनी, समर्थ कॉलनी, किनारा कॉलनी पवना नगर, आदर्श नगर आदी परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे व मलेरिया, तसेच डेंग्यू आजाराचीही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे औषध फवारणीची आवश्यकता गरजेची झाली आहे. दरम्यान, या भागाचे कायमस्वरूपी रहिवासी नियमीत शासकीय व नीम शासकीय कर भरतात, तसेच मतदानाचा हक्क देखील बजावतात. मात्र, महापालिकेच्या वती...
PCMC : स्थायी समिती बरखास्त करून सर्वच आजी-माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या बेहिशोबी मालमतेची चौकशी करा
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

PCMC : स्थायी समिती बरखास्त करून सर्वच आजी-माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या बेहिशोबी मालमतेची चौकशी करा

https://youtu.be/4Xx62jrPS-w अपना वतन संघटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बरखास्त करावी तसेच आजी माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या बेहिशोबी मालमतेची चौकशी करावी. तसेच राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भ्रष्ट स्थायी समिती सदस्यांवर पक्षांतर्गत कारवाई करावी, त्याचबरोबर एसीबीच्या धाडीत रंगेहात पकडले गेलेले स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांचा भाजपने राजीनामा घ्यावा. अशी मागणी अपना वतन संघटनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समितीवर एसीबीच्या पथकाने टाकलेल्या धाडीनंतर २१ ऑगस्ट २०२१ रोजी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी लोकमराठी या फेसबुक पेज च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितले कि, लाच प्रकरणात...
महिलांचे खरे रक्षक पोलिसच असल्याने मनसे महिला आघाडीतर्फे पोलिसांना रक्षाबंधन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महिलांचे खरे रक्षक पोलिसच असल्याने मनसे महिला आघाडीतर्फे पोलिसांना रक्षाबंधन

वाकड : महिलांचे खरे रक्षक हे पोलिसच आहेत, असा पोलिसांप्रती आदर व्यक्त करत राखी पौर्णिमेनिमित्त वाकड पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्यावेळी वाकड पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संभाजी जाधव, संतोष पाटील व विजय घाडगे आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ, अनिता नाईक, काजल गायकवाड, अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल धस, नितिन जाधव, मनसे वाहातुक सेनेचे विशाल साळुंके इत्यादी या उपक्रमात सहभागी झाले होते....
घरातून रुसून गेलेली मुलगी पोलिस मित्रांच्या सतर्कतेमुळे पालकांच्या ताब्यात
पिंपरी चिंचवड

घरातून रुसून गेलेली मुलगी पोलिस मित्रांच्या सतर्कतेमुळे पालकांच्या ताब्यात

पिंपरी : घरातून रागाच्या भरात रुसून गेलेली मुलगी पोलिस मित्र संघटनेच्या सदस्या सूनिता दास यांच्या तर्कतेमुळे पालकांच्या ताब्यात देण्यात आली. ही घटना कासारवाडीत शुक्रवारी (ता. २० ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथून सूनिता दास या आपल्या घरी जात होत्या. त्यावेळी एक संशयास्पद अनोळखी मुलगी त्यांना दिसली, तीची चौकशी केली असता, ती पिंपरी गावात राहत असल्याचे कळले. त्यामुळे तीच्या पालकांचा शोध घेण्यासाठी दास तीला पिंपरी पोलिस चौकीमध्ये घेऊन गेले. तिथे पोलीस कर्मचाऱ्यांनी तीची विचारपूस केली असता, ती घरातून रागाच्या भरात निघून गेल्याचे कळले. आणि ती पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र शाळेजवळ राहत असल्याचीही माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्या आई-वडिलांना संपर्क साधला आणि त्यांना ताबडतोब चौकीत बोलावून मुलीला त्यांच्या...
काळेवाडीतील गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – सोमनाथ तापकीर
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – सोमनाथ तापकीर

काळेवाडी : रहदारी वाढली असून नागरिकरणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व गुन्हेगारी थोपविण्यासाठी काळीवाडीतील गर्दीच्या मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, तसेच या कॅमेर्‍यांचे नियंत्रित काळेवाडी पोलिस चौकीत देण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे. याबाबत तापकीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडीतील प्रभाग क्रमांक २२, विजय नगर परिसरात महानगरपालिकेच्या निधीमधून नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या फक्त तीन चौकात एकूण सात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्याचे नियंत्रण काळेवाडी पोलीस चौकीत देण्यात आलेले आहे. परंतु अनेक गर्दीच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच काळेवाडीमध्ये ...
हिंमत असेल तर गेल्या तीस वर्षातील कामांची चौकशी करा | नगरसेवक संदीप वाघेरे यांचे खुले आव्हान
सामाजिक, पिंपरी चिंचवड

हिंमत असेल तर गेल्या तीस वर्षातील कामांची चौकशी करा | नगरसेवक संदीप वाघेरे यांचे खुले आव्हान

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपला बदनाम करण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहरातील नेत्यांकडून केले जात आहे. एसीबीकडून चौकशी सुरू आहे, मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक नेते राजकारण करीत आहेत. आमचे त्यांना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर गेल्या तीस वर्षातील सर्व कामांची चौकशी करावी? असे खुले आव्हान भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेत केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी टीका केली आहे. या टीकेचा समाचार भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी घेतला आहे. नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले,“ महापालिकेतील लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून पक्षीय राजकारण करणे चुकीचे आहे ”.एसीबीने केलेली कारवाई आणि त्याबाबत सुरू असलेल्या तपासातून सत्य बाहेर येईल,मात्र खालच्या पातळीवर राजकारण करणे चुकीचे आहे. म...
काळेवाडीतील रस्ते होणार अर्बन स्ट्रीटप्रमाणे अत्याधुनिक
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील रस्ते होणार अर्बन स्ट्रीटप्रमाणे अत्याधुनिक

लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : प्रभाग क्रमांक २७ मधील काळेवाडी फाटा ते तापकीर चौक, तापकीर नगर या ठिकाणी बीआरटीएस विभागामार्फत काळेवाडी फाटा ते एम एम शाळेपर्यंतचा मार्ग अर्बन स्ट्रीट डिझाईनप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने विकसित होणार आहे. या कामाचा भूमीपूजन समारंभ कार्यक्रम तापकीर चौक येथे महापौर उषा माई ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, नगरसेविका सुनिता हेमंत तापकीर, निर्मला कुटे, नीता पाडाळे, सविता खुळे, नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते, कैलास बारणे, बाबा त्रिभुवन, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. या कामाचा सातत्याने पाठपुरावा नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते व चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर यांनी केला. या कामांमध्य...
काळेवाडीतील बंद पथदिवे रॉयल फाउंडेशनने केले सुरू
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील बंद पथदिवे रॉयल फाउंडेशनने केले सुरू

लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : परिसरातील अनेक पथदिवे मागील बऱ्याच दिवसांपासुन बंद होते. रॉयल फाउंडेशनने असे २५ पथदिवे महापालिका विद्युत विभागाच्या मार्फत सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून रॉयल फाउंडेशनचे आभार मानले आहेत. ज्योतिबानगर व राजवाडेनगर भागातील अनेक पथदिवे बंद होते. तर काही लुकलुकत होते. त्यामुळे रस्त्यांवर अंधार पसरत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.याबाबत रॉयल फाउंडेशनकडे पुष्कळ तक्रारी आल्या होत्या. ही बाब लक्षात घेता, रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि नांगरे यांनी परिसरातील पथदिव्यांची पहाणी केली. त्यामध्ये सुमारे २५ पथदिवे बंद आढळून आले. याबाबत साधारणपणे दहा दिवस पाठपुरावा केल्यानंतर विद्युत विभागाच्या सहाय्याने पाच दिवे दुरूस्त तर बाकी बदलण्यात आले. त्यामुळे रस्ते उजळले आहेत. रॉयल फाउंडेशनचे अध्यक्ष रवि नांगरे म्ह...

Actions

Selected media actions