वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीमुळे मिळाले कुत्र्याच्या पिल्लांना जीवनदान
पिंपरी चिंचवड : 'वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीने तातडीने केलेला मदतीमुळे ड्रेनेज वाहिनीत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना जीवनदान मिळाले. ही घटना पिंपरी चिंचवड शहरात नुकतीच घडली.
https://youtu.be/UuYfuM5NTlI
इंद्रायणीनगर पॉवर हाऊस जवळ अक्षय राऊत यांना चेंबरमध्ये कुत्र्याच्या पिल्ल्यांचा आवाज येत असल्याची प्राथमिक माहिती 'वाईल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी'ला मिळाली. घटनेची दखल घेत इतर सदस्य सुरज भारती, करण सोनवणे, मयूर सुपेकर, ओमकार भुतकर तसेच कृष्णा पांचाळ घटनास्थळी पोहचले.
रेस्क्यू दरम्यान निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेत, नागरिकांच्या वर्दळीतून मदत करणारे हात पुढे आले. रेस्क्यू जलदगतीने व्हावा, या दृष्टीतून स्वतःच्या गाडीतील जॅक व इतर सामग्री देत तीन युवक अनिकेत सुद्रीप, पुनित देव, संचित पाटील व रिक्षामालक उमेश महाले यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
आठ जणा...