आदित्य बुक्की याने आंतरराष्ट्रीय मास रेसलिंग स्पर्धेत सुवर्ण तर बेल्ट रेसलिंग स्पर्धेत पटकावले कास्यपदक
पिंपरी : आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या स्पर्धा २८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२२, दरम्यान अझरबैजान देशातील गोयगोल रीजनमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य बुक्की याने ७५ किलो वजनी गटात मास रेसलिंग (Mass Wrestling) या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक तर बेल्ट रेसलिंग (Belt Wrestling) या क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकावले.
आदित्य बुक्की हा खेळाडू इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स या महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे. त्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता इंदिरा कॉलेजच्या प्रमुख तरिता शंकर, चेतन वाकलकर यांनी मोलाची मदत केली. तसेच प्राचार्य जनार्दन पवार, उपप्राचार्य शेवेंदु भूषण, विभागप्रमुख थॉमसन वर्गीस, स्पोर्ट डिपार्टमेंटचे प्रमुख किशोर पठारे व इतर प्राध्यापक या सर्वांनी सहकार्य केले.
आदित्य बुक्की (Aditya Bukki) याने यापूर्वी तीन वे...