Tag: Ahmednagar News

सुभद्रा जगधने यांचे निधन 
महाराष्ट्र

सुभद्रा जगधने यांचे निधन

अहमदनगर, दि. २१ : मुळेवाडी (ता. कर्जत) येथील सुभद्रा संभाजी जगधने (वय ५७) यांचे बुधवारी (दि. २१) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्‍या दैनिक प्रभातचे बातमीदार रवींद्र जगधने यांच्या मातोश्री होत. दशक्रिया विधी शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ८ वाजता चांदे बुद्रुक, मिरजगाव रोड (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे होणार आहे....
छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर
पुणे, शैक्षणिक, सामाजिक, साहित्य

छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर

राहुरी, दि.२० (लोकमराठी) - छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला. छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य समितीचे कार्याध्यक्ष श्रीयुत वस्ताद अमित गुंडाकुश यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील फक्त दोनच व्यक्तींना दिला जातो. दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. वाजता मराठी साहित्नय संघ सभागृह नवी मुंबई येथे एका समारंभात निवृत्त ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी शाहिरीतून व कीर्तनातून शिवरायांचे कार्य महाराष्ट्रात देशात तसेच परदेशातही पोहोचवले आहे. तसेच सिन्नर येथे अंध अपंग निराधार इत्यादी समाजातील दुर्लक्षिलेल्या घट...
वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीवर राहुरीतील शिवशाहीर डॉ विजय तनपुरे
पुणे

वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीवर राहुरीतील शिवशाहीर डॉ विजय तनपुरे

राहुरी, दि.२२ (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील सन्मानार्थी वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब गोपीनाथ गागरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे सहसुल व पशुसंवर्धन मंत्री ना. श्री.राधाकृष्ण ए. विखे पाटील यांनी ही निवड केली. यावेळी समितीच्या इतर सहा सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन समितीत नवनाथ साहेबराव म्हस्के, श्री.शिवशाहीर डॉ .विजय तनपुरे, श्री. निजामभाई कासमभाई शेख, श्रीमती. राजश्री काळे, श्री. विजय वसंतराव गायकवाड, श्री. महादेव शशिकांत झेंडे यांचा समावेश करणयात आला आहे. शिवशाहीर डॉ .विजय तनपुरे महाराज म्हणाले, दोन वर्षापासून नगर जिल्ह्यात वृद्ध कलावंत मानधन समिती नव्हती. त्यामुळे अनेक गरजवंत युद्ध कलावंत मानधनापासून वंचित होते.आता जे जे मला भेटतील त्या सर्वांना पेंन्शन चालू करून देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील तनपुरे घराण्...
राहुरी महाविद्यालयाच्या गौरी सत्यजीत कराळे – तनपुरेंना सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे सुवर्णपदक
पुणे

राहुरी महाविद्यालयाच्या गौरी सत्यजीत कराळे – तनपुरेंना सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाचे सुवर्णपदक

राहुरी, दि.१३ (लोकमराठी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मे २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एम.ए पदव्युत्तर कला शाखेच्या परीक्षेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राहुरी या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील गौरी सत्यजीत कराळे-तनपुरे हिस "श्रीमती नलिनी ठक्कर सुवर्णपदक"प्राप्त झाले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारेयांनी दिली. प्राचार्य डॉ. संभाजी पठारे म्हणाले,आपल्या महाविद्यालयातील गौरी हिचे यश हे सर्वांना दिशादर्शक असून यातून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व आपल्या महाविद्यालयाची यशाची परंपरा अशीच सुरु राहिल. हे मिळालेले सुवर्णपदक महाविद्यालय व संस्थेच्यादृष्टीने अत्यंत गौरवास्पद म्हणावे लागेल. महाविद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेत आपण अव्वल असल्याचे सिद्ध केले. सुवर्णपदकांची मालिका खंडित...
AHMEDNAGAR : कर्जत तालुक्यातील चांदे, मुळेवाडी, कोंभळीत अवैध दारू विक्री जोरात | राज्य उत्पादन शुल्क विभाग व एसपी ऑफिसपर्यंत पोहचतो हप्ता
महाराष्ट्र, मोठी बातमी

AHMEDNAGAR : कर्जत तालुक्यातील चांदे, मुळेवाडी, कोंभळीत अवैध दारू विक्री जोरात | राज्य उत्पादन शुल्क विभाग व एसपी ऑफिसपर्यंत पोहचतो हप्ता

संग्रहित छायाचित्र अहमदनगर : कर्जत तालुक्यातील चांदे बुद्रुक, मुळेवाडी, कोंभळी गावात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीसांच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या अवैध धंद्यांचा पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयापर्यंत हप्ता पोहचत असल्याचे सांगितले जात आहे. गावातच हात भट्टी, देशी विदेशी दारू उघडपणे मिळत असल्याने तरूण पिढी त्याकडे आकर्षित होत आहे. तर कौटुंबिक वाद, हिंसाचार वाढला असून बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे सामाजिक शांतता भंग पावत आहे. अहमदनगर पोलीस आणि हप्ता वसूली नवीन नाही. या आधी अहमदनगर पोलीसांची हप्ते वसूली चव्हाट्यावर आली होती. अवैध दारू विक्री होणारी (Chande Bk, Mulaywadi, Kombhali) ही गावे कर्जत पोलीसांच्या ...
रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
सामाजिक, महाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तर्फे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

कर्जत, ता. ५ (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कर्जत (Karjat) सिटीच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोमवारी (ता. ४) श्री आशितोष महादेव पायी दिंडी ही कर्जतहुन पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना कर्जत तालुक्यातील धांडेवाडी येथे मुक्कामी होती. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सचिव प्रा. सचिन धांडे यांच्याकडे पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने सर्व वारकऱ्यांचे आरोग्य तपासणी घेण्यात आली. यात एकूण १५० वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसाठी रोटरीयन डॉ. विजयकुमार चव्हाण डॉ. अद्वैत काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे नूतन अध्यक्ष अभयकुमार बोरा, सचिव प्रा. सचिन धांडे माजी अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, माजी सचिव राजेंद्र जगताप, माजी अध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, दयानंद पाटील, संदीप गदादे, सदाशिव फरांडे, सुरेश...
वीज पडण्याची इशारा देणारे ‘दामिनी ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये आहे ना?
मोठी बातमी, राष्ट्रीय

वीज पडण्याची इशारा देणारे ‘दामिनी ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये आहे ना?

लातूर, ता. २७ : लातूर जिल्हा मराठवाड्यात वीज पडून दुर्घटना होण्यात दुसऱ्या स्थानी आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सहकार्याने अभ्यासगट स्थापन केला होता. त्या अभ्यासगटाचे सादरीकरण झाले असून अभ्यासगटाने सुचवलेल्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ करणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता 'दामिनी' ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्...
भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गावडे यांचा इन्सानियत फाउंडेशनतर्फे सत्कार
महाराष्ट्र

भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब गावडे यांचा इन्सानियत फाउंडेशनतर्फे सत्कार

कर्जत : भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका उपाध्यक्ष पदी भाऊसाहेब सोपान गावडे यांची निवड झाली. त्यानिमित्त चांदे बुद्रूक येथील इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चाँद भाई मुजावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल खोमणे, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगधने, योगेश जगधने, तात्यासाहेब जगताप व युवा नेते नंदकुमार नवले, माजी सरपंच अनिल सुर्यवंशी, अनिल खोमणे, चेअरमन गोकुळ नवले, नितीन गंगावणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गावडे यांची निवड झाल्याने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुक्याचा उपाध्यक्ष पदाचा मान व जबाबदारी मिळाल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सर्वांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे....
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू – प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले
महाराष्ट्र

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू – प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले

कर्जत, ता. २४ (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात पर्यावरण वाचेल तेव्हाच आपण सुखरूप जगू शकतो. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीने राबविलेला घनवन प्रकल्प हा एक स्तुत्य उपक्रम आहे. असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले आहे. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी आणि कर्जत नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथील छत्रपती नगर येथे मियावाकी (घनवन प्रकल्प) हजारो वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष इंजि. रामदास काळदाते, सचिव राजेंद्र जगताप, संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काळदाते, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल, दादा पाटील महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग प्रमुख मेजर संजय चौधरी, नगराध्यक्षा उषा राऊत, नग...
कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न
महाराष्ट्र

कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना यांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न झाला असून सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याचे मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांनी कौतुक केले. कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना ही गेल्या ५२० दिवसांपासून स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे अखंड कार्य करीत असून पर्यावरण, स्वच्छता आणि पर्यावरणाशी निगडित विविध जैवविविधता यांचा अभ्यास करण्यासाठी सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामाजिक संघटनेचे ३०ते ३५ स्वयंसेवक ४ व ५मार्च रोजी मुंबई अभ्यास दौऱ्यावर गेले होते. यावेळी किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र ऐरोली(नवी मुंबई)येथे फ्लोमिंग पक्षी माहिती, तसेच पाण्यातील खारफुटी वृक्ष आणि त्यांचे पाण्यातील मासे,किटक आणि पक्ष्यांसाह वातावरणातील शुद्ध हवा, मासे उत्पत्ती आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि विविध जैविक घटकांच...