हडपसर, दि. ४ फेब्रुवारी (प्रतिनिधी) – एस. एम. जोशी कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग कमिटी, विद्यार्थी तक्रार निवारण समिती आणि महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाणे हळदी – कुमकुम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानवर्धिनी शाळेच्या सचिव सोनल चेतन दादा तुपे आणि सामाजिक कार्यकर्त्या व अँटी रॅगिंग विद्यार्थी तक्रार समिती सदस्य मनीषा प्रसाद राऊत उपस्थित होत्या.
मार्गदर्शन करताना सोनल चेतन तुपे यांनी महिला प्राध्यापिकांना हळदी – कुमकुम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या आयुष्यामध्ये शिस्त कशी महत्त्वाचे आहे या संदर्भात अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन सोनल चेतन तुपे यांनी केले. तसेच मनिषा प्रसाद राऊत यांनी सर्व महिला प्राध्यापिकांना हळदी – कुमकुम दिनाच्या शुभेच्छा देत, स्काय गोल्ड यांच्या कडून देण्यात आलेल्या गिफ्टचे वाटप केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य, प्राणीशास्त्र व मायक्रो बायोलॉजीच्या विभागप्रमुख डॉ. हेमलता कारकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते. पाहुण्यांचा परिचय अँटी रॅगिंग कमिटीच्या चेअरमन डॉ. निशा गोसावी यांनी करून दिला. तर पाहुण्यांचे स्वागत व आभार महिला सक्षमीकरण समितीच्या चेअरमन डॉ. ज्योती किरवे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नयना शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापिका बहुसंख्येने उपस्थित होत्या.