कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र केंद्र देशात एकमेव भोसरीत : देवेंद्र फडणवीस
भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी, ता. ७ : कुस्ती, कबड्डी सारखे देशी खेळ माणसाला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ करतात आणि त्यातूनच एक उत्तम व्यक्तिमत्व घडते. कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र प्रशिक्षण केंद्र देशात एकमेव भोसरीत उभारण्यात आले याचा आम्हाला अभिमान आहे. मागील पाच वर्षांत जी विकासकामे झाली त्या हे मोठे काम आहे. महापौर, आमदार, स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक हे अभिनंदनास पात्र आहेत. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील आणि देशाचे तसेच भोसरीचे नाव जगात मोठे करतील असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी यावेळी व्यक्त केला.
भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन रविवारी (दि. ६ मार्च) सायंकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात...