
पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : डिलक्स चौकातील एका हॉटेल चालकाने ट्रेडमार्क कायद्याचा भंग केला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. २२) ट्रेडमार्क कायद्यासह इतर कलमान्वये दोघांवर गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार मार्च २०२४ पासून आतापर्यंत सुरू होता.
अखिल निजामुद्दीन अन्सारी (३६ वर्ष) व सलीम निजामुद्दीन अन्सारी (४५ वर्ष, दोघेही रा. मल्हारगड, बि-१६, सेक्टर १२, मोशी प्राधिकरण) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत अमर सोमेश्वर लाड (वय ३९, अप्लाइन ओरा, बनकर वस्ती, मोशी) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर लाड यांच्या हॉटेल व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या “SSV SHRI SIDDHIVINAYAK VADAPAV” या नावाचा ट्रेडमार्क हा कायदेशीर नोंदणीकृत आहे. मात्र, संशयित आरोपींनी त्यांच्या स्वतःच्या हॉटेलसाठी या नावामध्ये केवळ एका अक्षराचा बदल करून “SST SHRI SIDDHIVINAYAK VADAPAV” असे नक्कल नाव तयार केले. या बदलाने ते हुबेहूब नक्कल बनवून ग्राहकांची आणि फिर्यादीची विश्वासघाताने फसवणूक केली आहे.