Tag: coronavirus

छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर
पुणे, शैक्षणिक, सामाजिक, साहित्य

छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर

राहुरी, दि.२० (लोकमराठी) - छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला. छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य समितीचे कार्याध्यक्ष श्रीयुत वस्ताद अमित गुंडाकुश यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील फक्त दोनच व्यक्तींना दिला जातो. दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. वाजता मराठी साहित्नय संघ सभागृह नवी मुंबई येथे एका समारंभात निवृत्त ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी शाहिरीतून व कीर्तनातून शिवरायांचे कार्य महाराष्ट्रात देशात तसेच परदेशातही पोहोचवले आहे. तसेच सिन्नर येथे अंध अपंग निराधार इत्यादी समाजातील दुर्लक्षिलेल्या घट...
डॉ. अमरसिंह निकम यांना डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार
पिंपरी चिंचवड

डॉ. अमरसिंह निकम यांना डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार

माईसन, जर्मनी : डॉ. अँड्रियास एच. जंग यांच्या हस्ते डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार स्विकारला डॉ. डॉ. अमरसिंह निकम. पिंपरी : पिंपरीगाव येथील डॉ. अमरसिंह निकम यांना आय. एच. झेड. टी. या संस्थेच्या वतीने डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६८ व्या जन्मदिनानिमित्त जर्मनीतील त्यांच्या मूळ जन्मस्थळी माईसन येथे नुकताच हा सोहळा पार पडला. त्यावेळी सुधा अमरसिंह निकम आणि युरोप मधील बहुसंख्य होमिओपॅथिक तज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. मनिष निकम, डॉ. मनस्वी म. निकम आणि डॉ. सतीश म्हस्के यांनी होमिओपॅथीच्या शोधनिबंधावर आपले व्याख्यान दिले. डॉ. अमरसिंह निकम हे गेली चाळीस वर्ष होमिओपॅथीद्वारे रुग्ण सेवा देत आहेत. होमिओपॅथीमध्ये संशोधन करून होमिओपॅथीमधील पहिले खाजगी १०० बेडचे हॉस्पिटल, आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल या नावाने चा...
मानवी जीवाची हानी करणाऱ्या परराज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवावे – विवेक तापकीर
पिंपरी चिंचवड

मानवी जीवाची हानी करणाऱ्या परराज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवावे – विवेक तापकीर

पिंपरी : ॲानलाईन औषध विक्रीला कोणतीही परवानगी नसताना आज मोठ्या प्रमाणावर ॲानलाईन औषध विक्री होत आहे. त्यामुळे मानवी जीवाला धोका निर्माण झाला आहे. मानवी जीवाची हानी करणाऱ्या परराज्यातून येणाऱ्या अशा औषधांवर नियंत्रण ठेवावे. अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष व काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकीर (Vivek Tapkir) यांनी केली आहे. याबाबत तापकीर यांनी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासनाने बाहेरील राज्यातून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यामुळे अनेक गैरप्रकाराला आळा घालता येईल. ॲानलाईन औषधविक्रीला कोणताही परवानगी नसतानाही ही विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परराज्यातून येणारी औषधे कोणत्या प्रकारची आहेत. याबद्दल आपणांस काही कल्पना नसते, ती योग्य आहेत की अयोग्य, गुणव...
महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांना नवजात बालकाचे(NICU) अतिदक्षता विभाग सुरू करा : आप
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांना नवजात बालकाचे(NICU) अतिदक्षता विभाग सुरू करा : आप

शहरातील पाच रुग्णालयामध्ये एनआयसीयु युनिट तातडीने सुरू करणार - सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण पांडुंरंग गोफणे यांचे आश्वासन पिंपरी चिंचवड : मनपाच्या विविध रुग्णालयात लोकसंख्येच्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. मनपाच्या (PCMC) रुग्णालयात बाळंतपण विनामूल्य असल्याने अनेक गरजू,गरीब व श्रमिक रुग्णालयाकडे नागरिकांचा लोंढा जास्त आहे. त्यामुळे येथील मुख्य रुग्णालयात प्रसूतिगृहमध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करावे,अशी मागणी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांचे कडे केली आहे.आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाण मनपाच्या प्रवेश द्वारासमोर निदर्शने करण्यात आली. चेतन बेंद्रे बोलताना म्हणाले की (Chetan Bendre), नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच प्रसुतीपश्चात बाळाला योग्य सुविधा ...
नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव; सहा जणांना झाली लागण
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव; सहा जणांना झाली लागण

पिंपरी : आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित (Mutation) विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केलेले असून त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.‍ दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकुण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर ‍तिघे त्यांचे निकटसहवासित आहेत.नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्य...
कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशात प्रवेश करू नये, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे
मोठी बातमी, आरोग्य, राष्ट्रीय

कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशात प्रवेश करू नये, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे

डॉ. प्रकाश कोयाडे गेल्या दोन दिवसांत कोविड संबंधित अचानक बातम्या येऊ लागल्या आहेत. तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा होऊ लागली आहे. कोरोनाबद्दल सोशल मीडिया आणि टीव्ही वरील सुरू झालेल्या चर्चेवरून समज-गैरसमज आणि अफवांचं पीक उठणार आहे. एक भीतीचं वातावरण तयार होऊन येत्या आठवड्याभरात आपण पॅनिक अवस्थेत जाऊ की काय अशी परिस्थिती येण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन 'Omicron चे दोन रुग्ण बेंगलोरमध्ये सापडले असून ते दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी आहेत. त्यांचे अजून काही रिपोर्ट यायचे बाकी आहेत. नेमके किती म्युटेशन झाले आहे याबद्दल माहिती येणं बाकी आहे. सध्यातरी एकाही भारतीयांमध्ये हा विषाणू सापडला नाही. या स्ट्रेन बद्दल बरेच तर्क-वितर्क सुरू आहेत. लक्षणं असणार नाहीत, नाक-घशात हा विषाणू प्रकार सापडत नाही डायरेक्ट फुफ्फुसात जातो, शेवटच्या टप्प्यात आल्यानंतरच हा डिटेक्ट होतो वगैरे चर्चा सुरू आहेत. ...
कोविड-१९ महामारी : आव्हाने आणि संधी
सिटिझन जर्नालिस्ट

कोविड-१९ महामारी : आव्हाने आणि संधी

अपर्णा कुलकर्णी सध्याच्या आजाराच्या घटनेने आपल्याला कळले आहे की, एकता, आपल्याला परिस्थितीशी लढाई करण्यास मदत करते. या रोगाचा सर्वत्र परिणाम झाला आहे. लिंग, वय, धर्म, राष्ट्रीयत्व आणि वंशिकता याची पर्वा न करता सर्वत्र याचे पडसाद उमटले आहेत. हे परिणाम केवळ शारीरिक आणि मानसिकच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक देखील आहेत. यामुळे घरून कार्य करणारी एक नवीन अर्थ व्यवस्था सुरू झाली आहे. आरोग्य आणि स्वच्छता ही नागरीक तसेच राष्ट्राची प्राथमिकता बनली आहे. या दरम्यान अनेक आव्हानांचा सामना आपण करत आहोत. त्याचबरोबर यातून नवनवीन संधी देखील निर्माण होताना दिसत आहेत. करोनाची (Corona) लाट आल्यावर जसजशी रुग्ण संख्या वाढत गेली, तशी आपल्याला विविध गोष्टींची कमतरता भासू लागली. अनेक वैद्यकीय आव्हानांचा आपण सामना केला किंबहुना अजूनही करत आहोत. यामध्ये सगळ्यात जास्त कमतरता जाणवली ती रूग्णखाटांची. प्राम...
महाराष्ट्राचे राजकारण तिस-या लाटेवर स्वार…
मोठी बातमी, विशेष लेख

महाराष्ट्राचे राजकारण तिस-या लाटेवर स्वार…

विजय चोरमारे कोविडच्या तिस-या लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्राचे राजकारण रंगात आले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. हंड्या फुटू लागल्या आहेत. रंगपंचमीवर बंदी असल्यामुळे चिखलफेक सुरू आहे. आमच्यावर बंधने आणि तुम्ही मात्र मोकाट असे आरोप केले जात आहेत. या गोंधळात सामान्य माणूस मात्र संभ्रमात सापडल्यासारखा झाला आहे. तिसरी लाट येणार म्हणतात ते खरे की, लाट वगैरे थोतांड आहे म्हणतात ते खरे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. काय आहे तिस-या लाटेची वस्तुस्थिती ? जागतिक आरोग्य संघटनेसह आरोग्य क्षेत्रातील इतरही आंतरराष्ट्रीय संघटनांकडून वारंवार महामारीच्या लाटांचा उल्लेख केला जातो. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट वगैरे. एका लाटेचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यामध्ये संबंधित आजाराचे रुग्ण, त्यांची वाढत वाढत एका विशिष्ट उंचीपर्यंत जाणारी आणि पुन्हा कमी कमी होत येणारी संख्या या ...
बेशिस्त नागरिकांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक | शहरात सापडले २२७५ नवीन रूग्ण
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

बेशिस्त नागरिकांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक | शहरात सापडले २२७५ नवीन रूग्ण

पिंपरी चिंचवड : कोरोना संदर्भातील नियम अनेक नागरिकांकडून पाळले जात नाहीत. त्यामुळे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून आज शहरात २२७५ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तसेच आज १२८६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला,तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एक लाख ३४ हजार ५४१ एकूण करोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख १६ हजार १७७ रूग्ण कोरोना मुक्त झालेत. शहरातील २८०३ जणांना मृत्यू झाला आहे. क्षेत्रीय कार्यालयानुसार आज आढळलेली रूग्ण संख्या खालीलप्रमाणे. अ प्रभाग (३१८ बाधित) निवडणूक प्रभाग क्रमांक 10, 14, 15, 19 शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, आकुर्डी, गंगानगर, वाहतूकनगरी, उद्योगनगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भाटनगर, भाजी मंडई, पिंपरी कॅम्प ब प्रभाग (३६० बाधित) निवडणूक प्रभाग क्रमांक 16, 17, 18, 22 वाल्हेकरवाडी, दळवीनगर...
क्वारंटाईन सेंटरमधील काळवंडलेले दिवस?
विशेष लेख

क्वारंटाईन सेंटरमधील काळवंडलेले दिवस?

प्रा. डॉ. किरण मोहिते "कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने आपणास क्वारंटाईन व्हायला लागेल", असं ऐकल्यावर धडकी भरली. "क्वारंटाईन कस होणार", मी म्हणालो ऍम्ब्युलन्स काहीही पाठवू नका. मी ऍडमिट होण्यासाठी स्वतः येईल. असे सांगून मी क्वारंटाईन होण्यासाठी देहूरोड येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी शाळेत गेलो. 'एमजी क्वारंटाईन केंद्र देहूरोड' असं फलकावर लिहलं होत. फलक अर्धा दुमड्डलेला अर्धा आ वासून कसाबिसा उभा होता. भीत-भीत गेट जवळच्या सुरक्षारक्षकाने हाताने इशारा करून खिडकीजवळ जायला सांगितले. खिडकीजवळ गेलो. जवळच्या मित्रांनी मला मास्क लावलेल्या चेहऱ्याकडे पाहून कसंबस ओळखलं. "का रे इथे कसा काय?" "अरे मला क्वारंटाईन व्हायला साघितलं आहे," हे ऐकलंयावर कावऱ्या बावऱ्या नजरेने पाहत. दुसरीकडे तोंड वळविले. क्षणात मान वळवून निघून गेला. खिडकीतून नर्सने आवाज दिला. आपलं नाव काय? ...