क्रीडा

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन जुडो स्पर्धेचे आयोजन
क्रीडा

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन जुडो स्पर्धेचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील मुले काटक असतात. त्यांनी कठोर परिश्रम करून खेळातील संधी ओळखून त्याचा लाभ घ्यावा. त्यांनी खेळाचे नेतृत्व करावे. covid-19 च्या नियमांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करावी, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीपआबा तुपे यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून विचार व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालय जुडो स्पर्धेत (मुले-मुली) बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्ह्याचे क्रीडा समितीचे सचिव डॉ. रमेश गायकवाड यांनी मोलाचे विचार व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे खिलारे साहेब यांनी व्यक्त केले. खेळातूनच खिलाडूवृत्ती येते. निकोप शरीरात, निकोप मन वसत असते. युवकांनी खेळ खेळून आरोग्य उत्तम ठेवावे. असे विचार व्यक्त केले. स्पर्धेचे संयोजन क्रीडा संचालक प्रा....
महात्मा फुले महाविद्यालयातील खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी निवड
क्रीडा

महात्मा फुले महाविद्यालयातील खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी निवड

पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील चौधरी सिद्धेश (४० मीटर हर्डल), गायकवाड धैर्यशील (उंच उडी) व लव्हे देवश्री (४०० मीटर) धावणे या क्रीडा प्रकारात मेंगलोर विद्यापीठ, मेंगलोर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या आंतर विभागीय मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक संपादन केलेले आहे. तसेच पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत होणाऱ्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या पुरुष संघाने मैदानी स्पर्धेत विजेतेपद संपादन केले. या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडूरंग लोहोटे व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या....
महात्मा फुले महाविद्यालयाच्या शुभम धायगुडेचे सुवर्ण यश
क्रीडा

महात्मा फुले महाविद्यालयाच्या शुभम धायगुडेचे सुवर्ण यश

पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचा शुभम धायगुडे याने ओडिसा येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेमध्ये 1500 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात सुवर्णपदक संपादन केले. तर 400 मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. शुभम हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला एकमेव सुवर्णपदक जिंकून देणारा जलतरण पट्टू ठरला. या खेळाडूस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड व क्रीडा विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पांडुरंग लोहोटे व सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन लाभले....
राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत आदित्य बुक्की याची दोन सुवर्ण पदकांची कमाई
क्रीडा

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत आदित्य बुक्की याची दोन सुवर्ण पदकांची कमाई

पिंपरी : गोवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा २०२१ मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील आदित्य मल्लिकार्जुन बुक्की याने दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. या स्पर्धेचे आयोजन नॅशनल किकबॉक्सिंग असोसिएशन एन.जी (वाको इंडिया) यांच्या मान्यतेने गोवा किकबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशभरातून सुमारे ४५० पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला. महाराष्ट्र संघटनेच्या संघाद्वारे आदित्य मल्लिकार्जुन बुक्की याने ७४ किलो सिनिअर पुरूष गटामध्ये पाँईट फाईट आणि किक लाईट या दोन क्रीडा प्रकारात भाग घेऊन सुवर्ण पदकांची कमाई केली. या स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम, आसाम द्वितीय व ओडिशा तृतीय सांघिक विजेतेपदाचे मानकरी ठरले. https://youtu.be/zM86aVMK1nk आदित्य बुक्की यांना त्यांचे प्रशिक्षक उमरकासिम तांबोळी व पिंपरी चिंचवड अध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर...
महाराष्ट्र महिला संघाला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक कनिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद
क्रीडा

महाराष्ट्र महिला संघाला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक कनिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद

एसबी पाटील पब्लिक स्कूलच्या हर्षिता काकडेची चमकदार कामगीरी पिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) : जम्मू येथे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या 55 व्या कनिष्ठ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने रौप्य पदक पटकाविले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एसबी पाटील पब्लिक स्कूलची हर्षिता काकडे हिने महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देण्यात चमकदार कामगीरी केली. पश्चिम बंगाल संघाने महिलांमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय पातळीवर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत कनिष्ट महिला गटासाठी निवड होणारी हर्षिता काकडे हि पिंपरी चिंचवड शहरातील आतापर्यंतची एकमेव महिला खेळाडू आहे. हर्षिताला प्रशिक्षक धनाजी पाटील, मनोज काळे, प्रिया जोशी, सुनिता वासुदेव व श्रीकांत देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्राचा संघात हर्षिता काकडे सह सृष्टी भावसार, र...
एस. एम. जोशी महाविद्यालयातील सुशांत खवळे आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत द्वितीय
क्रीडा, पुणे

एस. एम. जोशी महाविद्यालयातील सुशांत खवळे आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत द्वितीय

हडपसर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील सुशांत खवळे या खेळाडूने ७४ किलो वजनी गटामधून द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी त्याचे अभिनंदन करीत त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांबरोबरच शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दत्ता वसावे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. जडे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. किशोर काकडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक यांचे मोलाचे योगदान आहे....
पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉनमध्ये शर्मिला, मनोज, गौरी, सुनिल यांना प्रथम क्रमांक
क्रीडा, पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉनमध्ये शर्मिला, मनोज, गौरी, सुनिल यांना प्रथम क्रमांक

उन्नती सोशल फाऊंडेशन व शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद पिंपरी : पिंपळे सौदागर येथे आयोजित केलेल्या "पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन" २१ किमी स्पर्धेत शर्मिला संतोष आणि मनोज यादव यांनी प्रथम क्रमांक तर खुल्या गटात गौरी गुमास्ते आणि सुनिल शिवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून रोख पारितोषिक पटकाविले. रविवारी (ता. ५ डिसेंबर) उन्नती सोशल फाऊंडेशन, किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा. लि. व नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच यशदा रियाल्टी ग्रुप यांच्या सहकार्याने हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की, "गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने शारीरिक व मानसिक महत्त्व अधोरेखित केले आहे. सुदृढ शरीर व सक्षम मन बनविण्यासाठी धावणे हा एक उत्तम व दर्जेदार व्यायाम आहे. केवळ खेळ म्हणून...
मतदार जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सायक्लोथाॅन मोहिम
पिंपरी चिंचवड, क्रीडा

मतदार जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सायक्लोथाॅन मोहिम

पिंपरी : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. आज पुणे सायक्लोथाॅन मोहिम पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात आली होती. त्याचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सुनिल शेट्टी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश उपस्थित होते. त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुक विभागाचे नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्यात आली. १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी व पुनरिक्षण मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे....
संँम्बो राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील स्पर्धेकांचे घवघवीत यश
क्रीडा

संँम्बो राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील स्पर्धेकांचे घवघवीत यश

पुणे : लोणी काळभोर येथे संँम्बो राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धत तीनशे स्पर्धक सहभागी होते. निवृत्ती काळभोर व कुमार उघाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पिंपरी चिंचवडमधील स्पर्धकांनी पटकावली. या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे, तसेच या विद्यार्थ्यांची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. सुवर्ण पदक विजेते उमा काळे, हर्षदा नळकांडे, तृप्ती पाटील, स्नेहल कदम, खुशी रायका, पुजा निचित, विशाखा थाकणे, मनीषा पाटील, सुधा खोले, देव रायका, प्रणव लांडगे, अथर्व जाधव, अथर्व मोरे रौप्य पदक विजेते समीक्षा जगताप, सारिका भालेकर, भूमिका कांबळे, निशा गुप्ता, ज्योती पोसे, हर्षदा दौंडकर, आशितोष दौंडकर या विद्यार्थ्यांना वस्ताद निवृत्ती काळभोर यांचे मार्ग...
अनंतनगरमध्ये कराटेची साहसी प्रात्यक्षिके सादर
पिंपरी चिंचवड, क्रीडा

अनंतनगरमध्ये कराटेची साहसी प्रात्यक्षिके सादर

पिंपळे गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळ, अनंतनगर महिला मंडळ व वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कराटेचे साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ग्रँड मास्टर शिहान विक्रम मराठे व राजेंद्र कांबळे यांची टीम प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये किक्स, पंचेस, काथाज, स्पायरिंग, मंगलोरी कौले हात व पायांच्या सहाय्याने तोडणे, डोक्यावर फरशी फोडणे तसेच सहा इंची खिळे मारलेल्या फळीवर झोपून पोटावर फरशा ठेवून १८ एलबीएस वजनाच्या घनाने तोडण्यात आली. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व नागरिकांना कराटेचे महत्व सांगण्यात आले. https://youtu.be/WTyEi0mov6A आज आपण दूरचित्रवाणीवरून, वर्तमानपत्रांमधून पाहतोय अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असतात. त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे नागपूर, अमरावती, डोंबिवली, पालघर, साकीनाका, पुणे आणि इतर ठिकाणी महिलावर अत्याचार झा...