संविधानात सर्व नागरिकांना श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य : सायली नढे
कर्नाटक सरकार विरुध्द राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार : सायली नढे
पिंपरी, ता १२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानात विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता दिलेली आहे. कॉंग्रेस हा संविधानाचा आदर करणारा पक्ष आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाने, संघटनेने वा इतर धर्मियांनी हस्तक्षेप करु नये. कर्नाटक सरकारने शाळा, महाविद्यालयात हिजाब वापरण्यास आक्षेप घेतला आहे. याचा शहर महिला कॉंग्रेस तीव्र निषेध करीत आहे असे प्रतिपादन महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, स्वाती शिंदे, निर्मला खैरे, वैशाली गायकवाड, आशा भोसले, रचना गायकवाड, डॉ. मनिषा गरुड, प्रियांका कदम, रुक्साना सैफी, रिजव...