शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे – डॉ. कॅप्टन सी. एम. चितळे
शिक्षक दिनानिमित्त 'यशस्वी' संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनार संपन्न
पिंपरी : शिक्षकांनी सातत्याने स्वतःमधील शिक्षक घडवत राहिला पाहिजे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. कॅप्टन.सी.एम.चितळे यांनी व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त 'यशस्वी' संस्थेच्या वतीने आयोजित 'कौशल्य विकासात शिक्षकांची भूमिका' या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शिक्षक हा बदलाचा महत्वपूर्ण घटक असून शिक्षकांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा अध्यापन शैलीद्वारे अभ्यासाला पोषक वातावरण निर्मिती करण्याची कला अवगत करायला हवी. सध्या इंटरनेटमुळे माहितीचा प्रचंड साठा अवघ्या एका क्लिकवर सहज उपलब्ध होत असताना आपण विद्यार्थ्यांना वेगळे काय शिकवू शकतो, कशा पद्धतीने शिकवू शकतो याचा विचार सर्व शिक्षकांनी कर...










