अपना वतन संघटनेतर्फे पिंपरीत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर ‘विचारमंथन शिबीर’
समाज व देशाला पुढे नेहण्यासाठी मुस्लिम समाजात शैक्षणिक क्रांतीची गरज - सर्वपक्षीय मुस्लिम नेत्यांचा एकसूर
पिंपरी : अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी येथील अल्पाइन हॉटेल मध्ये पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर एकदिवसीय "विचारमंथन शिबीर" आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पिंपरी चिचंवड एजुकेशन सोसायटीचे सचिव गुलाम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विचारमंथन शिबिरात पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजातील सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पिंपरी चिचंवड शहरातील मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शहरातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी शहरातील उर्दू शाळा, मुस्लिम विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती, समाजातील गरीब दुर्बल घटकांच्या वैद्यकीय गरजा, रोजगार, करिअर मार्गदर्शन शिबिरे, ग्रंथालय, कायदेशीर सल्ला केंद्र,...