राजकारण

राजकारण Politics News Mrathi – LokMarathi News

संविधानात सर्व नागरिकांना श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य : सायली नढे
पिंपरी चिंचवड, राजकारण

संविधानात सर्व नागरिकांना श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य : सायली नढे

कर्नाटक सरकार विरुध्द राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार : सायली नढे पिंपरी, ता १२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानात विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता दिलेली आहे. कॉंग्रेस हा संविधानाचा आदर करणारा पक्ष आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाने, संघटनेने वा इतर धर्मियांनी हस्तक्षेप करु नये. कर्नाटक सरकारने शाळा, महाविद्यालयात हिजाब वापरण्यास आक्षेप घेतला आहे. याचा शहर महिला कॉंग्रेस तीव्र निषेध करीत आहे असे प्रतिपादन महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी केले. पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, स्वाती शिंदे, निर्मला खैरे, वैशाली गायकवाड, आशा भोसले, रचना गायकवाड, डॉ. मनिषा गरुड, प्रियांका कदम, रुक्साना सैफी, रिजव...
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे तर महिला अध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांची निवड
पिंपरी चिंचवड, राजकारण

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे तर महिला अध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांची निवड

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांची आज नियुक्ती करण्यात आली. तर युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख (Imran Shaikh) आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट (Kavita Alhat) यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. याशिवाय, शहरातील तीन विधानसभानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांना पदमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मागच्या वर्षी महापालि...
प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविणार – सुनील कुसाळकर
राजकारण

प्रभाग क्रमांक तीनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविणार – सुनील कुसाळकर

पिंपरी (बाळासाहेब मुळे) : येणाऱ्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे, आणि त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार आपल्या आपल्या प्रभागामधून पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागलेले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काही ठराविक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक छोटेखानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष अनंत सुपेकर यांनी असा ठराव मांडला की आपल्या प्रभागामधून युवा नेते आणि सर्वांच्या मदतीला धावून येणारे सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष सुनील कुसाळकर यांनाच पक्षाकडून तिकीट मिळावे आणि या ठरावाला प्रभागाचे अध्यक्ष अविनाश आरडकर यांनी अनुमोदन दिले आणि नंतर बैठकी मधील सर्व उपस्थितांनी आपसात चर्चा करून एक मताने सुनील कुसाळकर यांच्या...
हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा
पुणे, राजकारण

हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा

पुणे : हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तर किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. आजच्या शिवसैन...
सालगड्याच्या पोराला नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने काय काय केले?
मोठी बातमी, राजकारण

सालगड्याच्या पोराला नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने काय काय केले?

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क अहमदनगर : कर्जत नगरपंचायतीसाठी (Karjat Nagar Panchayat) दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) असा थेट सामना रंगला होता. कर्जत नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता होती. ही सत्ता राखण्यासाठी शिंदेंनी सर्व शक्ती पणाला लावली. मात्र, रोहित पवार यांनी भाजपचा गड भेदण्यासाठी जोरदार रणनिती आणल्याने कर्जत नगरपंचायत भाजपच्या हातून निसटली. भाजपला अवघ्या दोनच जागा जिंकता आल्या, तर राष्ट्रवादीने १२ जागांवर विजय प्राप्त करत एकहाती सत्ता मिळली. हा पराभव भाजपच्या खुपच जिव्हारी लागला असून जिल्हा परिषद कोरेगाव गटाचे पप्पू धोदाड यांनी एक भावनिक पोस्ट प्रसारीत केली आहे. पप्पू धोदाड यांनी म्हटले आहे की, कुठ तरी एका वृतपत्रात&n...
कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा | आ. रोहित पवार यांनी दिला राम शिंदेना पराभवाचा झटका
मोठी बातमी, महाराष्ट्र, राजकारण

कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा | आ. रोहित पवार यांनी दिला राम शिंदेना पराभवाचा झटका

कर्जत, ता. १९ (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने १५ जागेवर एकहाती विजय मिळवत भाजपाचा दारुण पराभव केला. माजीमंत्री राम शिंदे यांना अवघे दोनच जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा आ. रोहित पवार यांनी राम शिंदेना पराभवाचा झटका देत कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्तातंर घडविले. कर्जतकरानी राम शिंदे यांनी प्रचारादरम्यान आ. रोहित पवार यांच्यावर दहशतीच्या राजकारणाचा केलेला आरोप खोडून काढला. सर्वच विजयी उमेदवारांनी ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांचे आशीर्वाद घेत जल्लोष केला. मात्र, राष्ट्रवादीच्या मनीषा सोनमाळी यांचा प्रभाग क्रमांक चारमधील पराभव राष्ट्रवादीस जिव्हारी लागला. कर्जत नगरपंचायतीच्या एकूण १७ जागेसाठी ८१.८७% मतदान संपन्न झाले होते. या सर्व जागेची मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजता कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात दोन फेरीत ...
पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला अनुकूल वातावरण – कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला अनुकूल वातावरण – कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर

नवनियुक्त महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांचा सत्कार लोकमराठी न्यूज नेटवर्क : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकी बाबत कॉंग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे. सध्या अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सभासद नोंदणीचा उपक्रम आम्ही राबवित असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात निवडणुकीचे बुथधारकांची यादी यांच्या कामकाजाची मांडणी करण्याबाबत शहरातील विविध भागातील बुथ धारकांची माहिती घेवून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रशिक्षण सुरू आहे. उमेदवार मागणीसाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस पक्षाचा कारभार पारदर्शक असल्याने पिंपरी चिंचवड शहरात कॉंग्रेसला अनुकूल वातावरण दिसून येत असल्याचा विश्वास पांढरकर यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांचा सत्कार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस...
कर्जत नगरपंचायतीच्या १२ जागेसाठी सरासरी ८०% मतदान | आ. रोहित पवार आणि माजीमंत्री राम शिंदेकडून विजयाचा दावा
महाराष्ट्र, राजकारण

कर्जत नगरपंचायतीच्या १२ जागेसाठी सरासरी ८०% मतदान | आ. रोहित पवार आणि माजीमंत्री राम शिंदेकडून विजयाचा दावा

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagarpanchayat Election) १२ जागेसाठी १५ मतदान केंद्रावर सरासरी एकूण ८०.२१% मतदान पार पडले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली. १२ जागेसाठी ३१ उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. १२ जागेसाठी १० हजार ३१६ मतदारापैकी ८२७४ मतदारांनी आपला हक्क बजावला. आ रोहित पवार यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला विकासाचे व्हिजन पाहता जनतेचा कौल मिळणार असून मोठ्या मताधिक्याने आपले उमेदवार विजयी होण्याचा दावा केला तर माजीमंत्री राम शिंदे यांनी देखील जनता आपल्या विकासकामाना साथ देतील असे म्हणत भाजपा कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्ता कायम राखण्यात यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला. मात्र या निकालासाठी १९ जानेवारीची वाट पाहावी लागेल. कर्जत नगरपंचायतीसाठी प्रचार तोफा थंडावल्यानंतर मंगळवार दि ...
राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही – प्रा. गणेश ढाकणे
पिंपरी चिंचवड, राजकारण

राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही – प्रा. गणेश ढाकणे

पिंपरी : जोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यांमध्ये कोणत्याही निवडणुका घेऊ देणार नाही. असा इशारा प्रा. गणेश आर ढाकणे यांनी येथे दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शुक्रवारी राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रा. ढाकणे बोलत होते. या आंदोलनात अरुण पवार, आनंदा कुदळे, विशाल जाधव, कैलास सानप, अमोल नागरगोजे, विशाल वाळुंजकर, गणेश ढाकणे, गणेश वाळुंकर, सुरेश गायकवाड, संजय गायके, जितेंद्र बांगर, विजय सोनवणे, सचिन बांगर, बाळासाहेब लटपटे, दादासाहेब दहिफळे, मिलिंद ठाकर, विष्णू कुऱ्हाडे, सोमनाथ काशीद, रोहन सुरवसे, विलास गडदे, तुकाराम सुरवसे, बळीराम सर, सुनील जायभाय, चंदन केदार, उद्धव सानप, हनुमंत आर घुगे यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. प्रा. ढाकणे म्हणाले की, जर आरक्षण मिळणार नसेल तर ओबीसी शांत बसणार न...
आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या – वसंत लोंढे
पिंपरी चिंचवड, राजकारण

आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या – वसंत लोंढे

पिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगीत केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकावर या विषयी आरोप करण्यात धन्यता मानत आहेत. आता सर्व पक्षिय नेत्यांवर आणि केंद्र तसेच राज्य सरकारवर ओबीसी समजाचा दबाव असणे आवश्यक आहे. यासाठीगावपातळीपासून पुन्हा ओबीसींचे मजबूत संघटन उभे करु या अशी हाक माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत नाना लोंढे यांनी केले. मंगळवारी (दि. 7 डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसींच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक भोसरी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी वसंत लोंढे बोलत होते. यावेळी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, ओबीसीचे ज्येष्ठ नेते प्रताप गुरव, आनंदा कुदळे, पी. के. महाजन, वंदना जाधव, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, शहर महिला...