पिंपरी चिंचवड

दिव्यांगासाठी मोफत उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स | धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांचा उपक्रम
पिंपरी चिंचवड, सामाजिक

दिव्यांगासाठी मोफत उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स | धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांचा उपक्रम

विजय वडमारे सचिन बडे लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत उद्योग आधार व व्यवसाय परवाना (शॉप अॅक्ट लायसेन्स) काढून देण्याचा अभिनव उपक्रम श्री. धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून दोन तरूणांनी राबवला आहे. मागील सहा महिन्यांत या उपक्रमाचा 40 नागरिकांनी लाभ घेतला असून नागरिकांनाकडून या तरूणांचे कौतुक केले जात आहे. विजय नामदेव वडमारे व सचिन बडे असे या दोन तरूणांची नावे आहेत. हे तरूण, व्यवसाय करू ईच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या घरी जाऊन उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसेन्स प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व अर्ज भरून घेत. तसेच ती कागदपत्रे संबंधित कार्यालयात व मिळालेले प्रमाणपत्र दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहचवण्याचे काम हे तरूण मोफत करत आहेत. बाहेर या कामासाठी एजेंट सुमारे दिड हजार ...
काळेवाडीत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला यश

लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : काळेवाडीतील दुरवस्था झालेल्या विविध रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा होता, त्याला अखेर यश आले. ज्योतीबानगरमधील पंचनाथ कॉलनीच्या डांबरीकरणाचे काम सोमवारी (ता. 2) सुरू झाले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पाणीपुरवठा वाहिनी, सांडपाणी वाहिनी तसेच खासगी टेलिफोन कंपन्यांची केबल टाण्यासाठी ज्योतीबानगर, राजवाडेनगर, कोकणेनगर, नढेनगर आदी परिसरातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, त्यांची दुरूस्ती योग्य पद्धतीने न झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. काही रस्ते विविध कामांसाठी सतत खोदल्याने रस्त्यांवर खड्डे पडले असून खडी पसरली आहे. त्यामुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. नागरिकांचे हाल लक्षात घेता खोदकाम झालेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावून धरली ...
PCMC : बंधाऱ्यात मिसळणारे मैलामिश्रित पाणी रोखा
पिंपरी चिंचवड

PCMC : बंधाऱ्यात मिसळणारे मैलामिश्रित पाणी रोखा

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी उचलत असलेल्या रावेत बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. महापालिका ज्या ठिकाणाहून पाण्याचा उपसा करते. त्याठिकाणी मैलामिश्रीत पाणी नदीपात्रत जात असल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. त्यामुळे रावेत बंधाऱ्यात मैलामिश्रित सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात. नदीतील जलपर्णी काढून शहराला पूर्णपणे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा. अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवडकरांना मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका रावेत बंधा-यातून पाणी उचलते. या बंधा-यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. महापालिका ज्या ठिकाणाहून पाण्याच्या उपसा करते. त्याठिकाणी मैलामिश्रीत पाणी नदीपात्रत जात असल्याने मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली...
पिंपरी चिंचवड

मुरलीधर साठे यांचे निधन

मुरलीधर साठे पिंपरी : पिंपळे निलख मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर नारायण साठे (वय 78 वर्षे) यांचे आज गुरुवारी (दि. 20 फेब्रुवारी) ह्रदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मागे, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. मुरलीधर साठे हे पिंपळे निलख उत्सव कमिटीचे अनेक वर्षे अध्यक्ष होते आणि छत्रपती शिवाजी मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होत. पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांचे ते वडील होत. मुरलीधर साठे यांचा अंत्यविधी उद्या शुक्रवारी (दि. 21) रोजी सकाळी 9 वाजता पिंपळे निलख मधील दादा साठे घाट स्मशानभुमी, मुळा नदी किनारी होणार आहे....
विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या गावगुंडांवर कारवाई करा
पिंपरी चिंचवड

विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या गावगुंडांवर कारवाई करा

चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज तापकीर यांची आयुक्तांकडे मागणी लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : रहाटणी-काळेवाडी मधील (प्रभाग क्रमांक 27) तापकीर नगर, श्रीनगरमध्ये चालू असलेल्या विविध विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या समाजकंटक व स्थानिक गावगुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज हेमंत तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. राज तापकीर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले 10 वर्ष रहाटणी काळेवाडीमध्ये कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नव्हती. पण 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी या तीन वर्षांमध्ये विकास कामांचा धडाका सुरु केला. मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मला असे अनेकदा स्थानिक नागरिकांच्या बोलण्यातून आढळून आले की, प्रभागातील...
राष्ट्रवादी कामगार सेलच्या सहसचिवपदी दत्तात्रेय जगताप यांची निवड
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी कामगार सेलच्या सहसचिवपदी दत्तात्रेय जगताप यांची निवड

पिंपरी, बाळासाहेब मुळे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कामगार सेलच्या पिंपरी चिंचवड शहर सहसचिवपदी दत्तात्रेय जगताप यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (कामगार सेल) प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव खडकाळे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी अनंत सुपेकर, पिंटू जगताप, बाळासाहेब मुळे, संदीप कुसालकर, गणेश ठोंबरे आदि मान्यवर उपस्थित होते. दत्तात्रय जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अशी अनेक पदे भुषविले आहेत. मागील सोळा वर्षे ते पक्षाचे एकनिष्ठपणे काम करत आहेत. असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, "देशाचे नेते शरद पवार साहेब, अजित पवार याचे विचार तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यात व पक्ष वाढीसाठी आवश्यक ती गोष्ट करण्यास मी कुठे ही कमी पडणार नाही." जगत...
निर्भया फाउंडेशनतर्फे भटक्या प्राण्यांसाठी रूग्णवाहिका व निवारा
पिंपरी चिंचवड

निर्भया फाउंडेशनतर्फे भटक्या प्राण्यांसाठी रूग्णवाहिका व निवारा

लोकमराठी न्यूज नटवर्क पिंपरी : रहाटणी येथील निर्भया फाउंडेशनच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे भटके व पाळीव प्राण्यांसाठी निवारा आणि प्राणी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्राणी निवारा शेडचे उद्धाटन आणि रूग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच महापालिका शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपळे सौदागर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शितल मुकणे, कंपेशन फॉर ऑलच्या अध्यक्षा पुनीता खन्ना, अनिकेत मेमाणे, महाराष्ट्र प्राणी वेलफर असोसिएशनच्या सल्लागार नेहा पंचमिया, डॉ. प्रशांत चेन्नई, कोकणे चौक ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक शरद कोकणे, निर्भया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उल्हास कोकणे आदी उपस्थित होते. राहुल कलाटे म्हणाले की, "आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो. तशीच प्राण्यांचीही घेतली पाहिजेत. भुतदया म्हणून निर्भया फाउंडेशनने जो उपक्र...
यशस्वी होण्यासाठी महापुरुषांची चरित्रे वाचा – डॉ. खेडकर
पिंपरी चिंचवड

यशस्वी होण्यासाठी महापुरुषांची चरित्रे वाचा – डॉ. खेडकर

पिंपरी (लोकमराठी) : ज्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे त्या क्षेत्रातील यशस्वी झालेल्या महापुरुषांची चरित्रे वाचली पाहिजेत. त्यांचा आदर्श घेवून वाटचाल करावी. असे मत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे उपकुलपती तथा उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी दिला. म्हेत्रे वस्ती-चिखली येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित विश्वरत्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने समाजसेवक श्रीनिवास राठी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रकाश दिलपाक यांना समाज गौरव पुरस्कार,साधना चव्हाण व पल्लवी कांबळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अखिल भारतीय धनगर समाज प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शिवाजी घोडे, हनुमंत म्हेत्रे, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकट वाघमोडे, उपाध्यक्ष मोहन देवकाते आदी उपस्थित होते. ...
PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड

PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

रस्ते डांबरीकरणाच्या लेखी आश्वासनाचा अधिकाऱ्यांना पडला विसर काळेवाडी (लोकमराठी) : विविध विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन दखल घेत नाही. विशेष म्हणजे रस्ते डांबरीकरणाचे लेखी आश्वासन देऊनही प्रशासन गंभीर नसल्याने रस्ते दुरूस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. पाणीपुरवठा वाहिनी, सांडपाणी वाहिनी तसेच खासगी टेलिफोन कंपन्यांची केबल टाकण्यासाठी ज्योतीबानगर, राजवाडेनगर, कोकणेनगर परिसरातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, त्यांची दुरूस्ती योग्य पद्धतीने न झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. काही रस्ते विविध कामांसाठी सतत खोदल्याने रस्त्यांवर खड्डे पडले असून खडी पसरली आहे. त्यामुळे घसरून पडण्याचे अपघात नित्याचेच...
शिवतेजनगर येथे मोफत शारीरिक तपासणी व व्यायाम शिबीराचे उदघाटन
पिंपरी चिंचवड

शिवतेजनगर येथे मोफत शारीरिक तपासणी व व्यायाम शिबीराचे उदघाटन

लोकमराठी : शिवतेजनगर चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व भाग्यश्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत मोफत शारीरिक तपासणी व व्यायामवय वर्ष 50 पुढील नागरिकांना सतावणारे, मानदुखी, कंबरदुखी, स्नायू आखडणे, टोल जाणे, इत्यादि शारीरिक व्याधीवर वेग वेगळ्या प्रकारचे व्यायाम करून घेण्यात येतील. सोमवारी या शिबिराचे उदघाटन करण्यात आले या प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, भाग्यश्री चॅरीटेबल ट्रस्टच्या डॉ. स्वाती भिसे, ज्येष्ठ नागरिक संघांचे खजिनदार प्रकाश शिंदे, स्वामी समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना तोंडकर, अंजली देव, अक्षदा देशपांडे, गाडे मावशी, पवार बाबा, श्रारण अवसेकर, इत्यादी उपस्थित होते. सारिका रिकामे यांनी सूत्रसंचालन केले....