कर्जत तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीची पहिली बैठक संपन्न
कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यात तहसील कार्यालय अंतर्गत अहमदनगर जिल्हा पालक मंत्री यांचे शिफारशीनुसार नवीन संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती नुकतीच गठीत करण्यात आली. शासन निर्णयातील तरतुदीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करून तहसीलदार कर्जत यांनी संजय गांधी निराधार समितीसमोर मंजूरीचे कार्यवाहीसाठी ठेवणेत यावेत अशी तरतूद आहे.
यास्तव १४ फेब्रुवारीला तहसील कार्यालयात नवीन संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. प्रथमत: बैठकीस उपस्थित समिती अध्यक्ष व सदस्य यांचे तहसीलदार कर्जत यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेचे १५२ अर्ज मंजूर झाले व श्रावणबाळ योजनेचे १४४ अर्ज मंजूर, तर ५६ अर्ज नामंजू...