पिंपरी चिंचवड

अशोका गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक बापूसाहेब सुवासे यांचे निधन
पिंपरी चिंचवड

अशोका गृहनिर्माण सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक बापूसाहेब सुवासे यांचे निधन

पिंपरी : अशोका गृहनिर्माण सहकारी नियोजित संस्थेचे मुख्य प्रवर्तक / चेअरमन बापूसाहेब हिंदुराव सुवासे यांचे शनिवारी (ता. ३१) अल्पशा आजाराने निधन झाले. ते शिवसेना पिंपळे गुरव विभागप्रमुख अमित सुवासे यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, भावंड, भावजय, वडील, सून, आणि नातवंड असा मोठा परिवार आहे....
फटाक्यांतील विषारी वायू कोरोना रूग्णांसाठी प्राणघातक | फटाके विक्रीस बंदी घालण्याची विशाल जाधव यांची मागणी
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

फटाक्यांतील विषारी वायू कोरोना रूग्णांसाठी प्राणघातक | फटाके विक्रीस बंदी घालण्याची विशाल जाधव यांची मागणी

पिंपरी : फटाक्यांतील विषारी वायू कोरोना रूग्णांसाठी प्राणघातक आहे. त्यामुळे कोव्हीड - १९ (कोरोना) या विषाणूच्या महामारीचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत फटाके स्टाॅल व फटाके विक्रीस बंदी घालण्यात यावी. अशी मागणी बाराबलुतेदार महासंघाचे युवाप्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशसचिव विशाल जाधव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. याबाबत विशाल जाधव यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण जगावर कोव्हीड १९ (कोरोना) ह्या महामारीचे संकट उभे आहे. या रोगाच्या पीडितांना श्वास घेताना सर्वात जास्त त्रास होतो. हा रोग फुफ्फुसांशी संबंधित असून जे कोरोनामधून बरे होतात, त्यांना पूर्णपणे सामान्य होण्यासाठी खूप वेळ लागतो. आता सर्वत्र कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ...
पिंपरी चिंचवड

अंतर मनाला जागृत करून यशस्वी होता येते – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

जागतिक अंध दिनानिमित्त"चलो किसिका सहारा बने" कार्यक्रम पिंपरी : जागतिक अंध दिवसानिमित समाजातील वंचीत घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी "चलो किसिका सहारा बने" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्यात आले.अंध बांधवांच्या व्यथा,वेदना व गरज याचा विचार करून त्यांना सहानभूती नको सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.अंतर मनाला जागृत करून आयुष्यात यशाची शिखरे सहज पार करता येतात असा संदेश त्यांनी अंध व्यक्तींना दिला. प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड व जितो चिंचवड पिंपरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आयुक्तांनी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधून कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आगमन केले.पोलीस आयुक्तालयात आज दुपारी हा कार्यक्रम संपन्न झाला.डोळ्यात दाटलेले काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्...
पिंपरी चिंचवड

वाकड, सांगवी, हिंजवडी विभागाचे नवनियुक्त पोलीस सहाय्यक आयुक्तपदी गणेश बिरादार

पिंपरी : सामाजिक शांतता व सुव्यवस्थेसाठी कुणाचीही तमा न बाळगता कारवाई होणार असे वाकड,सांगवी,हिंजवडी विभागाचे नवनियुक्त पोलिस सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांनी सांगवी पोलिस ठाण्याच्या सदिच्छा भेटीत व्यक्त केले. भुरभुर पावसात-ओळख परेड-सांगवी पोलिस ठाणे सदिच्छा भेटीत रिमझिम पाऊस सुरू असताना बिरादार यांनी सदिच्छा भेट घेत ओळख व स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. यात स्थानिक पत्रकार व मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चाही केली. यावेळी सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रंगनाथ उंडे, सांगवी पोलीस स्टेशन शांतता कमिटीचे संजय मराठे यांनी पुष्पगुच्छ देऊन सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड, गणेश बिरादार यांचे स्वागत केले. मनसेचे राजू सावळे, सुरेश सकट व देविदास बोऱ्हाडे, शशिकांत देवकांत पोलिस कर्मचारी उपस्थित होते....
३५ लाखांच्या खंडणीखोरांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार तासात केले अटक; मॅनेजरची सुखरुप सुटका
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

३५ लाखांच्या खंडणीखोरांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार तासात केले अटक; मॅनेजरची सुखरुप सुटका

पिंपरी : शेअर ट्रेडिंग व्यवसायाच्या वादातून थेट मॅनेजरचे अपहरण करुन 35 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच अपहरण कर्त्यांना गुन्हे शाखा युनिट 2, निगडी पोलीस, खंडणी दरोडा विरोधी पथकाने चार तासात अटक केले आहे. अपहरण कर्त्यांकडून दोन अलिशान कार, एक बजाज पल्सर व सात मोबाईल फोन असा एकुण 61 लाखाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला असून अपहरण केलेल्या मॅनेजरची सुखरुप सुटका केली. मुख्य सुत्रधार हरिचंद्र बारकु राजीवाडे (वय- 40, रा.बापदेवनगर, किवळे, देहुरोड), शशांक जगन्नाथ कदम (वय- 39 वर्ष रा. किसन कृपा बिल्डिंग, हॉटेल घरोंदा जवळ, पिंपरी) यांच्या सोबत तुळशीराम पोकळे (वय-34 वर्ष रा. नढे नगर, हिरा पॅलेस बिल्डिंग, काळेवाडी) याला ताब्यात घेऊन इतर सहभागी आरोपी अमर कदम, विकी गरुड, उमेश मोरे यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर आशुतोष अशोक कदम (वय- 28 वर्ष रा.जी विंग, फ्लॅट नं.14 शिवतीर्थ नगर, श्रीनगर, रहाटणी), राहुल बसव...
ज्येष्ठ कबड्डीपट्टू सुदामराव टकले यांचे निधन
पिंपरी चिंचवड

ज्येष्ठ कबड्डीपट्टू सुदामराव टकले यांचे निधन

पिंपरी चिंचवड : पिंपळे निलख येथील जेष्ठ नागरिक सुदामराव (नाना) श्रीमती टकले (वय ८१) यांचे मंगळवारी (ता. २९ सप्टेंबर) अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. टकले नाना एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू होते. तसेच मुकुंद टकले व दिपक टकले तसेच सौ. विना शिवाजीराव गव्हाणे, श्रीमती उज्वला अनिल खांदवे, सौ. वैशाली राजेंद्र, सौ. शुभांगी राजेंद्र हगवणे यांचे ते वडील होत. दरम्यान, पिंपळे निलख येथील दादाघाट येथे गुरूवारी (ता. ८ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजता दशक्रिया विधी होणार आहे. ...
मंगेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप
पिंपरी चिंचवड

मंगेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

चिंचवड : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगरचे स्वामी सेवक मंगेश पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायजर, हॅन्डग्लोज, आर्सेनिक अलबम ३० गोळ्या व बिस्कीटांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, राजन गुणवंत, संदीप थोरात, जितेंद्र छाबडा, अंजली ताई देव, विनीत साळी, मेघराज बागी आदी उपस्थित होते. ...
दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
पिंपरी चिंचवड

दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी

मनीषा वाल्मिकी अत्याचार प्रकरणी योगी आदित्यनाथ राजीनामा द्या - सिद्दीकभाई शेख पिंपरी चिंचवड : उत्तर प्रदेश मधील हाथरस याठिकाणी मनीषा वाल्मिकी नावाच्या १९ वर्षीय तरूणीवर मारहाण करून १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक २९ सप्टेंबर रोजी रोजी तिचा मृत्यू झालेला आहे.मृत्यूनंतर तिचा अंतिम संस्कार तिच्या परिवाराच्या परवानगीशिवाय घाईगडबडीत रात्रीच्या वेळी करण्यात आला. हि घटना ताजी असतानाच लैंगिक अत्याचाराच्या ३ घटना घडल्या .यामुळे उत्तरप्रदेश मधील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने दि. २ ऑकटोबर २०२० रोजी ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डांगेचौक थेरगाव या ठिकाणी सकाळी " निदर्शने आंदोलन " करण्यात आले. यावेळी बोलताना अपना वतन...
शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या विरुद्ध धर्मादाय आयुक्तांचा मनाई आदेश
शैक्षणिक, पिंपरी चिंचवड

शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या विरुद्ध धर्मादाय आयुक्तांचा मनाई आदेश

पिंपरी : शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ काळेवाडी या संस्थेच्या मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये असा मनाई आदेश पुणे विभागाचे अतिरिक्त धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी दिलेला आहे. दरम्यान, शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ९ जून २०१९ रोजी संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन संचालक मंडळ निवडले आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून चंद्रकात तापकीर, सचिवपदी मल्हारीशेठ तापकीर व इतर पदाधिकारी यांची कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे. संस्थेच्या वतीने कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, एल.बी.टी. इंग्लिश मेडियम स्कूल,तापकीरनगर काळेवाडी, पुणे व श्री भैरवनाथ माध्यामिक विद्यालय, मु.पो.ओझर्डे.ता.मावळ जि.पुणे ह्या शाळा चालविण्यात येतात. परंतु संस्थेचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर हे नवीन संचालक मंडळाला ...
वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीमुळे मिळाले कुत्र्याच्या पिल्लांना जीवनदान
पिंपरी चिंचवड, सामाजिक

वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीमुळे मिळाले कुत्र्याच्या पिल्लांना जीवनदान

पिंपरी चिंचवड : 'वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीने तातडीने केलेला मदतीमुळे ड्रेनेज वाहिनीत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना जीवनदान मिळाले. ही घटना पिंपरी चिंचवड शहरात नुकतीच घडली. https://youtu.be/UuYfuM5NTlI इंद्रायणीनगर पॉवर हाऊस जवळ अक्षय राऊत यांना चेंबरमध्ये कुत्र्याच्या पिल्ल्यांचा आवाज येत असल्याची प्राथमिक माहिती 'वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी'ला मिळाली. घटनेची दखल घेत इतर सदस्य सुरज भारती, करण सोनवणे, मयूर सुपेकर, ओमकार भुतकर तसेच कृष्णा पांचाळ घटनास्थळी पोहचले. रेस्क्यू दरम्यान निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेत, नागरिकांच्या वर्दळीतून मदत करणारे हात पुढे आले. रेस्क्यू जलदगतीने व्हावा, या दृष्टीतून स्वतःच्या गाडीतील जॅक व इतर सामग्री देत तीन युवक अनिकेत सुद्रीप, पुनित देव, संचित पाटील व रिक्षामालक उमेश महाले यांचे सहकार्य मोलाचे ठरले. आठ जणा...