प्रशासक नेमून महानगरपालिकेची सत्ता चालवणाऱ्या अजित दादांना पिंपरी-चिंचवडला सुविधा देण्यापासून कोणी रोखलंय – आप
प्रतिभा आणि प्रतिमा असलेल्या उमेदवारांना निवडून द्या; "आप"च्या स्वराज्य निर्धार मेळाव्यात नागरिकांना आवाहन
पिपरी : रविवार (दि. ५ जून) रोजी पिंपरी चिंचवड मधील पाटीदार भवन येथे पक्षाचा स्वराज्य मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला. आपचे महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, युवाध्यक्ष अजिंक्य शिंदे, आप वाहतूक विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, युवा उपाध्यक्ष संदीप सोनावणे, पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, आप पिंपरी चिंचवड प्रमुख अनुप शर्मा व इतर अनेक पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते. या सोबतच शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या वेळी आम आदमी पक्षा मधे प्रवेश केला
या मेळाव्यात निवडणूक प्रभारी महादेव नाईक, प्रदे...